भविष्यात्मक सेवाकार्यांचे अनुसरण करण्याद्वारे, काही तरुण व्यक्ति माझ्याकडे आले आणि मला विचारले की, "आपल्या स्वतःहून आपण देवाची वाणी स्पष्टपणे कशी ऐकू शकतो?" ते फार दूरवरून प्रवास करून आले होते की केवळ त्या उपासनेमध्ये हजर राहावे, आणि मी हे पाहू शकतो की तो केवळ एक प्रासंगिक प्रश्न नव्हता. ते खरेच देवाचा शोध घेत होते.
हा एक सामान्य गैरसमज आहे की देव केवळ काही निवडक लोकांबरोबरच संवाद साधतो. ते खरे नाही. देव प्रत्येकाबरोबर संवाद साधतो. हे या वास्तविकतेस सिद्ध करते की तो सर्वांचा आणि सर्वांवर देव आहे. तो फारोला बोलला. त्याने त्या माशाला म्हटले ज्याने योनाला गिळले. देव नेहमीच बोलत आहे. जर देव प्रत्येकाशी बोलत आहे, तर मग आपण देवाची वाणी ऐकण्यास समर्थ का होत नाही?
व्हेल, भव्य आणि बुद्धिमान सागरी सस्तन प्राणी म्हणून, त्यांच्या प्रबळ सामाजिक संबंध आणि गुंतागुंतीच्या संप्रेषण प्रणालीसाठी ओळखले जातात. ते "पॉड्स" नावाच्या घनिष्ठ-संबंधात असलेल्या गटांमध्ये प्रवास करतात, ज्यामध्ये एखादया प्राणीपासून ते अनेक डझनभर प्राणी असू शकतात. हे "पॉड्स" अनेक समाजाला साहाय्यक म्हणून कार्य करते, जेथे ते एकत्र मिळून कार्य करतात की शिकार करावी, एकमेकांचे संरक्षण करावे, आणि त्यांच्या लहान पिल्लांचे पालन-पोषण करावे.
व्हेल त्यांच्या "पॉड्समध्ये" संवाद साधण्यासाठी आणि समाजीकरण करण्यासाठी विविध प्रकारच्या स्वरांचा वापर करतात. क्लिक, शिट्ट्या आणि स्पंदित हाक हे तीन प्रकारचे आवाज जे ते काढतात. आपल्यासाठी ते केवळ आवाज आहे, परंतु गटामधील दुसऱ्या व्हेलसाठी तेच ऐकणे, हे बोलणे आहे; ते एकमेकांबरोबर संवाद साधत असतात.
मुख्य कारण की तुम्ही आणि मी त्या संवादाला समजण्यास चुकतो किंवा जो काही संवाद साधलेला आहे ते समजण्याची उणीव असते हे याकारणासाठी की आपण त्यांच्या क्षेत्राबरोबर लयबद्ध नाही. तुम्ही आणि मी त्यांच्या क्षेत्राबाहेर आहोत म्हणून वापरण्यासाठी ते केवळ न समजणारे आवाज आहेत, आणि त्यांच्यासाठी ते संवाद साधणे आहे.
प्रभु येशू देखील पृथ्वीवर चालला, आणि जे त्याच्यासभोवती होते त्यांना परिचित असणाऱ्या सामान्य भाषेमध्ये बोलला, अनेक जण आज देखील त्याचा संदेश समजणे आणि त्याचा अर्थ जाणण्यामध्ये संघर्ष करतात. तो अरामी भाषेमध्ये बोलत असे, त्या काळातील शाळांमध्ये शिकवली जाणारी भाषा, तरीही जेव्हा त्याने त्याची शिकवण सांगितली, अनेक जण हे संभ्रमातच होते. असे का घडले? येशूचे बोलणे हे आध्यात्मिक अर्थाने भरलेले होते, आणि त्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रात तयारी आवश्यक असते की खरेच तो संदेश आत्मसात करावा.
योहान ८:४३ मध्ये, येशूने विचारले, "तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की, तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही." ते जे आध्यात्मिकदृष्टया लयबद्ध नाहीत ते त्याची शिकवण पूर्णपणे समजू शकले नाहीत. प्रेषित पौलाने ह्याविषयी आणखी स्पष्टपणे १ करिंथ २:१४ मध्ये असे म्हटले, "स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात, आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते."
प्रभु येशूने नेहमी दाखल्यांमध्ये बोलले की आध्यात्मिक सत्याचे उदाहरण दयावे, जसे मत्तय १३:१३ मध्ये, "ह्यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत, आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही." त्याची शिकवण समजण्यासाठी एखादयाला आत्म्याच्या क्षेत्राशी लयबद्ध होण्याची गरज असते.
हा तो आत्मा आहे जो जीवन देतो; देहापासून काहीही लाभ नाही. वचन जे मी तुम्हाला बोलतो ते आत्मा आहे, आणि ते जीवन आहेत. (योहान ६:६३)
प्रभु येशूने म्हटले की त्याचे वचन हे आत्मा आहे, आणि जोपर्यंत तुम्ही आध्यात्मिकदृष्टया संवेदनशील होत नाहीत तोपर्यंत ते तुम्ही ऐकू शकत नाही, तो पर्यंत जेव्हा तो तुम्हांला बोलतो ते तुमच्यासाठी व्हेलच्या आवाजापेक्षा वेगळे नसणार. ते अर्थहीन असेल, जरी देव बोलत आहे अनेक जण हे अंधारात चकरा मारत आहेत. जोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्राच्या बाहेर असाल, ते तुमच्यासाठी केवळ एक आवाज असेल.
"तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, "मेघगर्जना झाली," दुसरे म्हणाले, "त्याच्याबरोबर देवदूत बोलला." (योहान १२:२९)
ध्वनि हा एक कंपन आहे जो हवेतून किंवा इतर माध्यमातून प्रवास करतो, तर आवाजामध्ये संदेश व अर्थ असतो. या संदर्भात, दैवी वाणीचा आवाज हा देवाच्या शक्तीचे भौतिक प्रदर्शन सादर करते, तर वाणी स्वतः संदेश आणि त्याच्या स्वयं उपस्थितीला नेते.
वस्तुस्थिती ही की येशूने स्पष्टपणे वाणी ऐकली तर इतरांनी केवळ आवाज ऐकला हे सुचविते की आध्यात्मिक संवेदनशीलता दैवी संवादाची पारख करण्यात महत्वाची भूमिका पार पाडते. येशू, देवाचा पुत्र म्हणून, त्यास पित्याबरोबर घनिष्ठ संबंध होते, जे त्यास वाणी व संदेश स्पष्टपणे समजू देत होते.
आध्यात्मिक संवेदनशीलता ही देवाबरोबर घनिष्ठ संबंधाद्वारे निर्माण केली जाऊ शकते. जसे आपण आपल्या विश्वासात वाढतो, आणि देवाला अधिक घनिष्ठपणे जाणण्याचा शोध घेतो, तेव्हा आपण उत्तमरित्या सज्ज होतो की जगाचा गोंगाट आणि विचलनामध्ये त्याची वाणी ओळखावी.
प्रार्थना
पित्या, माझे आध्यात्मिक कान उघड आणि त्यांस तुझ्या वाणीशी लयबद्ध होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन.!
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचा संघर्ष तुमची ओळख होऊ देऊ नका -२● दिवस २६:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● दुरून मागे मागे चालणे
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● मोठया संकटात
● लोक बहाणे करण्याची कारणे- भाग १
● तुम्ही कोणाबरोबर चालत आहात?
टिप्पण्या