डेली मन्ना
येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
Saturday, 5th of August 2023
24
19
680
Categories :
आत्म्याचे फळ
दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले, आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो त्याकडे गेला; परंतु तेथे गेल्यावर पाल्यावाचून त्याला काही आढळले नाही; कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही ह्यापुढे तुझे फळ कधीही न खावो. त्याचे शिष्य हे ऐकत होते. (मार्क ११: १२-१४)
अंजिराचे झाड हेच एक झाड आहे ज्याचा पवित्र शास्त्रात सतत उल्लेख केला आहे. हे त्याच्या पानापासूनच आदाम व हव्वे साठी पाहिले पांघरून केले होते (उत्पत्ति३: ७).
अंजीराच्या झाडाला प्रथम त्याच्या स्वादिष्ट आणि गोड फळा साठी मूल्य होते (यहोशवा ९: ११).
इस्राएली राष्ट्राला नेहमी"अंजिराचे झाड"असे प्रतीकात्मक म्हटले गेले होते. इस्राएलराष्ट्र पुन्हा एकदा जन्म घेईल यासंबधात येशू द्वारे स्वतः अंजीराच्या झाडाचा संदर्भ दिला आहे (मत्तय २४: ३२-३३).
अनेक वेळेला जुन्या करारात, संदेष्ट्येवर्णन करतात की, इस्राएल हे"प्रारंभीचे अंजीर" असेपरमेश्वरपरीक्षण करीत आहे, आध्यात्मिक फळ देण्याचे चिन्ह असे (मीखा ७:१, यिर्मया ८:१३, होशेय ९: १०-१७)-परंतुत्यास ते मिळत नाही, "पहिले-पिकलेले अंजीर जे माझ्या जिवास आवडते."
म्हणून दोन बंदिवासात (अश्शूर आणि ब्याबिलोन) परमेश्वरवैराण पणाचा शाप टाकतो (होशेय ९: १६), आणि इस्राएल हे सडलेले अंजीर होते (यिर्मया २९: १७). तर मग तुम्ही पाहा फळहीन असणे हे न्याय होण्याकडे नेते.
परंतु येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला जर त्यावेळी अंजिराचा हंगाम आला नव्हता?
अंजीराच्या झाडाचे गुणधर्माचा अभ्यास करण्याद्वारे ह्या प्रश्नाचे उत्तर आपण निश्चित करू शकतो.
अंजिराचे फळ हे सामान्यतः पाना अगोदर दिसते आणि कारण फळ हे हिरवे आहे ते पानासह मिसळलेले असते जोपर्यंत ते पूर्णपणे पिकत नाही. त्यामुळे, जेव्हा येशूने आणि त्याच्या शिष्यांनी काही अंतरावरून त्याकडे पाहिले की झाडाला पाने आहेत त्यांनी ही अपेक्षा केली होती की त्यावर फळ सुद्धा असेन जरी ती वेळ त्या हंगामा अगोदर होती.
आता तुम्हाला हे समजण्याची गरज आहे....
तेथे अनेक झाडे होती ज्यामध्ये केवळ पाने होती आणि त्यांना शाप देण्यात आला नाही.
तेथे अनेक झाडे होती ज्यामध्ये ना ही पाने किंवा ना फळे होती आणित्यांना शाप देण्यात आला नाही.
ह्या झाडाला शाप देण्यात आला कारण ते फळ आहे हे सांगत होते, परंतु त्यात ते नव्हते.
चिन्हात्मक, अंजिराचे झाड इस्राएलचे आध्यात्मिक मृत असण्यास प्रतिनिधित करते, जे त्यांच्या सर्व बाह्य बलिदान आणि विधीसह खूपच धार्मिक असे दिसत होते परंतु आतून आध्यात्मिक स्वरुपातवैराण असे होते.
ते आपल्याला एक सिद्धांत सुद्धा शिकविते की आंतरिकतारणाच्या शास्वतीसाठी केवळ बाह्य विधिसंस्कार पुरेसे नाहीत, जोपर्यंत व्यक्तीच्या जीवनात प्रामाणिक उद्धाराच्या प्रमाणाचे फळ दिसत नाही.
अंजीराच्या झाडाची शिकवण ही आहे की आपण आध्यात्मिक फळे निर्माण करावी (गलती ५: २२-२३), केवळ धार्मिकतेचा बाह्य देखावा नाही. परमेश्वर फळहीन असण्याचा न्याय करतो आणि आशा करतो ज्यांची त्याच्याबरोबर संगती आहे, त्यांनी" अधिक फळ दयावे" (योहान १५: ५-८).
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरीता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मी विपुल फळ देईन, आत्म्याची फळे. याद्वारेतुझे गौरव होईल आणि मी तुझा खरा शिष्य असेन. आमेन.
कुटुंबाचे तारण
मी कबूल करतो की मी आणि माझे घराणे तर तुझी सेवा करणार.
आर्थिक प्रगती
मी परमेश्वराच्या वचनांमध्ये हर्षित होतो; त्यामुळे मी आशीर्वादित आहे. संपत्ती आणि धन माझ्या घरात राहतील, आणि माझे नीतिमत्व सर्वकाळ टिकते. (स्तोत्र ११२:१-३)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की प्रत्येक व्यक्ति जो केएसएम चर्चबरोबर जुळलेला आहे त्याची वचन आणि प्रार्थनेमध्ये वाढ व्हावी. त्यांना तुझ्या आत्म्याचा नव्याने अभिषेक होऊ दे.
राष्ट्र
पित्या, भारतातील प्रत्येक शहरात आणि राज्यात तुझ्या आत्म्याने आणि बुद्धीने भरलेले पुढारी निर्माण कर.
पित्या, तुझा आत्मा भारतातील प्रत्येक शहर आणि राज्यावर वाहू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या परिवर्तनाला काय अडथळा करते ते समजा● अन्य भाषे मध्ये बोलणे हे आंतरिक आरोग्य आणते
● तुमच्या अंत:करणाचे परिश्रमपूर्वक रक्षण करा
● छाटण्याचा समय
● देवासाठी आणि देवाबरोबर
● प्रकाश हा वचना द्वारे येतो
● विश्वासापासून मुर्खतेमध्ये फरक करणे
टिप्पण्या