आजच्या समाजात "आशीर्वाद" हा शब्द, एक साधारण अभिवादन म्हणून देखील, प्रासंगिकपणे नेहमी वापरला जातो. "परमेश्वर तुम्हांला आशीर्वाद देवो" हे म्हणत पुढे शिंका येणे हे सामान्य परावृत्त आहे, इतके सामान्य आणि लहानापासून शिकविले गेले आहे की त्यास अनेक लोक आशीर्वाद म्हणून विचार करीत नाही, आणि अनेकांना हे देखील माहीत नाही की ते का बोलत आहेत.
तथापि, पवित्र शास्त्राच्या दृष्टीकोनातून, आशीवार्दात मोठे महत्त्व व सामर्थ्य असते. पवित्र शास्त्रात परमेश्वर व मानव दोघेही आशीर्वाद देत आहेत, लोकांच्या भाग्यास प्रकट करणे, निश्चित करणे आणि स्थापित करीत आहेत.
बायबलमध्ये आशीर्वादाचे महत्त्व स्पष्ट आहे, जेथे परमेश्वर इस्राएली लोकांना बोलावतो-आणि आपल्याला बोलावतो- की आशीर्वाद आणि शाप, जीवन व मरण यामध्ये निवड करावी, जे त्याच्याप्रती आपला आज्ञाधारकपणा आणि त्याबरोबरच्या संबंधावर आधारित असतो. अनुवाद ३०:१५-१९ स्पष्ट करते, "पाहा, जीवन व सुख; आणि मरण व दु:ख हे आज मी तुझ्यापुढे ठेवले आहेत; तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गांनी चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ, ही आज्ञा आज मी तुला देत आहे; म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणीत होशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल; पण तुझे मन फिरले व तू ऐकले नाहीस आणि बहकून जाऊन अन्य देवांना दंडवत घातलेस व त्यांची सेवा केलीस, तर तुझा खात्रीने नाश होईल आणि यार्देन ओलांडून जो देश तू वतन करून घेण्यास जात आहेस तेथे तू फार दिवस राहणार नाहीस, हे मी आज तुला बजावून सांगतो, आकाश व पृथ्वी ह्यांना तुजविरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवले आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील."
उत्पत्ति १२:२-३ मध्ये, परमेश्वराने अब्राहामाला हे म्हणत आशीर्वाद दिला, "मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील." या दैवी आशीर्वादाने अब्राहाम व त्यांच्या वंशजांचे भाग्य परिभाषित आणि स्थापित केले.
गणना ६:२४-२६ मध्ये आणखी एक उदाहरण सापडते, जेथे परमेश्वर मोशेला आज्ञा देतो की अहरोन त्याच्या पुत्रांना सांग की इस्राएली लोकांना पुढील शब्दांनी आशीर्वाद द्यावे. "परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो; परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो; परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देवो." हा आशीर्वाद देवाचे संरक्षण, कृपा आणि त्याच्या लोकांवरील शांतीचे एक शक्तिशाली आवाहन आहे.
ज्याप्रमाणे शाप पुढील पिढ्यांमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात, तसेच आशीर्वाद पुढील पिढ्यांना देखील हस्तांतरित केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, देवाचा करार हा केवळ अब्राहामापुरता मर्यादित नव्हता, परंतु तो त्याच्या वंशजांबरोबर देखील केला गेला होता (उत्पत्ति १२:२-३). याशिवाय, निर्गम २०:६ मध्ये, परमेश्वर अभिवचन देतो, "जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो." हे देवाच्या आशीर्वादांच्या चिरस्थायी स्वरूपावर प्रकाश टाकते, जे विश्वासू राहणाऱ्यांसाठी अनेक पिढ्यांमध्ये पसरलेले आहे.
अंगीकार
माझे कान माझ्या परमेश्वर देवाची वाणी ऐकतील, आणि परमेश्वराने ज्या सर्व आशीर्वादांचे अभिवचन दिले आहे ते मजवर येईल आणि मला ओतप्रोत भरून टाकेल. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● कृपे द्वारे तारण पावलो● यहूदाच्या विश्वासघाताचे खरे कारण
● रविवारी सकाळी मंडळीमध्ये वेळेवर कसे यावे?
● स्वैराचाराच्यासामर्थ्यास मोडून काढणे-१
● ख्रिस्ता मधील तुमच्या दैवी नियतीमध्ये प्रवेश करणे
● बदलण्यासाठी उशीर हा कधीहीझालेला नाही
● अगापेप्रीति मध्ये कसे वाढावे
टिप्पण्या