हेरोद राजाच्या काळात यहूदीयातील बेथलेहमात येशूच्या जन्मानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की, यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहो. (मत्तय २:१-२)
लहान बाळ असताना माझी आई ज्ञानी लोकांविषयी म्हणताना मी नेहमी ऐकत असे की त्यांनी प्रभु येशूला भेटण्यासाठी किती लांबचा प्रवास कसा केला होता. माझ्या लहान मनाने, मी नेहमी ही कल्पना करीत असे की ज्ञानी लोकांनी त्यांच्या उंटावर प्रवास कसा केला असेन.
जेव्हा मी पवित्र शास्त्राच्या ह्या भागावर मनन करीत होतो, पवित्र आत्म्याने मजवर जीवनाचे काही धडे बिंबविले जे आपण सर्व जण ज्ञानी लोकांकडून शिकू शकतो जे आपल्या प्रभु येशूला भेटण्यास आले होते.
१. प्रतिष्ठित लोकांसाठी हे रूढीगत होते की नवीन शासकाचे स्वागत व अभिनंदन करावे. बायबल आपल्याला सांगते की ज्ञानी लोक हे परराष्ट्रीय लोक होते. प्रभु नेहमी अनपेक्षित ठिकाणाहून अनुयायी लोकांना बोलावितो.
२. खरे ज्ञानी पुरुष व स्त्रिया हे प्रभूचा शोध घेणारे आहेत. त्यांना ठाऊक आहे की जगाचे ज्ञान हे केवळ मूर्खपणा आहे व क्षणात विलयास जाणारे आहे. ते हे पूर्णपणे जाणून आहे की प्रभूचा व त्याचा मार्गाचा शोध घेण्यामध्येच खरे ज्ञान लपलेले आहे.
३. खरे ज्ञानी लोक हे उपासक आहेत. तो ज्याने सर्व काही निर्माण केले त्याचीच ते उपासना करतात. ते त्याची उपासना त्यांच्या साधनसामग्रीसह (त्यांच्या मालमत्ते), त्यांचा वेळ व योग्यते सह करतात.
४. जेव्हा ज्ञानी लोकांनी प्रभु येशू विषयी चौकशी केली ज्याची उपासना करण्यासाठी त्यांनी प्रवास केला होता.
"तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली. आणि त्यांना बेथलेहेमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा, व तुम्हांला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पाहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो, जेथे तो बालक होता, त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला." (मत्तय २:७-९)
ज्ञानी लोकांना स्वप्नांत चेतावणी देण्यात आली की हेरोदाकडे परत जाऊ नये कारण तो त्या नवीन राजाला जिवंत मारण्याची योजना करीत आहे. ज्ञानी लोकांना ठाऊक होते की कोणाबरोबर संबंध जोडावे. त्यांना ठाऊक होते की योग्य संबंध त्यांना घडवेल व चुकीचे संबंध त्यांना नष्ट करू शकते.
५. ज्ञानी लोकांना ठाऊक होते की परमेश्वरापासून कोणीही दूर नाही. परमेश्वर प्रत्येक प्रयत्न करेल की लोकांपर्यंत पोहोचावे जे त्याच्यापासून दूर आहेत. ह्या प्रकरणात, परमेश्वराने पूर्वेकडील ताऱ्याचा उपयोग केला की त्यांना त्याच्याकडे येण्यास मार्गदर्शन करावे. जरी प्रवास हा सोपा नव्हता तरी त्यांना ठाऊक होते की त्यांना दैवीरित्या मार्गदर्शन मिळाले आहे.
परमेश्वर कोणासाठी प्रयत्न करण्याचे सोडत नाही. हे समजा, जे सर्व काही तुम्ही सध्याच्या घडीला तोंड देत आहात, सर्व गोष्टी ज्या तुमच्या सभोवती घडत आहेत ह्या शेवटी तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करतील ज्याने तुम्हाला बोलाविले आहे कारण परमेश्वराला खोलवर हे ठाऊक आहे की तुम्ही त्याजवर प्रेम करता व त्याची तुम्हाला गरज आहे.
मला खात्री आहे की ज्ञानी लोकांकडून ह्या मौल्यवान गोष्टी तुम्हाला परमेश्वरा बरोबर अधिक परिश्रमाने चालण्यास साहाय्य करतील. टिप्पणी मध्ये मला अवश्य ह्याची माहिती दया की ज्ञानी लोकांकडून तुम्ही कोणत्या अधिक गोष्टी शिकला आहात.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
प्रभु येशू, तूं माझे ज्ञान आहे. मी विनंती करीत आहे की मी माझ्या संपूर्ण जीवनभर तुझ्या मार्गात चालण्यास शिकावे.
पित्या, मला योग्य लोकांद्वारे घेरून ठेव व त्यांच्याशी जोड. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
हे परमेश्वरा, असे होवो की तुझा आत्मा माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांनाअपराधी आहोत असे दाखवो कीज्यांनी अजून तारण हे प्राप्त केलेले नाही आणि त्यांना कृपापुरीव की त्यांनी तुझ्या तारणाचे दान स्वीकारावे.
हे परमेश्वरा, असे होवो कीतुझा चांगुलपणा माझ्या कुटुंबियांना पश्चाताप करण्यास व प्रभु येशूला त्यांचा प्रभु व तारणारा असे स्वीकारण्याकडे न्यावे.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
अवज्ञेचेप्रत्येकशारीरिक कार्ये जे माझ्या जीवनात उजाडपणास वाढवीत आहे ते आज येशूच्या नांवात रद्द केले जावो.
केएसएम चर्च वाढ
पित्या, येशूच्या नांवात,असे होवो की तुझा आत्मा प्रत्येक पास्टर, गट पर्यवेक्षक व केएसएम चर्च चे जे-१२ पुढारी यांच्यावर येवो. आध्यात्मिकदृष्टया वाढ होण्यास व तुझी सेवा करण्यास त्यांना प्रेरणा दे.
देश
पित्या, येशूच्या नांवात,आमच्या देशाच्या विरोधातील दुष्टांच्या प्रत्येक वाईट कल्पनाह्या नष्ट होवोत आणि ज्याचा परिणाम आमच्या देशाचा विकास व प्रगती मध्येहोवो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● भटकण्याचे सोडा● एक घुंगरू व एक डाळिंब
● २१ दिवस उपवासः दिवस १७
● परमेश्वराला प्रथम स्थान देणे# २
● विश्वास काय आहे?
● दिवस १७ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
टिप्पण्या