तुम्ही तुमच्या जीवनात निर्णय घेतला आहे काय केवळ मागेचराहावे? हे अनेकांमध्ये निराशा आणते ज्यांना खरेच वाटते की चांगल्या साठी बदलावे.
अशा प्रकारच्या अविचल अवस्थेसाठी एक कारण हे की अनेक लोक केवळ बाह्य बदल करण्यावरच केंद्रित असतात. जर तुम्हाला कायमच्या बदलाची इच्छा आहे, तुम्हालाखोलवर कार्य करण्याची गरज आहे- तुमच्या हृदयावर कार्य करा.
मग तो (येशू) हे म्हणत बोलला: "पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला, आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले .......काही खडकाळावर पडले, काही कांटेरी झाडांमध्ये पडले,......काही चांगल्या जमिनीत पडले. याला कान आहेत तो ऐको. (मत्तय १३: ३-९)
प्रभु येशूने मानवी हृदयास माती असे संबोधले. वरीलवचनात, प्रभु येशूने 4 प्रकार ओळखले:
१. वाटेवर
२. खडकाळ
३. काटेरी
४. चांगली जमीन
ही चार प्रकारची जमीन ४ प्रकारच्या मानवी हृदयास दर्शविते. पहिला सिद्धांत जो आपल्याला समजण्याची गरज आहे तो हा की, जे काही जमिनीत पेरले जाते ते काही अंशापर्यंत वाढते. आणि म्हणून, हे मानवी हृदयात सुद्धा तसेच आहे-तुमचे हृदय त्यास वाढविते जे काही त्यात पेरले जाते.
जर तुम्ही नागडे चित्र आणि इतर अशुद्ध गोष्टी पेरत असाल, त्या गोष्टी ह्या वाढतील. जर तुम्ही नकारात्मकता आणि कटुता पेरता, तेच उत्पन्न जे तुम्ही प्राप्त कराल.
दुसरे, आपल्याला आपल्या हृदयाच्याअवस्थेकडे निरंतर लक्ष द्यावयाचे आहे. जेव्हा असे दिसते की आपण परमेश्वरापासून दूर जात आहोत, आपल्याला तातडीच्या गोष्टी करण्याची गरज आहे की आपल्या हृदयाच्या अवस्थेच्या बाबतीत लवकर कार्य करावे यासाठी की जे चांगले बी हे पेरले आहे ते व्यर्थ जाऊ नये.
आज, आपल्या स्वतःला विचारा, "मी कोणत्या प्रकारची जमीन आहे?" तुमच्यासाठीह्या प्रश्नाचे इतर कोणीही उत्तर देऊ शकत नाही-केवळ तुम्हीच.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मला पारख दे की माझ्या आत्म्यात योग्य गोष्टी पेराव्या. पित्या, तुझे वचन म्हणते, "आत्मा गहन गोष्टींचा शोध घेतो." माझे हृदय तपास आणि त्या सर्व गोष्टींना उपटून टाक जे तुला अप्रसन्न करतात. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
धन्यवादित पवित्र आत्म्या, मलाविशेषकरून दाखव की माझ्या कुटुंबाच्या प्रत्येकसदस्यांना वचन कसे प्रचार करू. मला समर्थ कर प्रभो. योग्य वेळी, तुझ्याविषयी सांगण्यासाठी संधी प्रगट कर.येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
प्रत्येक बी जे मी पेरले आहे तेप्रभु द्वारे स्मरण करण्यात येईल. म्हणून, माझ्या जीवनातील कोणतीही अशक्य परिस्थिती प्रभु द्वारे बदलली जाईल. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मीप्रार्थना करतो की, हजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम च्या प्रत्यक्ष प्रसारणकडे यावेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. असे होवो की त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे.त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नाव उंचाविले जावो व त्यास गौरव मिळो.
देश
पित्या,येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की भारत देशाच्या प्रत्येक शहर व राज्यातील लोकांची हृदये तुझ्याकडे वळो. त्यांनी त्यांच्या पापाचा पश्चाताप करावा व येशूला त्यांचा प्रभु व तारणारा असे स्वीकारावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अगापेप्रीति मध्ये वाढणे● हन्ना च्या जीवनाकडून शिकवण
● रविवारी सकाळी मंडळीमध्ये वेळेवर कसे यावे?
● प्रार्थने मध्ये अडथळ्यांवर कशी मात करावी
● तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका
● कटूपणाची पीडा
● एक क्षेत्र ज्यामध्ये सैतान तुम्हांला अधिक अडथळा आणतो
टिप्पण्या