ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दु:खाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली." (ईयोब ४२:१०)
ईयोबाची समृद्धी पुनर्स्थापित करण्यात आली जेव्हा त्याने त्याच्या तथाकथित मित्रांसाठी प्रार्थना व मध्यस्थी करण्याचे निवडले, जे प्रत्यक्षात 'मित्रशत्रू' सारखे होते-मित्रांच्या वेशात शत्रू. ह्या व्यक्तींनी त्याच्या संकटाच्या अत्यंत कठीण क्षणादरम्यान त्याची टीका केली, त्याचा गैरसमज केला आणि त्याचा न्याय केला होता, ज्यावेळेस, खरोखर त्यास त्यांचे साहाय्य व त्यास समजावे अशी त्याची इच्छा होती. तरीही, त्यांनी अशी कृत्ये केलेली असताना, ईयोबास या व्यक्तींसाठी प्रार्थना करण्यास सांगण्यात आले, जे क्षमा करण्याची शक्ती आणि ज्यांनी आपल्याला वेदना दिल्या आहेत त्यांच्यासाठी कृपा वाढविण्याचे महत्त्व दर्शवित आहे.
प्रभू येशूने अशाच भावनेवर जोर दिला आहे, आपल्याला आग्रह करीत की, "जे तुमचा द्वेष करतात, जे तुमचा छळ करतात त्यांना क्षमा करा" (मत्तय ५:४४). असे केल्याने, आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या मनोवृत्तीला मूर्त रूप देतो, त्याची दैवी करुणा आणि प्रीती प्रतिबिंबित करतो. ह्या निस्वार्थी कृत्याद्वारे, आपण देवाच्या घनिष्ठतेमध्ये जातो, आणि प्रीती व क्षमेच्या परिवर्तनीय शक्तीला प्रदर्शित करतो.
ही देवाची इच्छा आहे की सर्व पुरुष व स्त्रियांचे तारण व्हावे, आणि कोणाचाही नाश होऊ नये. मला विश्वास आहे की प्रत्येक मध्यस्थी करणाऱ्याला त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ परमेश्वर देईल. मला हा देखील विश्वास आहे की प्रभूकडून हे बक्षीस केवळ शारीरिकच नव्हे तर आध्यात्मिक आशीर्वादांमध्ये देखील प्रकट होऊ शकते.
म्हणूनच मी लोकांनो मध्यस्थी संघात सामील होण्यास सांगतो. अनेक लोक ह्या भविष्यात्मक मध्यस्थीला समजत नाही आणि कुरकुर करतात, त्यामुळे आशीर्वाद गमावितात. अनेकांना वाटते की जेव्हा ते इतरांसाठी मध्यस्थी करतात; तेव्हा ते काहीतरी गमावीत आहेत. वास्तवात, हे त्याच्या अगदी उलट आहे-तुम्ही प्राप्त करीत आहात.
तसेच, जेव्हा दानीएलाने त्याच्या राष्ट्रासाठी प्रार्थना केली, तो समृद्ध झाला. "हा दानीएल दारयावेशाच्या कारकिर्दीत व कोरेश पारसी ह्याच्या कारकिर्दीत उत्कर्षास पोहचला" (दानीएल ६:२८). जेव्हा आपण आपल्या सभोवती पाहतो, आणि पाहतो की आपल्या सभोवती काय घडत आहे, तेव्हा हे इतके सोपे आहे की आपल्या राष्ट्राची टीका करावी. तथापि, आपल्याला आपल्या राष्ट्राकडे विश्वासाच्या नेत्रांनी पाहण्याची गरज आहे. आपल्या राष्ट्राने देवाकडे वळावे यासाठी आपण प्रार्थना करू या. परमेश्वर तुमचे नक्कीच कल्याण करील.
प्रार्थना
लक्षात ठेवा की आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात मंगळावर/गुरुवार/शनिवार उपास करीत आहोत- दुष्काळ आपल्याला आणि आपल्या प्रियजनांना स्पर्श करणार नाही. मी तुम्हांला माझ्याबरोबर सामील होण्यासाठी विनंती करतो.
प्रत्येक प्रार्थना अस्त्र कमीत कमी २ मिनिटे वारंवार म्हणा.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
परमेश्वर पित्या, तुझ्या वचनामध्ये मला स्थापित कर, असे होवो की तुझ्या वचनाने माझ्या जीवनात फळ निर्माण करावे. शांतीच्या परमेश्वरा, तुझ्या वचनाद्वारे मला शुद्ध कर, कारण तुझे वचन हेच सत्य आहे. येशूच्या नावाने. आमेन.
पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा मी आहे, जे सर्व काही मी हाती घेईन त्यात समृद्ध होईन. (स्तोत्र १:३)
चांगले करण्याचा मी कंटाळ करणार नाही कारण मी न खचलो तर यथाकाळी माझ्या पदरी पीक पडेल. (गलती. ६:९)
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, मी विनंती करतो की तू माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या हृदयास स्पर्श कर की ख्रिस्ताचे सत्य स्वीकारावे. "त्यांना असे हृदय दे की येशू ख्रिस्ताला प्रभू, परमेश्वर आणि तारणारा म्हणून ओळखावे. त्यांना मनापासून तुझ्याकडे वळण्यास प्रेरित कर.
माझ्या खांद्यावरून प्रत्येक भार काढून टाकले जावो आणि माझ्या मानेवरील प्रत्येक जू आणि अभिषेकामुळे प्रत्येक जू नष्ट केले जाईल. (यशया १०:२७)
आर्थिक प्रगती
पित्या, मी तुझे आभार मानतो, कारण हा तूच आहे जो मला सामर्थ्य देतो की संपत्ती प्राप्त करावी. संपत्ती निर्माण करण्यासाठी सामर्थ्य हे आताच मजवर येवो. येशूच्या नावाने. (अनुवाद ८:१८)
माझा वारसा हा कायमचा असेल. विपत्काली मी लज्जित होणार नाही: आणि दुष्काळाच्या दिवसांत, मी आणि माझ्या कुटुंबाचे समाधान करण्यात येईल. (स्तोत्र ३७:१८-१९)
माझा देव आपल्या संपत्यनुरूप माझी सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील." (फिलिप्पै. ४:१९)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, पास्टर मायकल, त्यांच्या कुटुंबाचे सदस्य, संघाचे सदस्य आणि करुणा सदन सेवाकार्याशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीला समृद्ध कर.
राष्ट्र
पित्या, तुझे वचन म्हणते, राज्यकर्त्यांना त्यांच्या सन्मानाच्या उच्च पदांवर बसविणारा तूच आहे आणि नेत्यांना त्यांच्या उच्च पदांवरून काढून टाकणारा देखील तूच आहे. हे परमेश्वरा, आमच्या राष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि राज्यात योग्य पुढारी निर्माण कर. येशूच्या नावाने. आमेन.
आपल्या राष्ट्रासाठी प्रार्थना करण्यासाठी थोडा वेळ काढा.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुम्ही एका उद्देशा साठी जन्मला आहात● काहीही लपलेले नाही
● स्वयं-गौरवाचा सापळा
● सातत्याचे सामर्थ्य
● अनिश्चिततेच्या काळात उपासनेचे सामर्थ्य
● त्याच्या सिद्ध प्रितीमध्ये स्वतंत्रता प्राप्त करणे
● सात-पदरी आशीर्वाद
टिप्पण्या