आकाशाचा उत्पन्नकर्ता तोच देव,
पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच;
त्याने तिची स्थापना केली;
त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही;
तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली;
हा परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर आहे; अन्य कोणी नव्हे. (यशया ४५: १८)
परमेश्वराने पृथ्वीला व्यर्थ बनविले नाही. परमेश्वर हा उद्देशाचा परमेश्वर आहे. परमेश्वर जे काही करतो, तो ते एका उद्देशा साठी करतो.विना उद्देश तो काहीही करीत नाही.
वास्तविकताकी तुम्ही हे वाचत आहात ही असू शकतेकीकारण तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या प्रियजनांसाठी मुक्तता शोधत आहात. कदाचित तुमच्यापैकी काही स्वस्थता शोधत असाल-शारीरिक किंवा भावनात्मक. चला मला तुम्हांला हे सांगू दया, स्वस्थता आणि सुटके ला सुद्धा उद्देश आहे.
हे महत्वाचे आहे की तुम्ही दैवी स्वस्थता आणि सुटकेचा उद्देश समजावा. तुम्ही जेव्हा उद्देश समजता, परमेश्वर का स्वस्थ करतो आणि सुटका करतो, तुम्ही त्यास किंमत दयावयास शिकाल आणि त्यास जपण्यास सुद्धा.
उद्देश हा की परमेश्वर आपल्याला कशातून तरी सुटका करतो ते ह्यासाठी की आपण कशामध्ये काहीतरी प्राप्त करावे. दैवी सुटका ही कशामधून तरी बाहेर येणे यासाठी नाही की जेथे तुम्ही आहात तेथेच राहावे परंतु कशामध्ये तरी जावे. अनेक लोक कशामधून तरी बाहेर येतात परंतु ते तेथेच राहतात जेथे ते असतात, ते कशामध्ये तरी जात नाहीत आणि मग ते त्यांची सुटका गमावितात.
इस्राएल हे मिसर देशात ४३० वर्षे बंदिवासात होते. (निर्गम १२: ४०, गलती ३: १५) परमेश्वराने त्यांना एका रात्रीत बाहेर आणले. त्याने केवळ त्यांना बाहेरच आणले नाही. त्याने त्यांना आश्वासित भूमी मध्ये आणले. ते बाहेर गेले म्हणजे ते आत प्रवेश करू शकतील.
एकव्यक्ति एके दिवशी माझ्याकडे आला, आणि म्हणाला, "पास्टर, "मी मद्यापासून मुक्त झालो आहे." "ते खूपच चांगले आहे," मी प्रत्युत्तर दिले. तो पुढे म्हणाला, "आता मी फक्त काही विदेशी तंबाखू चघळतो." काही लोक एका व्यसनातून बाहेर येतात आणि दुसऱ्या एका व्यसनामध्ये अडकतात. तेच काय ते मी येथे बोलत नाही.
[पित्याने] त्याने आपल्याला अंधाराच्या नियंत्रणातून आणि सत्तेतून मुक्त केले आणि आपल्या स्वतःकडे आकर्षिले आहे आणि आपल्याला त्याच्या प्रीतीच्या पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे. (कलस्सै १: १३ ऐम्पलीफाईड बायबल)
पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की परमेश्वराने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून मुक्त [बाहेर आणले आहे]केले आहे आणि त्याच्या पुत्राच्या-प्रभु येशू ख्रिस्ताच्या राज्यात आणून ठेवले आहे.
तुमची सुटका आणि स्वस्थतेचा प्रमुख उद्देश हा कीम्हणजे तुम्ही देवाने तुम्हाला दिलेल्या कामात प्रवेश करावे.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरीता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
ख्रिस्त येशू मध्ये मी एक नवीन सृष्टी आहे. (२ करिंथ ५: १७) मी त्याच्या दैवी स्वभावाचा वाटेकरी आहे. (२ पेत्र १: ४) येशूच्या नांवात मी अंधाराच्या शक्तीपासून मुक्त केले गेलो आहे. (कलस्सै १: १३) (वरील कबुली दिवसभर बोलत राहा)
कुटुंबाचे तारण
मी कबूल करतो की मी आणि माझे घराणे तर तुझी सेवा करणार.
आर्थिक प्रगती
मी परमेश्वराच्या वचनांमध्ये हर्षित होतो; त्यामुळे मी आशीर्वादित आहे. संपत्ती आणि धन माझ्या घरात राहतील, आणि माझे नीतिमत्व सर्वकाळ टिकते. (स्तोत्र ११२:१-३)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की प्रत्येक व्यक्ति जो केएसएम चर्चबरोबर जुळलेला आहे त्याची वचन आणि प्रार्थनेमध्ये वाढ व्हावी. त्यांना तुझ्या आत्म्याचा नव्याने अभिषेक होऊ दे.
राष्ट्र
पित्या, भारतातील प्रत्येक शहरात आणि राज्यात तुझ्या आत्म्याने आणि बुद्धीने भरलेले पुढारी निर्माण कर.
पित्या, तुझा आत्मा भारतातील प्रत्येक शहर आणि राज्यावर वाहू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ०६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● ख्रिस्ता समान होणे
● स्वप्न पाहण्याचे धाडस करा
● २१ दिवस उपवासः दिवस ०६
● परमेश्वराचा आनंद
● तुम्ही देवाचे पुढील सोडविणारे होऊ शकता
● आपल्या पाठीमागे पूल हे जळत आहेत
टिप्पण्या