जेव्हा मी विश्वासाने-केंद्रित वातावरणात मोठा होत होतो, तेव्हा हे सामान्य होते हे ऐकणे की धार्मिक पुरुष व स्त्रिया त्यांचे प्रियजन, घर व कुटुंबासाठी शत्रूच्या शक्तीपासून संरक्षणासाठी ख्रिस्ताच्या रक्तासाठी विनंती करीत असत. काही बायबल शिक्षक, तथापि, असे सुचवितात की रक्तासाठी विनंती करण्याची कल्पना ही एखाद्या परिस्थितीवर रक्ताची कबुली म्हणून अधिक चांगले आहे.
"त्याला (सैतानाला) त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले; आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही." (प्रकटीकरण १२:११)
वल्हांडणाची कथा ही विश्वास व आज्ञाधारकपणाच्या सामर्थ्याची साक्ष आहे. परमेश्वराने इस्राएली लोकांना मिसर देशामध्ये आदेश दिला होता की त्यांच्या घरांच्या दाराच्या बाह्यपट्टीवर कोकऱ्याचे रक्त लावावे. जेव्हा मृत्यूदूत त्या देशातून जाईल, तेव्हा ज्या दाराच्या बाह्यपट्टीवर रक्ताचे चिन्ह असेल ते सोडून तो पुढे जाईल. (निर्गम १२)
शेकडो वर्षानंतर, १ इतिहास २१:१४-२८ मध्ये, राजा दाविदाने इस्राएली लोकांची जनगणना करण्याद्वारे पाप केले होते, ज्यामुळे एक विनाशकारी मरी पसरली ज्यामुळे सत्तर हजार लोक मृत्युमुखी पडले होते. ही चूक जाणून, दाविदाने देवाकडे दया व क्षमेची विनंती केली. परमेश्वराने दाविदाला एक वेदी बांधण्यास आणि त्यावर प्राण्याचे बलिदान करण्यास सांगितले. रक्ताचे बलिदान अर्पण करण्याद्वारे दाविदाचा पश्चाताप आणि आज्ञाधारकपणामुळे मरी पसरण्याची थांबली, ज्यामुळे असंख्य लोकांचे प्राण वाचले.
निर्गम २९:३९ मध्ये, एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करण्याची परमेश्वराने याजकांना एक विशेष सुचना दिली होती. या प्रथेकडे विश्वासणाऱ्यांच्या गरजेचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व म्हणून पाहिले जाऊ शकते की संपूर्ण दिवसभर येशूच्या रक्ताचे सामर्थ्य आणि संरक्षणावर सतत अवलंबून राहावे.
दररोज सकाळी आपल्या स्वतःला येशूच्या रक्तासह आच्छादित करण्याद्वारे, आपण देवाच्या संरक्षणामध्ये सुरक्षा आणि आत्मविश्वासाच्या भावनेसह आपल्या दिवसाची सुरुवात करतो. विश्वासाची ही कृती आपल्याला नवीन शक्ती आणि दृढ निश्चयाने दिवसांच्या आव्हानांचा सामना करू देते, हे जाणून की आपण देवाच्या इच्छेनुसार चालत आहोत.
जसे आपण आपल्या दिवसात पुढे वाटचाल करीत राहतो, आपल्या स्वतःला येशूच्या रक्ताने आच्छादित करून, ते आपल्या जीवनात देवाच्या अटळ उपस्थितीचे पुन्हा एकदा स्मरण देण्याचे कार्य करते. जेव्हा आपण आपली रात्र देवाच्या हातात सोपवून देतो, तेव्हा आपण त्या खात्री मध्ये शांती आणि विश्रांती प्राप्त करतो की तो सतत आपल्यावर लक्ष ठेवून असेल आणि पुढील दिवसासाठी आपल्याला आवश्यक असणारी आध्यात्मिक पुनर्स्थापना पुरवेल.
कोणताही व्यक्ति किंवा परिस्थितीवर तुम्ही येशूच्या रक्तासाठी विनंती करू शकता. उदाहरणार्थ, जेव्हा तुमची लेकरे शाळा किंवा कॉलेजमध्ये जाणार असतील, तेव्हा असे बोला, "येशूच्या नावाने, मी (त्याचे नाव घ्या) यास येशूच्या रक्ताने आच्छादित करीत आहे." जेव्हा तुम्ही वाहन चालवीत असाल, तेव्हा असे बोला, "येशूच्या नावाने, मी या वाहनास, ते सर्व जे ह्यात आहेत आणि माझ्या प्रवासाला येशूच्या रक्ताने आच्छादित करीत आहे. पूर्ण सुरक्षिततेमध्ये आम्ही जाऊ आणि परत माघारी येऊ.
येशूच्या रक्तासाठी विनंती करण्यास जेव्हा तुम्ही शिकता, तेव्हा देवाने स्वतः जी शक्ती व अधिकार तुम्हांला दिला आहे ते तुम्ही घेत आहात आणि त्यास तुमच्या जीवनात कार्यान्वित करीत आहात, जसे त्याची इच्छा होती. रक्ताच्या सामर्थ्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही! म्हणून आत्मविश्वास आणि धैर्याने तुमच्या जीवनात येशूच्या रक्तासाठी विनंती करण्यास सुरुवात करा, आणि पाहा की सैतान हा पळून जात आहे!
प्रार्थना
मी माझे विचार, शब्द आणि स्वप्नमय जीवनावर येशूचे रक्त लावतो. माझ्या जीवनातील प्रत्येक जिद्दीच्या समस्या कोकऱ्याच्या रक्ताद्वारे पराभूत होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● महाविजयीठरणे● स्वतःवरच घात करू नका
● स्वामीची इच्छा
● दिवस ०५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● तुमच्या स्वप्नांना जागृत करा
● केव्हा शांत राहावे आणि केव्हा बोलावे?
● एक गोष्ट: ख्रिस्तामध्ये खरा खजिना शोधणे
टिप्पण्या