हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. (स्तोत्रसंहिता १०३: २)
दाविदानेप्रार्थना आणि समर्पण केले होते कीत्याच्यासाठी देवाने ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहे त्या कधीही विसरू नये. आपण सुद्धा प्रार्थना केली पाहिजे आणि तसेच समर्पण केले पाहिजे की आपल्या जीवनातील देवाच्या चांगुलपणाला कधीही विसरू नये.
मिसर देशातआम्हांला मासे फुकट खावयाला मिळत असत त्याची आठवण आम्हांला येते. त्याचप्रमाणे काकडया, खरबूजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीही आम्हांला आठवण येते; पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्नाशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही. (गणना ११: ५-६)
काकडया, खरबूजे, भाजी, कांदे, लसूण यासाठी त्यांना काय किंमत मोजावी लागत होती त्यास इस्राएली लोक इतक्या लवकर विसरले होते. त्यांना त्यासाठी किती भारी किंमत मोजावी लागत होती की अमानवी परिस्थितीतगुलाम असे ते राहत होते. त्यांनी परमेश्वराकडे सुटकेसाठी नेहमी ओरड केली होती कारणत्यांना अशी किंमत भरणे सहन होत नव्हते.
एकदाकी परमेश्वराने त्यांना सोडविले, ते सोयीस्करपणे विसरलेकी परमेश्वराने त्यांच्यासाठी काय केले होते आणि 'तथाकथित' चांगल्या गोष्टींसाठी ओरड केली होती जे त्यांनी मागे मिसर मध्ये सोडले होते. यात काही आश्चर्य नाही काय की ते मिसर मधील अन्न आठवत होते परंतु परमेश्वराची सामर्थी सुटका त्यांना आठवत नव्हती?
मला पटले आहे की परमेश्वराने ज्या चांगल्या गोष्टी आपल्यासाठी केल्या आहेत ते विसरणे हे पाप आहे.
१. विसरणे हे अविश्वास आणि बंडखोरपणा कडे नेते
"आमच्या पूर्वजांनी मिसर देशांत असताना तुझ्या अद्भुतकृत्यांकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही. तर समुद्राजवळ, तांबडया समुद्राजवळ, ते फितूर झाले." (स्तोत्रसंहिता १०६: ७)
२. विसरणे हे आपल्याला मुर्खपणाने कार्य करावयास लावते
तरी ते त्याची कृत्ये लवकरच विसरले, त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरिला नाही. (स्तोत्रसंहिता १०६: १३) देवाचे चांगुलपण विसरणे हे आपल्याला उतावळा करते आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी वाट पाहावयास सांगत नाही. उतावळे लोक मूर्खपणाचे कृत्ये करतात.
३. विसरणे देवाच्या क्रोधास वाढविते
ते आपल्या उद्धारक देवाला विसरले, त्याने मिसर देशांत महत्कृत्ये, हामाच्या देशांत अद्भुतकृत्ये, तांबडया समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती, तेव्हा तो म्हणाला, ह्यांचा नायनाट केला पाहिजे; पण त्याचा क्रोध शांत करावा, व त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडिलेला मोशे त्याला आडवा आला.(स्तोत्रसंहिता १०६:२१-२३)
खात्रीने परमेश्वराने तुमच्या जीवनात काहीतरी चांगले केले आहे. वेळ काढा की त्यासाठी त्यास धन्यवाददयावे. परमेश्वराच्या चांगुलपणाला कधीही विसरू नये.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, तू माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबांच्या सदस्यांसाठी केलेल्या चांगल्या गोष्टींना मी कधीही विसरू नये म्हणून मला कृपा पुरीव.
कुटुंबाचे तारण
धन्यवादित पवित्र आत्म्या, मलाविशेषकरून दाखव की माझ्या कुटुंबाच्या प्रत्येकसदस्यांना वचन कसे प्रचार करू. मला समर्थ कर प्रभो. योग्य वेळी, तुझ्याविषयी सांगण्यासाठी संधी प्रगट कर.येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
प्रत्येक बी जे मी पेरले आहे तेप्रभु द्वारे स्मरण करण्यात येईल. म्हणून, माझ्या जीवनातील कोणतीही अशक्य परिस्थिती प्रभु द्वारे बदलली जाईल. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मीप्रार्थना करतो की, हजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम च्या प्रत्यक्ष प्रसारणकडे यावेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. असे होवो की त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे.त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नाव उंचाविले जावो व त्यास गौरव मिळो.
देश
पित्या,येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की भारत देशाच्या प्रत्येक शहर व राज्यातील लोकांची हृदये तुझ्याकडे वळो. त्यांनी त्यांच्या पापाचा पश्चाताप करावा व येशूला त्यांचा प्रभु व तारणारा असे स्वीकारावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● येशूचे नांव● पेंटेकॉस्ट साठी वाट पाहणे
● नवीन आध्यात्मिक वस्त्रे परिधान करा
● बायबल प्रभावीपणे कसे वाचावे
● प्राचीन इस्राएलच्या घरांकडून शिकवणी
● वरील आणि समानांतर क्षमा
● इतरांवर कृपा करा
टिप्पण्या