आणि अब्राहामाने त्या ठिकाणाचे नांव याव्हे-यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेविले; त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. (उत्पत्ति २२:१४)
मी जेव्हा प्रभूकडे वळलो, मला आठवते की गीत गात होतो, "यहोवा-यिरे, माझा पुरवठा करणारा.....". संपूर्ण वर्षभर परमेश्वराचे नांव 'यहोवा-यिरे' माझ्या जीवनात एक विशेष स्थान ठेवून राहते.
बायबलचे अगदी सर्वात पहिले पुस्तक, उत्पत्ति मध्ये, अब्राहाम हा त्याचा एकुलता एक पुत्र इसहाकचे वेदीवर अर्पण करणारच होता, जी मोरिया प्रदेशात एका पर्वतावर परमेश्वराच्या आज्ञेने तयार केली होती.
"तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहाम यास म्हटले, बाबा! तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पाहा, विस्तव व लाकडे आहेत पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राहाम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल; आणि ते दोघे बरोबर चालले." (उत्पत्ति २२:७-८)
अब्राहाम जेव्हा त्याच्या पुत्राचे अर्पण करणारच होता, परमेश्वराने त्यास थांबविले व त्यास झुडुपात अडकलेला एक एडका दाखविला आणि त्यास म्हटले की मुला ऐवजी त्याचा वापर कर. परमेश्वराने त्या एडक्याला जवळच्या ठिकाणी अगोदरच ठेवले होते, हे जाणून की त्यास इसहाक ऐवजी बदली ची गरज लागणार आहे.
अब्राहामाने त्या ठिकाणाचे नांव, "यहोवा पुरवठा करेल" हे ठेवले. याचा अर्थ गरजेची जाण होण्याअगोदर तरतूद करणे किंवा काळजी घेणे आहे.
आपण आज फारच अनिश्चितच जगात राहत आहोत. सर्व काही जसे घसरणाऱ्या वाळूवर बांधल्यासारखे आहे. ह्या जगात आपल्याला केवळ एकच स्थिरांक आहे ते परमेश्वर व त्याचे वचन. मी पाहत आहे की तुम्हांला गरज भासण्याअगोदर परमेश्वर तुमची व तुमच्या प्रियजनांसाठी उत्तरे तयार करीत आहे. जसे वडील व आई त्यांच्या लेकरांसाठी अगोदरच सर्व तयारी करतात, परमेश्वर काहीतरी अद्भुत तुमच्यासाठी तयार करीत आहे. हे वचन प्राप्त करा!
आता मला तुम्हाला हे दाखवू दया की तुम्ही तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनात हे वचन कसे प्रगट करू शकता. माझ्याबरोबर यशया ५८:११ कडे वळा.
"परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षणसमयी तुझ्या जिवांस तृप्त करील, तुझ्या हाडांस मजबूत करील; तूं भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील; पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील." (यशया ५८:११)
तुमच्या दैनंदिन जीवनाच्या कार्यात परमेश्वरास तुम्हां मार्गदर्शन करू दया, आणि मग त्याचा अद्भुत पुरवठा तुमच्या जीवनात दररोज दिसेल. लक्षात ठेवा, तो यहोवा-यिरे आहे!
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळ प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, जो माझ्या पावलांना मार्गदर्शन देतो. मला कधीही उणीव भासणार नाही. येशूच्या नांवात.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, तुझे वचन म्हणते की, "कारण ईश्वरप्रेरित दु:ख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दु:ख मरणास कारणीभूत होते" (२ करिंथ ७:१०). फक्त तूच आमचे डोळे या सत्यासाठी उघडू शकतो की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना ईश्वरप्रेरित दु:खाच्या भावनेसह तुझ्या आत्म्याचा स्पर्श कर की त्यांनी पश्चाताप करावा, तुला शरण यावे आणि त्यांचे तारण व्हावे. येशूच्या नावाने.
आर्थिक प्रगती
पित्या, येशूच्या नावाने मला लाभहीन श्रम आणि भ्रमित कार्यांपासून मुक्त कर.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की थेट प्रक्षेपण देशभरातील हजारो कुटुंबांपर्यंत पोहचावे. तुला प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखण्यासाठी त्यांना आकर्षित कर. जुळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वचन, उपासना आणि प्रार्थनेमध्ये वाढीव.
राष्ट्र
पित्या, येशूच्या नावाने, आपल्या राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुझा आत्मा सामर्थ्याने कार्यरत होण्यासाठी मी प्रार्थना करतो, ज्यामुळे चर्चची सतत वाढ व विस्तार होईल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● भूतकाळातील कपाट उघडणे● देवाच्या कृपेवरून सामर्थ्य मिळविणे
● दिवस २९:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● तुम्ही मत्सरास कसे हाताळाल
● चर्चला न जाता चर्च ऑनलाईन पाहणे ठीक आहे काय?
● दानीएलाचा उपास
● भिन्नता ही स्पष्ट आहे
टिप्पण्या