"त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो." (१ पेत्र ५:७)
पवित्र शास्र मानवी जीवनाचे वास्तववादी चित्र रंगविते. परीक्षा, संकटे, किंवा चिंतेवाचून प्रवासाचे ते आश्वासन देत नाही. तरी, ते तथापि, आपल्याला सुंदर आश्वासन देते,-जेव्हा आपण चिंतेला सामोरे जातो, तेव्हा आपण त्यास देवावर टाकू शकतो. हे गहन आश्वासन आपल्या संघर्षाचे रुपांतर करते, आणि चिंतेला शांती आणि निराशेला आशेमध्ये बदलते.
येथे नेहमीच काही गोष्टी असतात ज्या आपल्या हाताबाहेर असतात, परतू ते देवाच्या हातात असतात. आंतरराष्ट्रीय सुवार्ता प्रसाराच्या माझ्या पहिल्या प्रवासादरम्यान, खरे सांगायचे तर, मी उत्साहित होतो. जे जोडपे माझ्या प्रवासासाठी आर्थिक साहाय्य देत होते त्यांनी मला बोलाविले आणि सांगितले की व्हिसा अर्जामध्ये अडथळा आला आहे. यासंबंधात प्रार्थना करण्यासाठी त्यांनी मला सांगितले. सर्व गोष्टींबद्दल चिंता ही माझ्या मनात जलद निर्माण होऊ लागली. या विषयाबाबत मी प्रार्थना करू लागलो. जवळजवळ २ तासानंतर, अचानकपणे, मी पवित्र आत्म्याची हळुवार वाणी हे म्हणताना ऐकली, "मुला, मी त्याची काळजी घेतली आहे." सर्व चिंता माझ्यामधून निघून गेली, आणि त्याची शांती जी सर्व समजेपलीकडील आहे त्याने मजवर ताबा घेतला.
"ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो." (यशया २६:३)
जीवनाच्या समस्या ह्या आपल्याकडून अधिक मागणी करतात-शारीरिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक. तरीही, जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये या गोष्टींना देवाकडे न्यायला शिकतो, आणि संपूर्ण दिवसभर आपले लक्ष्य त्यावर केंद्रित करतो, हा विश्वास ठेवून की तो काळजी घेईल, तेव्हा आपल्याला शांती मिळेल. मला या गीताचे आठवण होते, "तुझ्या स्वतःला माझ्यामध्ये संपुष्टात आण, आणि तू स्वतःला प्राप्त करशील. (संपूर्ण दिवसभर हे गीत गात राहा.)
आपण जेव्हा आपल्या चिंता देवावर टाकतो, तेव्हा आपण आपली मने त्याच्याबरोबर एक करतो, आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करतो. आणि विश्वासाच्या या ठिकाणी, सिद्ध शांती देण्याचे देव आश्वासन देतो-शांती जी सर्व समजेपलीकडील आहे, शांती जी ख्रिस्त येशूमध्ये आपले अंत:करण व मनाचे रक्षण करण्याचे कार्य करते. (फिलिप्पै. ४:७)
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या,तुझे वचन म्हणते, प्रत्येक झाड जे माझ्या स्वर्गातील पित्याने लाविलेले नाही, ते उपटून टाकण्यात येईल." माझ्या तुझ्याबरोबर चालण्यामध्ये जे काही अडथळा करीत आहे ते सर्व उपटून टाक. मी माझी प्रार्थनेची वेळी येशूच्यारक्ता द्वारे आच्छादित करीत आहे.
पित्या, मला कृपा पुरीव की दररोज प्रार्थना करावी. जेव्हा मी तुझ्याजवळ येतो, माझ्याजवळ ये जे तूं येशूच्या नांवात आश्वासन दिले आहे. आमेन.
कौटुंबिक तारण
धन्यवादीत पवित्र आत्म्या, माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांना सुवार्ता कशी सांगावी हे मला विशेषकरून दाखव. मला समर्थ कर, हे परमेश्वरा. योग्य क्षणी, तुझ्याबद्दल सांगण्यासाठी संधी प्रगट कर. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
प्रत्येक बी जे मी पेरले आहे ते परमेश्वरा द्वारे स्मरण केले जाईल. म्हणून माझ्या जीवनातील प्रत्येकअशक्य गोष्टी परमेश्वरा द्वारे बदलल्या जातील.येशूच्या नांवात.
केएसएम चर्च वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो कीहजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम चे प्रत्यक्ष प्रसारण पाहण्यास जुडतील.त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नांव हे उंचाविले व गौरविले जाईल.
देश
पित्या,मी प्रार्थना करतो की भारत देशातील प्रत्येक शहर व राज्यातील लोकांची अंत:करणे ही तुझ्याकडे वळावी. त्यांनी त्यांच्या पापांचा पश्चाताप करावा व येशूला त्यांचा प्रभु व उद्धारकर्ता असे कबूल करावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ०२ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास
● तुम्ही मत्सरास कसे हाताळाल
● इतरांबरोबर शांतीमध्ये राहा
● विश्वासात किंवा भयात
● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
● वाट पाहण्यामुळे एका राष्ट्राचा उद्धार केला गेला
टिप्पण्या