एकदा संदेष्ट्यांच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गाऱ्हाणे केले; ती म्हणाली "तुझा सेवक, माझा नवरा, मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रांस दास करून नेण्यास आला आहे." (२ राजे ४:१)
एका मनुष्याची विधवा ज्याने संदेष्टा अलीशाच्या संघाबरोबर कार्य केले होते, ती अलीशाकडे विनंती करीत आहे. येथे काही महत्वाचे धडे आहेत जे आपण ह्या वचनातून प्राप्त करू शकतो.
येथे तिच्या कुटुंबात निराशा होती:
तिने अलीशाकडे आक्रोश केला. शब्द आक्रोश करणे याचा अर्थ "शोक" करणे होय; हंबरडाफोडून रडणे; शोकानेओरडणे." तिची विनंती औपचारिक नव्हती परंतु आग्रहपूर्ण, भग्नहृदयापासून होती. एक भग्न हृद्य ज्याचा मनुष्य तिरस्कार करतो परंतु परमेश्वर नाही. तुमचे भग्न हृद्य परमेश्वराकडे न्या व त्याकडे आक्रोश करा. तो खात्रीने लवकरच उत्तर देईल. स्तोत्र ५१:१७ म्हणते, "देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तूं तुच्छ मानणार नाहीस."
येथे तिच्या कुटुंबात मरण होते:
तीचा विवाह "संदेष्ट्यांच्यापुत्रांपैकी एका" बरोबर झाला होता. हीमनुष्ये संदेष्टा अलीशाच्या संघात होती की त्याच्याद्वारे इस्राएल मध्ये संदेष्टा व प्रचारक होण्यासाठी प्रशिक्षित अशी केली जावी. तीचा पती, तीचा प्रेमी, तीचा मित्र, तीचा पुरवठा करणारा, तीचे संरक्षण करणारा, हा मृत्यू मुळे तिच्यापासून काढून घेतला गेला होता. ती एक स्त्री होती जी पूर्णपणे कष्टी झालेली होती. मी ऐकले कीआत्माम्हणतो, "ते जे शोक करतात तो त्यांचे सांत्वन करेल;तो राखेच्या ऐवजी सुंदरता देईल; आणि शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल देईल. खिन्न आत्म्याच्या ऐवजी तो प्रशंसारूप वस्त्र देईल. (यशया ६१:३) येशूच्या नांवात ते प्राप्त करा.
तेथे तिच्या कुटुंबात कर्ज होते:
कारण तीचा पती हा मरून गेला होता, तीते बील भरू शकत नव्हती. त्यामुळे, तिला कर्ज दिलेले लोक तिच्या मुलांना गुलाम म्हणून घेऊन जाण्यास येणार होते म्हणजे ते कर्ज भरण्यास काम करतील. यहूदी नियमात यास परवानगी होती (लेवीय २५:३९). ती आता तिच्या पतीला मुकली होती, आता ती तिच्या पुत्रांना सुद्धा गमावणार होती. तिच्या कर्जात ती अतिशय बुडलेली होती आणि तिला हे कळत नव्हतेतिने ते कसे भरावे. तुमच्यापैकी जे हे वाचत आहेत ते फारच मोठया कर्जात आहेत. तुमचीपरीस्थिती ही बदलण्याच्या स्थितीत आहे.
तिच्या कुटुंबात येथे भक्ति होती:
तिच्या सर्व समस्या असताना (निराशा, मृत्यू, आणि मृत्यू-३ डी) सुद्धा. ती प्रभु मधील तिच्या विश्वासास धरून राहिली.
ती ज्या परिस्थती मध्ये सापडली होती त्यासाठी तिने देवाला शाप किंवा दोष दिला नाही. त्याऐवजी तिने देवाकडे तीचा सोडविणारा असे पाहिले. प्रियांनो, जर तुम्ही देवाला शाप दिला असेन, ज्या वाईट परिस्थिती मध्ये तुम्ही आहात त्यासाठी त्यास दोष दिला असेन, तर तुम्हाला क्षमा करण्यास त्याकडे विनंती करा. तीन दिवस उपास व प्रार्थना करा व त्याच्या समर्थ हाताखाली स्वतःला नम्र करा. परमेश्वराबरोबर कधीही औपचारिक असे राहू नका.
कधीकधी, काही जेव्हा निराशेच्या कठीण क्षणापर्यंत पोहचतात, जग, शरीर, सैतान हे सर्व तुम्हाला सांगतील की देव हे पाहत नाही आणि त्यास काळजी नाही. वास्तविकता ही आहे, तो अवश्य काळजी करतो. तुमची रोजची भक्ति, तुमची कौटुंबिक भक्ति मध्ये प्रगती करा.करुणा सदन येथे उपासनेला येणे चुकवू नका. तो परमेश्वर आहे जो गुप्तते मध्ये पाहतो आणि उघडपणे पुरस्कार देतो.
हा दररोज चा मान्ना जितक्या लोकांना तुम्ही सांगू शकता तितक्यांना सांगा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहे. तुमच्या वतीने देवाचा हात कार्य करीत आहे हे तुम्ही पाहाल.
प्रार्थना
१.आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात,लाभा साठी मला शिकीव. ज्या मार्गाने मी जावे त्यात मला मार्गदर्शन कर. (यशया ४८:१७)
कौटुंबिक तारण
धन्यवादीत पवित्र आत्म्या, माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांना प्रचार करण्यास मला समर्थ कर. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
पित्या, येशूच्या नांवात मी तुला धन्यवाद देतो की तूं मजसाठी व माझ्या कुटुंबासाठी द्वार उघडेल जे कोणी बंद करू शकणार नाही. (प्रकटीकरण ३:८)
चर्च वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मीप्रार्थना करतो की, हजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम च्या प्रत्यक्ष प्रसारणकडे यावेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. असे होवो की त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नाव उंचाविले जावो व त्यास गौरव मिळो.
देश
पित्या, येशूच्या नांवात, व येशूच्या रक्ता द्वारे, दुष्टांच्या डेऱ्यांमध्ये तुझा बदला मोकळा कर आणि एक राष्ट्र म्हणून आमचे गमाविलेले गौरव पुनर्स्थापित कर.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ख्रिस्ता समान होणे● आत्म्यात उत्सुक असा
● दिवस २५:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● एक घुंगरू व एक डाळिंब
● महान पुरुष आणि स्त्रिया का पतन पावतात - ६ (आपल्या विचारांना बंदी बनवने)
● समाधानाची शास्वती दिली गेली आहे
● पृथ्वीचे मीठ
टिप्पण्या