देवाचे ज्ञान हे आपल्या समजेच्या अगदी पलीकडचे आहे, आणि तो जे सर्व काही करतो त्यामध्ये त्याच्याकडे नेहमीच उद्देश आहे. नीतिसूत्रे १६:४ आपल्याला स्मरण देते, "परमेश्वराने सर्वकाही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे." जीवनात ज्या वादळांना तुम्ही सामोरे जाता, मग ते भावनात्मक, शारीरिक किंवा आध्यात्मिक असो, ते तुम्ही जाणण्यापेक्षा मोठा उद्देश पूर्ण करतात. या वादळांचा उद्देश असतो. जीवनाचे काही धडे तुम्हांला मला सांगू दया.
अ). वादळे वाढ आणि शुद्धीकरण आणते.
मी गर्वाने म्हणतो की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी पाहिले आहे की माझे वडील नांगराच्या मागे थांबत असे आणि बैल ते ओढत असे. लहान लेकरे असे, माझा धाकटा भाऊ आणि मी त्या नांगरावर उभे राहत असे जेव्हा बैल ते ओढत असे. एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मोठा होत असताना, मी हे शिकलो आहे की जीवनाचे सर्वात सुपीक क्षण हे नेहमी डोंगराच्या शिखरावर नव्हे, तर दऱ्यांमध्ये घडतात. दऱ्या जेथे आहेत तेथील माती सुपीक असते, जे डोंगरांच्या खडकाळ भागाची पडलेली माती आणि सेंद्रिय पदार्थांपासून तयार होते. हे येथेच उत्तम वाढ होते, आणि ते आपल्या स्वतःच्या जीवनासाठी एक रूपक म्हणून कार्य करते.
आव्हानात्मक प्रक्रिया जसे झीज व विघटनपासून ज्याप्रमाणे सुपीक जमीन ही दऱ्यांमध्ये निर्माण होते, त्याप्रमाणेच व्यक्तिगत वाढ ही शत्रूंवर प्रभुत्व मिळविण्यापासून निर्माण होते. सर्वात अधिक वाढ ही आपल्या जीवनात डोंगराच्या शिखरावर घडत नाही परंतु जेव्हा आपण जीवनाच्या दऱ्यांमध्ये असतो. विडंबना ही आहे की तुम्ही डोंगराच्या शिखरावर जाता, दऱ्यांमधील तुमची वाढ व शुद्धीकरणाच्या कारणामुळे.
आपल्या जीवनातील वादळे आपल्या चारित्र्याला घडवतात आणि शुद्ध करतात. सौम्यपणा, संयम, विश्वास विकसित करण्यास ते आपल्याला साहाय्य करतात. तथापि व्यक्ति जो वादळात सापडतो, आणि व्यक्ति जो वादळातून बाहेर येतो हे दोन भिन्न व्यक्ति असतात.
कदाचित तुम्ही स्वतः आता सध्या अशाच एखादया वादळात सापडलेला असाल. कदाचित ते आजार किंवा निराशेचे वादळ असू शकते. ती एखादी वित्तीय परिस्थिती असू शकते किंवा नातेसंबंधातील एखादया प्रकारचा मत्सर असू शकतो. वाईट बातमी ही आहे की कोणतेही बातमी देणारे माध्यम अशा वादळांबद्दल आपल्याला पूर्वसूचना देत नाहीत. एक व्यक्ति जो वादळात जातो तो विश्वासाबद्दल बोलतो, आणि तो व्यक्ति जो वादळातून बाहेर येतो तो त्याच्या विश्वासाने जगतो. हबक्कूक २:४ म्हणते, "नीतिमान तर आपल्या विश्वासाने वाचेल."
आजच्या वेगवान जगात, संयम हा खरेच एक गुण आहे ज्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. जर आजच्या पीढीमध्ये कशाचा अभाव असेल, तर तो संयम आहे. याकोब १:२-३ स्पष्ट करते, "माझ्या बंधुंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड दयावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो." हे अत्यंत महत्वाचे आहे हे स्मरण ठेवणे की आपल्या जीवनात विश्वासाने चालताना ज्या वादळांना आपण सामोरे जातो त्यामध्ये चिकाटी आणि संयमची गरज लागते.
उपासनेनंतर एक स्त्री माझ्याकडे आली आणि म्हणाली, "पास्टर मायकल, मी मागील तीन रविवारपासून उपासनेला येत आहे, आणि माझ्या प्रार्थनांचे उत्तर अजून देवाकडून मिळालेले नाही." मी तिला म्हटले, बाई, येथे आणखी चवथा रविवार, पाचवा, आणि अनेक रविवार यायचे आहेत. माझ्या म्हणण्याचा खरेच काय अर्थ होता तो: संयम हे महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही देवाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहता.
परमेश्वर हा एखादी एटीएम मशीन नाही की आपल्या समस्यांना ताबडतोब उत्तरे आणि उपाय दयावे. त्याऐवजी, तो प्रेमळ पिता आहे, आपल्या जीवनात काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक कार्य करीत आहे, आपले चारित्र्य शुद्ध करीत आहे आणि आपल्या स्वतःच्या उत्तम स्वरुपात आपल्याला घडवीत आहे. वादळाच्या मध्य प्रक्रिया ही कदाचित संथ आणि नेहमी आव्हानात्मक असू शकते, परंतु संयमाने, आपण देवाच्या सिद्ध वेळेमध्ये भरवसा ठेवण्यास शिकतो आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये त्याच्या हाताला ओळखतो.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, मी नम्र अंत:करणाने तुझे मार्गदर्शन व ज्ञानाचा धावा करण्यास तुझ्यासमोर येतो. त्या जगात, जे त्वरित इच्छा पूर्ण करण्याची मागणी करते, तेथे तुझ्या सिद्ध वेळेमध्ये संयम व भरवसा ठेवण्यास मला साहाय्य कर. मला तुझ्यावर विसंबून राहण्यास आणि भरवसा ठेवण्यास साहाय्य कर की मी कल्पना करू शकतो त्यापेक्षा तुझ्या योजना माझ्या जीवनासाठी मोठया आहेत. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ०३ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● येशू द्राक्षारस (आंब) प्याला
● चला आपण परमेश्वराकडे वळू या
● पहारेकरी
● आपण वर घेतले जातील (रैप्चर) तयार आहात का?
● सुवार्ता घेऊन जाणारे
● बी बद्दल आश्चर्यकारक सत्य
टिप्पण्या