१ थेस्सलनीका. ५:२३ आपल्याला सांगते की, "शांतीचा देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत." मनुष्य हा तीन-विभागीय जीव आहे. तो आत्मा आहे, त्यास जीव आहे आणि तो एका शरीरात राहतो. ह्या तिन्ही भागात अत्यंत थकवा होऊ शकतो. अत्यंत थकवा हा जीवनाच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक भागात होऊ शकतो.
त्यास अनेक दिवस, आणि काही प्रकरणात, अनेक आठवडे लागू शकतात की अत्यंत थकलेल्या अवस्थेतून सामान्य स्थितीमध्ये यावे. म्हणून, आदर्शपणे संभाव्य लक्षणे तीव्र होण्याअगोदर आपणांस त्या लवकर शोधण्याची इच्छा असते. अशा प्रकारे, परिस्थिती अत्यंत समस्याप्रधान होण्यापूर्वी तुम्ही स्वतःला काठावरून मागे खेचण्यासाठी पाऊले उचलू शकता.
आपण आता एलीया, या देवाच्या माणसाच्या जीवनाकडे पाहणार आहोत, जो पवित्र शास्त्रातील एक महत्वपूर्ण व्यक्ति होता, जो देवाचा असामान्य माणूस होता. ज्याप्रमाणे मोशे नियमशास्त्राचे प्रतिनिधित्व करतो, एलीया भविष्यवक्त्यांचे प्रतिनिधित्व करतो. रुपांतराच्या डोंगरावर येशूबरोबर मोशे व एलीयाच्या भेटीचे मोठे महत्त्व आहे. हे स्पष्ट केले गेले की नियमशास्त्र व भविष्यवक्ते दोघेही आधार देतात आणि कालवरीच्या वधस्तंभावरील येशूचे होणाऱ्या बलिदानास वैध ठरवितात.
जुन्या करारातून या महत्वाच्या दोन व्यक्तींची उपस्थिती भूतकाळ आणि येशूच्या सेवाकार्यामधील संबंधाला प्रदर्शित करते. त्यांच्या समर्थनाने दैवी योजनेस बळकटी दिली आणि संपूर्ण इतिहासात देवाच्या संदेशाचे सातत्य दर्शविले. या शक्तिशाली क्षणाने, नियमशास्त्र, भविष्यवक्ते आणि मशीहास एकत्र आणले, आणि देवाच्या अभिवचनाची पूर्तता आणि नवीन युगाच्या प्रारंभाची पुष्टी केली.
जर एलीयासारखा देवाचा महान माणूस, जो बायबलमधील भविष्यात्मक गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो, त्याने अत्यंत थकवेचा अनुभव केला, तेव्हा एक क्षणही असा विचार करू नका की तुम्ही अत्यंत थकव्यापासून मुक्त आहात- कोणीही नाही. आपण सावध असले पाहिजे आणि आपल्या असुरक्षा मान्य केल्या पाहिजेत. प्रेषित पौलाने आपल्याला इशारा दिला आहे, हे म्हणत, "म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे." (१ करिंथ. १०:१२)
बऱ्याच लोकांना वरवर चांगले वाटू शकते, परंतु जास्त वेळ वरकरणी देखावा केल्याने नुकसान होऊ शकते. आपली माणुसकी स्वीकारणे, त्याच्या मर्यादा आणि अपूर्णतेसह, आपले कल्याण राखण्यासाठी आवश्यक आहे. अत्यंत थकव्याच्या जाणिवेकडे दुर्लक्ष करणे हे मग त्या मार्गात पुढे गंभीर परिणामाकडे नेऊ शकते. धोका स्वीकारून, आणि प्रतिबंधात्मक उपाय केल्याने आपल्याला संतुलन राखण्यास आणि आपण पूर्णपणे नष्ट होण्याच्या अवस्थेत पोहचणे टाळण्यास हे साहाय्यक होऊ शकते.
३ १/२ वर्षे कळकळीने प्रार्थना केल्यावर, एलीयाने भविष्यात्मकदृष्टया दुष्काळाचा अंत घोषित केला. त्याच्या विश्वासाची साक्ष आणि देवाबरोबरचा त्याचा संबंध म्हणून, देवाचा वरदहस्त, जे देवाच्या आत्म्यास सूचित करते, तो एलीयावर आला. दैवी सामर्थ्याच्या विलक्षण प्रदर्शनात, एलीयाने आपली कंबर बांधून, त्याचा लांब झगा घट्ट आवळला, आणि एज्रेलीच्या वेशीपर्यंत अहाबापुढे धावत गेला. (१ राजा १८:४६). त्याकाळा दरम्यान, अहाबाचे रथ हे वाहतुकीस श्रेष्ठ मानले जात होते, मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या आजच्या उच्च-श्रेणीच्या वाहनांप्रमाणे.
हे महत्वाचे आहे हे ओळखणे की जेव्हा देवाचा वरदहस्त एलीयावर होता, तो तेव्हा देखील भौतिक क्षेत्रात कार्य करीत होता. तेच आपल्याला लागू होते: देवाचा आत्मा आपल्याबरोबर असू शकतो, परंतु आपण तरीही आपल्या भौतिक शरीरातून कार्य करीत असतो. जसे पौल, जो प्रेषित, याने लिहिले, "म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे." (२ करिंथ ४:१६)
प्रार्थना
पित्या, माझ्या जीवनात अत्यंत थकवा झालेली चिन्हे ओळखण्यास मला साहाय्य कर आणि प्रतिबंधात्मक उपाय करण्यास मला ज्ञान दे. जेव्हा मला गरज असेल तेव्हा मला मदत घेण्याची नम्रता दे. येशूच्या नावाने. आमेन!!
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवदूताचे साहाय्य कसे सक्रीय करावे● दिवस ३१:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● संयम आत्मसात करणे
● पहारेकरी
● तुम्ही किती विश्वसनीय आहात?
● २१ दिवस उपवासः दिवस १४
● तुमचा दिवस तुमची व्याख्या देतो
टिप्पण्या