english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. उत्कृष्टतेसाठी प्रयत्न कसा करावा
डेली मन्ना

उत्कृष्टतेसाठी प्रयत्न कसा करावा

Monday, 17th of July 2023
18 15 1029
Categories : उत्कृष्टता
मी जसे काल उल्लेखिले आहे,उत्कृष्टता ही दररोज ची सवय असली पाहिजे आणि ती एक वेळ ची घटना असे नाही.उत्कृष्टतेची माझी सरळ व्याख्या ही: दररोजची सामान्य कार्ये शक्य तितक्या उत्तमतेने करत राहणे मग कोणी पाहत असो किंवा नाही. प्रत्यक्षता ही परमेश्वर आपली कार्ये पाहत असतो आणि आपल्याला पुरस्कार देतो ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. तथापि, एकउत्कृष्टतेचेजीवन जगण्यासाठी आपल्याला उत्कृष्टतेचे उद्धीष्ट्य सुद्धा समजले पाहिजे नाहीतर तर एक गोष्ट होऊन राहील जी केवळ जीवनाऐवजी मृत्यू आणि धिक्कार आणेल.

परमेश्वराने आपल्याला सर्व गोष्टी उत्कृष्टतेने करण्यास सांगितलेले नाही म्हणजे आपली प्रशंसा व्हावी किंवा त्याच्याकडून मान्यता प्राप्त करावी. वास्तवात आपण अगोदरच पित्या द्वारे स्वीकारले गेलो आहोत कारण येशू ने आपल्या प्रत्येकांसाठी जे काही वधस्तंभावर केले आहे. ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या कार्यामध्ये आपण इतर काहीही जोडू शकत नाही. (इफिस १: ६-७)

खरा उद्धेश की देवाला पाहिजे कीआपण उत्कृष्टते मध्ये चालावे ते म्हणजे आपण त्याचे प्रतिबिंब व्हावे-पित्या प्रमाणे, पुत्रा प्रमाणे. उत्कृष्ठते मध्ये चालून आपण त्याच्यासामान होऊ.

परमेश्वर सर्व काही उत्कृष्टतेसह करतो
तू प्रतापी आहेस, लुटीने भरलेल्या पर्वतावर तेजस्वी आहेस. (स्तोत्रसंहिता ७६: ४)

याकडे पाहा की परमेश्वर तुमच्या आणि माझ्या विषयी कसे बोलतो (ते जे ख्रिस्ता मध्ये आहेत)
पृथ्वीवरील पवित्र जण (ईश्वरीय)हेच श्रेष्ठ होत, जे उत्कृष्ट, प्रतिष्ठित, आणि गौरवी आहे त्यांच्या ठायी माझा सगळा संतोष आहे. (स्तोत्रसंहिता १६: ३ ऐम्पलीफाईड बायबल)

तर मग आपण उत्कृष्टतेचा प्रयत्न कसा करावा?
प्रेषित पेत्र लिहितो:
"पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,' देवाचे'स्वतःचे लोक' असे आहां; ह्यासाठीकी, ज्याने तुम्हांस अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले 'त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे." (१ पेत्र २: ९)

कारण लक्षात घ्या की आपल्याला अंधकारातून त्याच्या अद्भुत प्रकाशात का पाचारणकेले आहे; हे ह्यासाठी की त्याचे गुण आम्ही प्रसिद्ध करावे.

म्हणजे उत्कृष्टतेचा प्रयत्न करण्याचा पहिला मार्ग हा परमेश्वराचा शोध करावाआणि त्याच्या चारित्र्याचे गुण प्रसिद्ध करावे आणि त्याचे उत्कृष्ट गुणवैशिष्ट्येत्यांना घोषित करावे ज्यांच्या संपर्कात आपण येतो.

प्रेषित पौल लिहितो: "तर मग देवाची प्रिय मुले [त्यांच्या पित्याचे अनुकरण करा]  ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण [त्याच्यासारखे वागा आणि त्याच्या आदर्शा नुसार चाला]करणारे व्हा. (इफिस ५: १ ऐम्पलीफाईड बायबल)

परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिमे मध्ये आणि त्याच्या स्वरूपानुसार बनविले आहे. आता त्याची उद्धारित मुले म्हणून, आपण ख्रिस्ता मध्ये त्या प्रतिमे मध्ये पुनर्स्थापित केले गेले आहोत.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.

व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, मी तुला धन्यवाद की ख्रिस्त येशू मध्ये, तूं मला ते सर्व काही दिले आहे की ते उत्कृष्टतेचे जीवन जगावे जे तुझ्या नावाला गौरव आणते. येशूच्या नांवात. आमेन.

कुटुंबाचे तारण
सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल. ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील. (स्तोत्रसंहिता ३७:१८-१९)

आर्थिकतेचा नवीन मार्ग
माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील (फिलिप्पै ४:१९). मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. येशूच्या नांवात.

केएसएम चर्च
पित्या, तुझे वचन म्हणते की तूं तुझ्या दिव्यदूतांना आज्ञा देतो की आमच्या मार्गामध्ये आम्हांला सुरक्षित ठेवावे आणि आम्हांला मार्गदर्शन करावे. पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, कर्मचारी व संघ सदस्यांसाठी तुझे पवित्र दिव्यदूत पाठिव, येशूच्या नांवात. त्यांच्या विरोधातील अंधाऱ्या शक्तीचे प्रत्येक कार्य नष्ट कर.

देश
पित्या, असे होवो की तुझी शांती व धार्मिकतेने आमच्या देशाला भरून टाकावे. आमच्या देशाच्या विरोधातील अंधार व विनाशकारी सर्व शक्ती ह्या नष्ट केल्या जावोत. असे होवो की आमच्या देशाच्या प्रत्येक राज्यात, शहरात प्रभु येशूचे शुभवर्तमान हे पसरवो. येशूच्या नांवात.

Join our WhatsApp Channel


Most Read
● पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणात्मक इतर दानास मिळविण्याचा मार्ग मिळवा
● पैसे कशा साठी नाही
● तुम्ही येशू कडे कसे पाहता?
● आध्यात्मिक नियम: संबंधाचा नियम
● चिंता करीत वाट पाहणे
● संबंधामध्ये आदराचा नियम
● अंतिम क्षण जवळ येण्यास सुरुवात होते
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन