डेली मन्ना
पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणात्मक इतर दानास मिळविण्याचा मार्ग मिळवा
Wednesday, 7th of June 2023
22
23
847
Categories :
पवित्र आत्म्याची भेट
"कारण एखादयाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते एकाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखादयाला अद्भुत कार्ये करण्याची शक्ति; एखादयाला संदेश देण्याची शक्ति; एखादयाला आत्मे ओळखण्याची शक्ति; एखादयाला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ति व एखादयाला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ति मिळते"(१ करिंथ १२:८, १०)
अन्य भाषेत प्रार्थना करणे हे प्रत्यक्षात तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याच्या इतर प्रकटीकरणात्मक दाना ला मोकळे करते, जसे ज्ञानाचे वचन, विद्येचे वचन, संदेश देण्याची शक्ति; आत्मे ओळखण्याची शक्ति आहेत.
लक्षात ठेवा तुम्ही स्वाभाविक स्तरावर प्रार्थना करीत नाहीत, परंतु त्याऐवजी केवळ आध्यात्मिक बाबतीत व्यस्त आहात. आश्चर्य करू नका, जर जेव्हा अन्य भाषे मध्ये प्रार्थना करताना, पवित्र आत्मा तुम्हाला कशाविषयी तरी अलौकिक समज देतो, तुम्हाला लोकांसाठी प्रार्थना करण्यास मार्गदर्शन करतो, आणि लोक, परिस्थिती व क्षेत्रावर सुद्धा स्पष्टता जाहीर करतो ज्यासाठी प्रार्थना करण्यास व आध्यात्मिक बालेकिल्ले जे त्यास प्रभावित करीत आहेत ते मोडण्यास तुम्हाला समर्थ करतो.
खबरदारी साठी एक सुचना: जेव्हा तुम्ही अन्य भाषे मध्ये प्रार्थना करण्यास सुरु करता, प्रारंभी तुम्ही काहीही घडत आहे हे कदाचित सुरुवातीला पाहू शकणार नाही. धैर्य सोडू नका.
अमेरिकेचा शोध घेण्याच्या जलप्रवासात, जेव्हा दिवसामागून दिवस कोणतीही भूमि दिसत नव्हती व पुन्हा पुन्हा त्याच्या खलाश्यांनी बंड करण्याची धमकी दिली व त्यास माघारी जाण्यास पटविण्याचा प्रयत्न केला. कोलंबस ने त्यांच्या विनवणीस ऐकण्यास नकार दिला व प्रतिदिवशी जहाजाच्या मोठया पुस्तकात दोन शब्द लिहित होता. "जलप्रवास पूर्ण झाला!"
तसेच, कारण की काहीही घडत नाही तेव्हा पवित्र आत्म्याच्या दानाला खोटे ठरवू लागू नका (दु:खद आहे जसे अनेक जण करतात). हे समजा, की प्रथम, एक पाया हा बनविला जातो. अन्य भाषे मध्ये नियमितपणे प्रार्थना करण्यास विश्वासू राहा आणि तुम्ही पवित्र आत्म्याची दाने वादळा सारखी प्रगट होताना पाहाल.
एक देवाचा माणूस होता ज्याने एकदा अन्य भाषे मध्ये अनेक तास प्रार्थना केल्यानंतर तो चकित झाला की एक दुष्ट आत्मा त्याच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर उभा राहिलेला पाहिला आणि त्यांचे कर्कश रडणे सुद्धा ऐकले. त्याच्यासाठी हा एक भीतीदायक नवीन अनुभव होता आणि त्यास हे ठाऊक नव्हते की आत्म्याची ओळख करणारा आत्मा कार्य करीत होता. आणखी एका प्रसंगी, आध्यात्मिक चेतने द्वारे आध्यात्मिक स्तरात वचन ऐकून तो चकित झाला. तेव्हा त्यास हे ठाऊक नव्हते की ज्ञानाचे वचन हे त्यावेळेस कार्यरत होते. नंतर, एका रविवारच्या उपासने मध्ये, तो त्याच्या चर्च मध्ये एका नवीन व्यक्तीला भेटण्यास गेला. एका स्त्रीवर एका विशेष पापाचे शब्द लिहिलेले आहे हे पाहून तो चकित झाला. हे ज्ञानाचे विलक्षण वचन कार्यरत होते.
डेव रॉबरसन ने (कौटुंबिक प्रार्थना केंद्र, टूल्सा), तीन महिने दररोज आठ तास अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्यात घालवले. एके दिवशी तो चर्च मध्ये बसला होता, परमेश्वराने त्याचे आध्यात्मिक डोळे उघडले की कंबरेकडील खोबण च्या एक्स-रे फोटो सारखे काही पाहिले. खोबण मध्ये काळा पदार्थ होता जो ढुंगणाच्या सभोवती होता, जो पाया पर्यंत तीन ते चार इंच पर्यंत गेला होता. त्यास आत्म्या द्वारे हे ठाऊक होते की हे त्या वयस्कर स्त्री साठी होते जी त्याच्या बाजूला बसलेली होती.
जेव्हा तो बाजूला वळला हे सांगण्यास की परमेश्वराने त्यास काय दाखविले आहे, शब्द "सांधेदुखी" त्याच्या मुखातून बाहेर पडले. तिने ते बरोबर आहे असे म्हटले कारण डॉक्टर च्या रिपोर्ट मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला होता. जेव्हा डेव ने प्रार्थना केली, आणि येशूच्या नावाच्या अगदी प्रथम उल्लेख वेळी, स्त्रीचा लहान पाय कडाडला व वाढला; तो अचानक मोठा झाला जोपर्यंत इतर पाया सारखा झाला नाही. स्त्री क्षणात, पूर्णपणे बरी झाली होती.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
जेव्हा मी अन्य भाषे मध्ये बोलतो, मी येशूच्या नांवात आदेश व घोषणा देतो की ज्ञानाचे वचन, विद्येचे वचन, संदेश देण्याची शक्ति; आत्मे ओळखण्याच्या शक्तीचे दान हे माझ्यामध्ये व माझ्याद्वारे सुरु होईल व कार्य करेल.
कुटुंबाचे तारण
पित्या, कृपा करून माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या पुढेजा व प्रत्येक उंचसखल मार्ग सरळ कर व प्रत्येकखडबडीत मार्ग सपाट कर.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
पित्या, जसे शिष्य गेले व साक्षी द्वारे परत आले की सर्व गोष्टी त्यांच्या अधीन झाल्या आहेत; मला सुद्धा यश व विजयाच्या साक्षी सह परत येऊ दे.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो कीहजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम चे प्रत्यक्ष प्रसारण पाहण्यास जुडतील.त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नांव हे उंचाविले व गौरविले जाईल.
देश
पित्या, येशूच्या नांवात,आणि येशूच्या रक्ता द्वारे, तुझा बदला दुष्टांच्या डेऱ्या मध्ये मोकळा कर आणि एक राष्ट्र म्हणून आमचे गमाविलेले गौरव पुनर्स्थापित कर. असे होवो की तुझी शांतिआमच्या देशावर राज्य करो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● उपासाचे जीवन-बदलणारे लाभ● कलंकित करणाऱ्या पापासाठी अद्भुत कृपेची आवश्यकता आहे
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती
● विश्वासाद्वारे कृपा प्राप्त करणे
● विश्वासणाऱ्यांचे राजकीय याजकगण
● विश्वासात परीक्षा
● धोक्याची सुचना
टिप्पण्या