english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. यहूदाच्या पतनापासून ३ शिकवणी
डेली मन्ना

यहूदाच्या पतनापासून ३ शिकवणी

Wednesday, 25th of October 2023
22 15 1279
Categories : Betrayal Character Choices Deception Human Heart Sin Temptation
यहूदा इस्कर्योत, मूळ बारा शिष्यांतील एक, एक सावधीगीरीची कथा पुरवते जी पश्चाताप न करणाऱ्या आणि शत्रूच्या प्रलोभनांना बळी पडणाऱ्या हृदयाची धोक्यांची स्पष्ट आठवण करून देते. यहूदाच्या कथे द्वारे, आपण पापाचे स्वरूप आणि आपल्या अंत:करणाचे रक्षण करण्याचे महत्व याबद्दल अमुल्य समज प्राप्त करतो.

शिकवण #१: लहान तडजोडी मोठ्या अपयशाकडे नेते
कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे: ज्याचा काहींना लोभ धरला, ते विश्वासापासून दूर गेले आणि त्यांनी स्वतःला दू:खांनी भोसकले.  (१ तीमथ्यी ६:१०)

यहूदाचे पतन एका रात्रीत झाले नाही. त्याची सुरुवात किरकोळ उल्लंघनापासून झाली. थैलीमधून पैसे चोरून, यहूदाने त्याच्या हृदयात लोभ निर्माण होऊ दिला. अशा वरवर क्षुल्लक निवडी अनेकदा मोठ्या पतनासाठी पाया घालतात. ह्या छोट्या तडजोडींना अधिक धोकादायक बनवण्याआधी ते ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे अत्यावश्यक आहे. 

शिकवण #२: केवळ बडबड परिवर्तनाची हमी देत नाही 
“माला प्रभुजी, प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, त्याचा होईल.” (मत्तय ७:२१)

यहूदा, येशूच्या अत्यंत जवळचा, अनेकदा त्यांच्या शेजारी बसला होता, चमत्कारांचा साक्षीदार झाला होता, आणि त्याची शिकवण प्रथम ऐकणारा होता. तथापि, ख्रिस्ताशी केवळ जवळीक आपोआप परिवर्तन घडवून आणत नाही. फक्त स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेतल्याने काहीही बदलत नाही. त्यासाठी प्रामाणिक अंत:करण आणि खरा पश्चाताप आवश्यक आहे. प्रामाणिक संबंध आणि ख्रिस्ताच्या अधीन झाल्यावाचून, सर्वात अधिक जवळीक देखील निरर्थक ठरू शकते.

शिकवण #३: कबूल न केलेले पाप शत्रूंच्या प्रभावासाठी द्वारे उघडते
“जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.” (१ योहान १:९)

यहूदाच्या चोरीच्या कबूल न केलेल्या पापामुळे तो सैतानाच्या प्रभावाला बळी पडला. क्षमा मागण्याऐवजी, त्याने त्याचे अपराध लपविले, शत्रूला पाय रोवण्यास जागा दिली. सैतानाने याचा फायदा घेतला, आणि यहूदाला विश्वासघाताच्या मार्गावर नेले. पापकबुली हे केवळ क्षमा आणत नाही परंतु शत्रूच्या हल्याविरुद्ध संरक्षक अडथळा म्हणून देखील कार्य करते.

यहूदाच्या कथेचे विश्लेषण करताना, हे स्पष्ट होते की त्याचा विश्वासघात करण्याचा प्रवास अनेक निवडींच्या मालिकेतून मोकळा झाला होता. पश्चातापाची अनुपस्थिती आणि पापाच्या मोहापायी त्याची नम्रता यामुळे त्याला ख्रिस्ताच्या प्रकाशापासून दूर नेले आणि शत्रूच्या तावडीत ओढून घेतले. विश्वासणारे म्हणून, जेव्हा आपण देवाच्या मार्गापासून भरकटतो तेव्हा जे धोके लपून राहतात त्या धोक्यांची ज्वलंत आठवण म्हणून यहूदाची कथा कार्य करते. हे जागृत राहणे, सतत आपल्या अंत:करणाचे परीक्षण करणे आणि क्षमा मागणे याचे महत्व अधोरेखित करते.

याशिवाय, यहूदाची कथा ही खऱ्या पश्चातापाच्या महत्वाबद्दल सर्व विश्वासणाऱ्यांना एक स्पष्ट आव्हान आहे. चर्चमध्ये असणे, धार्मिक विधींमध्ये भाग घेणे आणि आध्यात्मिक नेत्यांच्या अत्यंत जवळ राहणे देखील हे एखाद्याचे पापाच्या धोक्यांपासून संरक्षण करू शकत नाही. परिवर्तन हे हृदयात घडते, आणि त्यासाठी पापापासून प्रामाणिकपणे मागे वळण्याची आणि ख्रिस्ताकडे वळण्याची आवश्यकता लागते.

जेव्हा आपण पुढे जातो, आपल्याला ज्या छोट्या तडजोडी करण्याचा मोह होऊ शकतो त्यापासून सावध राहू या, त्यांच्यामुळे होणारे संभाव्य परिणाम समजून घेऊ या. चला आपण प्रामाणिकपणे ख्रिस्ताचा धावा करू या आणि केवळ त्याच्याजवळ राहू नये. आणि सर्वात महत्वाचे, आपण आपल्या तारणकर्त्याशी संवादाचा संपर्क नेहमी खुला ठेवू या, आपल्या पापांची कबुली देऊन आणि प्रत्येक चरणात त्याचे मार्गदर्शन शोधू या.
प्रार्थना
प्रिय पित्या, शत्रूच्या सूक्ष्म सापळ्यापासून आमच्या अंत:करणाचे रक्षण कर. आमच्या चुकीची पाऊले  ओळखण्यास आणि खऱ्या पश्चातापाकडे नेण्यास आम्हांला मदत कर. आम्ही तुला नेहमी प्रामाणिकपणे शोधत राहावे, आणि तुझ्यासोबतचे आमचे नाते सत्य आणि प्रेमात रुजलेले आहे याची खात्री करावी. येशूच्या नावाने. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास
● अगापेप्रीति मध्ये वाढणे
● आज्ञाधारकपणा हा आध्यात्मिक गुण आहे
● तुमच्या अनुभवांना वाया घालवू नका
● धन्य व्यक्ती
● योग्य पाठपुरावा अनुसरण
● सिद्ध सिद्धांताचे महत्त्व
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन