डेली मन्ना
दिवस १७ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
Sunday, 8th of December 2024
28
22
186
Categories :
उपास व प्रार्थना
अग्नीचा बाप्तिस्मा
"तो भागलेल्यांस जोर देतो, निर्बलास बळ देतो. तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करितील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत." (यशया ४०:२९-३१)
जुन्या करारात, कधीकधी अग्नीचा उपयोग देवाचे सामर्थ्य किंवा उपस्थिती दर्शविण्यासाठी केला आहे. जेव्हा एलीयाची इच्छा होती की देवाला इस्राएलाचा सत्य परमेश्वर म्हणून सिद्ध करावे, तेव्हा याव्हे हा सत्य परमेश्वर आहे हे राष्ट्रांना सिद्ध करण्यासाठी त्याने अग्नीच्या परीक्षेचा वापर केला. तो म्हणाला, "जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा" (१ राजे १८:२४). अग्नीच्या बाप्तिस्म्यास अग्नीचे सामर्थ्य किंवा नवीन सामर्थ्य असे देखील संबोधित करू शकतात. शत्रूची भाषा त्याच्या सामर्थ्याला समजते; जेव्हा जेव्हा तुम्ही अंधाराच्या शक्तींचा सामना करता, तेव्हा सामर्थ्य हे कार्यवाहीत केले पाहिजे.
एक विश्वासू आध्यात्मिकदृष्टया कमकुवत असू शकतो. जरी त्याच्याकडे देवाच्या सामर्थ्याची कमालीची महानता उपलब्ध असेल, तरी देवाबद्दल त्याच्या ज्ञानामध्ये वाढल्याशिवाय, आणि प्रार्थनेमध्ये चांगला वेळ घालविल्याशिवाय, तो विश्वासू हा शक्तिहीन असाच असेल.
देवाचा आत्मा हे "अभिषेक, अग्नि, आणि देवाचे सामर्थ्य," यास संबोधित करीत आहे. तुम्ही हे समजावे असे देखील मला वाटते की पवित्र आत्मा हो मोजमापाने दिला जातो, म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही अग्नीच्या बाप्तिस्म्यासाठी प्रार्थना करता, तुम्ही सरळपणे अभिषेक, अग्नि, आणि देवाच्या सामर्थ्याच्या मोठया मोजमापासाठी धावा करीत आहात. ख्रिस्ताने पवित्र आत्मा मोजमापाशिवाय प्राप्त केला, परंतु विश्वासणारे म्हणून, आपण आत्मा हा मोजमापाने प्राप्त केला आहे आणि आत्म्याकडून अधिक प्राप्त करीत राहू जोपर्यंत आपण ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपत वाढत नाही.
"कारण ज्याला देवाने पाठविले तो देवाची वचनें बोलतो; कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही." (योहान ३:३४)
बाप्तिस्म्याचे प्रकार
१. पाण्याचा बाप्तिस्मा
पाण्याचा बाप्तिस्मा आपल्याला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये एक करतो.
"कारण आपण यहूदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे. आणि आपण सर्व एकच आत्म्याने संचारित झालो आहो." (१ करिंथ. १२:१३)
२. अग्नीचा बाप्तिस्मा
अग्नीचा बाप्तिस्मा आपल्याला ख्रिस्ताच्या सामर्थ्यात एक करतो. अग्नीचा बाप्तिस्मा अन्य भाषेमध्ये बोलण्याच्या प्रमाणासह येतो.
"परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल." (प्रेषित. १:८)
अग्नीच्या बाप्तिस्म्याची तुम्हांला का गरज आहे?
१. तुम्हांला अग्नीच्या बाप्तिस्म्याची गरज आहे जेणेकरून तुम्हीं ख्रिस्ताच्या सुवार्तेचे प्रभावी साक्षीदार व्हावे. (प्रेषित १:८)
२. तुम्हांला अग्नीच्या बाप्तिस्म्याची गरज आहे जेणेकरून तुम्हीं शत्रूच्या हल्ल्यावर वर्चस्व मिळवू शकावे.
"देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात." (स्तोत्र. ६६:३)
३. तुम्हांला अग्नीच्या बाप्तिस्म्याची गरज आहे जेणेकरून तुम्हीं देवाच्या राज्याकरिता मोठी कृत्ये करू शकावे.
"मी तुम्हांला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करितो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो." (योहान १४:१२)
४. तुम्हांला अग्नीच्या बाप्तिस्म्याची गरज आहे जेणेकरून तुम्हीं राज्यांवर प्रभुत्व मिळवावे, अंधाराच्या कर्मांना निष्प्रभ करावे आणि वाईटाचे ओझे मोडू शकावे.
"३३ त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्व आचरले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली, ३४ अग्नीची शक्ति नाहीशी केली; ते तरवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळविली. ३५ स्त्रियांनी त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणांस अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले." (इब्री लोकांस पत्र ११:३३-३५)
५. तुम्हांला अग्नीच्या बाप्तिस्म्याची गरज आहे जेणेकरून तुम्हीं बंदिवानास स्वतंत्र करू शकावे.
"परमेश्वर म्हणतो, हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील; जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडविण्यात येईल; कारण तुजशी युद्ध करणाऱ्याबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन." (यशया ४९:२५)
६. तुम्हांला अग्नीच्या बाप्तिस्म्याची गरज आहे जेणेकरून तुम्हीं सैतानाला काढू शकावे; आणि त्यांच्या राज्यासाठी दहशत व्हावे
"आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील: ते माझ्या नावाने भुते काढतील, नव्यानव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील, व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील." (मार्क १६:१७-१८)
७. शक्तीशिवाय, भुतें हे गुप्त ठिकाणी लपतील. हे केवळ शक्तीद्वारेच त्यांना त्यांच्या लपलेल्या ठिकाणाहून हाकलले जाईल. जगण्यासाठी व विजयासाठी शक्तीची गरज आहे.
"४४ माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते माझ्या अधीन झाले; परदेशीय लोकांनी माझी खुशामत केली.
४५ परदेशीय लोक गलित झाले, ते आपल्या कोटातून कांपत कांपत बाहेर आले." (स्तोत्र. १८:४४-४५)
कोणत्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आत्म्याच्या अग्नीला विझवू शकतात?
- आत्म्याला विझवू नका. (१ थेस्सलनीका. ५:१९)
१. वासना आणि पापमय विचार (मत्तय १५:१०-११; १७-२०)
२. या जीवनाची काळजी (मार्क ४:१९)
३. प्रार्थनाहीनता (लूक १८:१)
४. क्षमाहीनता (इफिस. ४:३०)
५. खोटेपणा, भीति, शंका आणि अविश्वास (रोम. १४:२३)
आध्यात्मिक सामर्थ्याला तुम्ही कसे उत्पन्न करू शकाल?
- उपास आणि प्रार्थना करा
उपास करणे हे तुम्हांला आध्यात्मिक अधिकाराच्या उच्च स्तरात प्रवेश मिळवून देऊ शकते.
जेव्हाजेव्हा आपण उपास करीत आहोत, तेव्हा देवाबरोबर नवीन भेटीसंबंधी आपल्या स्वतःला योग्य स्थितीत आणीत आहोत. देवाबरोबर तुमची नवीन भेट झाली आहे आणि तुम्ही कमकुवतच असे राहू शकत नाही. प्रत्येक भेट नवीन अग्नीला उत्पन्न करते.
- देवाचे वचन
देवाचे वचन सामर्थ्याने भरलेले आहे, ज्या प्रत्येक वेळी तुम्ही त्याचा अभ्यास करता तेव्हा तुम्हीं सामर्थ्याच्या नवीन शक्तीला प्राप्त करता.
"कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय, कोणत्याही दुधारी तरावारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे." (इब्री. ४:१२)
देवाच्या वचनात अग्नि व सामर्थ्य आहे. देवाचे वचन हे देवाच्या आत्म्याने अभिषिक्त आहे. जर तुम्ही वचनाबरोबर वेळ घालविला, तर तुम्हीं आध्यात्मिक शक्तीला उत्पन्न कराल.
"मी म्हणालो, मी त्याचे नांव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा माझ्या हाडात कोंडलेला अग्नि जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले; मी स्वतःला आवरिता आवरिता थकलो, पण मला ते साधेना." (यिर्मया २०:९)
- स्वतःचा मृत्यू
स्वतः मेल्याशिवाय, आत्म्याचे सामर्थ्य तुमच्या जीवनात वाढू शकणार नाही. देवाचे सामर्थ्ये हे केवळ देवाच्या उद्धेशासाठी वापरले पाहिजे. जर स्वतःला वधस्तंभीला खिळिले नाही, तर देवाचे सामर्थ्य स्वार्थी उद्धेशासाठी वापरता येऊ शकते.
"मी तुम्हांला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो." (योहान १२:२४)
Bible Reading Plan : John 15-19
प्रार्थना
१. पित्या, येशूच्या नावाने मला अग्नीने बाप्तिस्मा दे.
२. पित्या, येशूच्या नावाने अत्याधिक कामें करण्यासाठी मला सक्षम कर.
३. पित्या, येशूच्या नावाने मला सामर्थ्य दे की संपत्ति मिळवावी.
४. येशूच्या नावाने मी सामर्थ्य प्राप्त करतो की सैतानी बालेकिल्ले व मर्यादेस मोडावे.
५. पित्या, येशूच्या नावाने आत्मे जिंकण्यासाठी मला नवीन अग्नि पाहिजे.
६. पित्या, येशूच्या नावाने मी माझ्या जीवनात आत्म्याच्या नऊ वरदानांच्या कार्याची इच्छा करतो. (१ करिंथ. १२:४-११)
७. पित्या, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावाने माझ्या जीवनात अग्नीचा बाप्तिस्मा प्राप्त करण्यापासून जे काहीही अडथळा करीत आहे ते उपटून टाक.
८. हे परमेश्वरा, तुझ्या अग्निद्वारे, येशूच्या नावाने माझ्या जीवनातून सर्व पापमय इच्छा आणि सवयी नष्ट केल्या जाव्यात.
९. पित्या, येशूच्या नावाने तुझ्या आत्म्याने माझे शरीर, जीव आणि आत्मा पवित्र अग्नीने शुद्ध होवो.
१०. पित्या, येशूच्या नावाने तुझ्या पवित्र आत्म्याच्या नवीन वर्षावाने मी भरले जाण्याची इच्छा करतो.
११. येशूच्या नावाने मी वाया जाणारे जीवन जगणार नाही.
१२. येशूच्या नावाने उत्तमतेसाठी अभिषेक हा मजवर आणि या ४० दिवसांच्या उपास कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकावर यावा.
२. पित्या, येशूच्या नावाने अत्याधिक कामें करण्यासाठी मला सक्षम कर.
३. पित्या, येशूच्या नावाने मला सामर्थ्य दे की संपत्ति मिळवावी.
४. येशूच्या नावाने मी सामर्थ्य प्राप्त करतो की सैतानी बालेकिल्ले व मर्यादेस मोडावे.
५. पित्या, येशूच्या नावाने आत्मे जिंकण्यासाठी मला नवीन अग्नि पाहिजे.
६. पित्या, येशूच्या नावाने मी माझ्या जीवनात आत्म्याच्या नऊ वरदानांच्या कार्याची इच्छा करतो. (१ करिंथ. १२:४-११)
७. पित्या, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावाने माझ्या जीवनात अग्नीचा बाप्तिस्मा प्राप्त करण्यापासून जे काहीही अडथळा करीत आहे ते उपटून टाक.
८. हे परमेश्वरा, तुझ्या अग्निद्वारे, येशूच्या नावाने माझ्या जीवनातून सर्व पापमय इच्छा आणि सवयी नष्ट केल्या जाव्यात.
९. पित्या, येशूच्या नावाने तुझ्या आत्म्याने माझे शरीर, जीव आणि आत्मा पवित्र अग्नीने शुद्ध होवो.
१०. पित्या, येशूच्या नावाने तुझ्या पवित्र आत्म्याच्या नवीन वर्षावाने मी भरले जाण्याची इच्छा करतो.
११. येशूच्या नावाने मी वाया जाणारे जीवन जगणार नाही.
१२. येशूच्या नावाने उत्तमतेसाठी अभिषेक हा मजवर आणि या ४० दिवसांच्या उपास कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकावर यावा.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तीन महत्वाच्या परीक्षा● विचारांच्या प्रवाहाला दिशा देणे
● त्यांनातरुणच असे पकडावे
● दोनदा मरू नका
● मानवी हृदय
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला
● मनुष्याच्या प्रशंसेपेक्षा देवाच्या पुरस्काराचा धावा करा
टिप्पण्या