विजयी होणे उलटपक्षी, ज्याने आपणांवर प्रीति केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो. (रोम ८:३७)
कोणी असा विचार केला असता कीबेथलेहम मधील एक मेंढपाळ मुलगा एका कसलेल्या योद्ध्याला जो त्याच्या उंचीपेक्षा जवळजवळ दुप्पट होता त्यास पराभूत करेन? किंवा, त्याविषयाबाबत, की तो एक राजा होईल व त्याच्या राष्ट्राला महान असे करेन? परमेश्वराने ते केले.
परमेश्वराने जेव्हा दावीद कडे पाहिले तेव्हा त्याने मेंढपाळ याच्याही पलीकडे पाहिले व एक योद्धा व राजा च्या अंत:करणास पाहिले.महानतेसाठीअसणारीयोग्यताजीदावीद मध्ये होती ती परमेश्वराला ठाऊक होती. तसे पाहिले तर, त्यानेच ती तेथे ठेवली होती. परमेश्वरयोग्यता पाहतो जे पाहण्यास प्रत्येकजण चुकतात. उठा; निराश होऊ नका, धैर्य सोडू नका, येथे तुमच्याआत परमेश्वराने दिलेली योग्यता आहे.
हे असू शकते की आता सध्या तुम्ही फारच बिकट परिस्थितीतून जात असाल. परमेश्वराला ठाऊक आहे की तुम्ही कशाला हाताळू शकता कारण त्यास ठाऊक आहे की जे त्याने तुमच्याआत ठेवले आहे. जितके अधिक तुम्ही तुमचे जीवन देवाच्या उद्देशानुसार जुळविता, तो तुमच्या नियतीकडे तुम्हाला तितकेच अधिकपणे नेण्यास सुरुवात करेल.
लक्षात ठेवा की नवीन स्तर नवीन सैतान आणतो. जे अडथळे व आवाहने तुमच्यासमोर आहेत त्यांना घाबरू नका. तुमच्या शत्रूचे दिसणारे क्षेत्र व शक्तिवरून घाबरून जाऊ नका. तुमच्या शत्रूचे आकारमान हेतुमच्या योग्यतेमध्ये देवाच्या आत्मविश्वासाच्या आकाराचे परिमाण आहे-त्याच्या सामर्थ्यामध्ये.
हालेलुयामोठयाने बोला! परमेश्वरावर भरंवसा ठेवा. तुम्हीज्या आवाहनांना तोंड देत आहात त्यासाठी तो तुमचे चारित्र्य व शक्ति तुल्यबळ करेल. तो तुम्हाला महाविजयी ठरवेल!
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळ प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, तर कोण माझा विरोधी होऊ शकतो? प्रभु येशू ख्रिस्ता द्वारे जो मजवर प्रेम करतो मी महाविजयी ठरतो.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, तुझे वचन म्हणते की, "कारण ईश्वरप्रेरित दु:ख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दु:ख मरणास कारणीभूत होते" (२ करिंथ ७:१०). फक्त तूच आमचे डोळे या सत्यासाठी उघडू शकतो की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना ईश्वरप्रेरित दु:खाच्या भावनेसह तुझ्या आत्म्याचा स्पर्श कर की त्यांनी पश्चाताप करावा, तुला शरण यावे आणि त्यांचे तारण व्हावे. येशूच्या नावाने.
आर्थिक प्रगती
पित्या, येशूच्या नावाने मला लाभहीन श्रम आणि भ्रमित कार्यांपासून मुक्त कर.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की थेट प्रक्षेपण देशभरातील हजारो कुटुंबांपर्यंत पोहचावे. तुला प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखण्यासाठी त्यांना आकर्षित कर. जुळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वचन, उपासना आणि प्रार्थनेमध्ये वाढीव.
राष्ट्र
पित्या, येशूच्या नावाने, आपल्या राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुझा आत्मा सामर्थ्याने कार्यरत होण्यासाठी मी प्रार्थना करतो, ज्यामुळे चर्चची सतत वाढ व विस्तार होईल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● केवळ इतरत्र धावू नका● विश्वास जो जय मिळवितो
● दिवस ३१:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आध्यात्मिक दरवाजे बंद करणे
● छाटण्याचा समय-३
● देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा
● स्वैराचारास पूर्ण उपाय
टिप्पण्या