विश्वासाच्या सतत वळणाऱ्या प्रवासात, फसवणुकीच्या सावलीतून सत्याच्या प्रकाशाची पारख करणे हे महत्वाचे आहे. बायबल, देवाचे शाश्वत वचन, आपल्याला सर्वात मोठा फसवणूक करणारा, सैतान याच्याबद्दल इशारा देते, जो प्रकाशाचा दूत म्हणून सोंग घेतो (२ करिंथ. ११:१४), जो देवाच्या लेकरांना चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी खोटेपणाची वळणे विणतो.
सैतान कधीही आपल्यासमोर त्याचे रूप घाणेरडे रुपात दाखवत नाही पण वरवर दिव्य तेजाने पांघरलेले असते, ज्यामुळे लाखो लोक धार्मिकतेच्या मार्गापासून भरकटत आहेत. म्हणून मग, देवाच्या वचनात मुळावलेले असणे हे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी अत्यंत महत्वाचे होते, की फसवणुकीपासून सत्याची पारख करावी आणि त्याच्या शाश्वत सत्यामध्ये चालावे.
"ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो" (२ करिंथ. ११:१४). सैतानाची सर्वात मोठी फसवणूक म्हणजे स्वतःला खोट्याचा बाप म्हणून सादर करण्याची त्याची क्षमता नाही परंतु दैवी प्रकटीकरणाचे स्त्रोत म्हणून सादर करणे आहे. ज्ञानाच्या आड तो आपल्या फसव्या हेतूवर पडदा टाकतो, ही अपेक्षा ठेवून की जे देवाच्या वचनात मुळावलेले नाहीत त्यांना जाळ्यात धरावे. त्याने असे भूतकाळातील इतिहासात अनेकदा केले आहे, आणि लाखो ख्रिस्ती लोकांना खऱ्या विश्वासापासून दूर केले आहे.
उत्पत्ति २७ मध्ये, याकोबाने, एसावची वस्त्रे घालून, त्याचा पिता, इसहाकाला फसविले आहे. याकोबाचे एसावची नक्कल करणे हे सूचित करते की एक खरे दान किंवा ओळखीची खोटी नक्कल केली जाऊ शकते, त्यामुळे धारणा आणि वास्तव यांच्यात दुरावा निर्माण करते. याकोबाचे फसवणुकीचे कृत्य पारख करण्याच्या आवश्यकतेवर जोर देते, की बाह्य स्वरूपाच्याही पलीकडे पाहावे आणि त्यात असणार सत्य ओळखावे.
"नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्चये प्रभातसमय नाही" (यशया ८:२०). ते जे देवाच्या वचनाच्या सत्यापासून दूर आहेत, ते कायम अंधारात भटकत राहतात, शत्रूच्या खोटेपणाच्या जाळ्यात अडकून राहतात. आत्मे जे सावलीमध्ये गमावले गेले आहेत त्यांचे यशया एक दु:खद चित्र रंगवतो, देवापासून वेगळे, आणि आध्यात्मिक शुन्यतेच्या भुकेशी संघर्ष करत राहतात. ते उदास होतात, देवाला शाप देतात आणि त्याच्या दैवी उपस्थितीबाहेर सांत्वन शोधतात. आध्यात्मिक आंधळेपणा, हा देवाच्या वचनाचा नकार करण्याचा परिणाम आहे, नेहमी देवाविरुद्ध राग आणि संतापकडे नेते, जे पुढे व्यक्तीला देवापासून विभक्त होण्याकडे नेते.
"हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे, जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणाऱ्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो; परंतु तो मला म्हणाला, "असे करू नकोस; मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर" (प्रकटीकरण २२:८-९).
प्रेषित योहानसुद्धा क्षणभर देवदूताच्या आकाशीय वैभवाने प्रभावित झाला होता जे माणसाची दुर्बलता स्पष्ट करते. देवदूताचा सल्ला यावर जोर देतो की केवळ देवाची उपासना करावी हाच आपला उद्देश आहे, आपल्या निर्माणकर्ता परमेश्वरालाच केवळ आपली भक्ती आणि प्रशंसा दिली पाहिजे.
फसवणुकीवर आपण कशी मात करावी?
"तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे" (स्तोत्र. ११९:१०५). वचनाच्या दैवी प्रकटीकरणात आपल्या स्वतःला मग्न करण्याने, आपण सत्याच्या प्रकाशाने प्रज्वलित होतो, आणि आपल्या पावलांना धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शित करतो आणि फसवणुकीच्या जाळ्यापासून आपले संरक्षण करतो
प्रार्थना
शाश्वत पित्या, फसवणूक उघडकीस आणण्यासाठी आणि तुझे शाश्वत सत्य पाहण्यासाठी आम्हांला पारख प्रदान कर. तुझे वचन आमचा दिवा होऊ दे ज्याने आमच्या पावलांना मार्गदर्शन करावे, तो प्रकाश जो सावलीस दूर करतो, आणि धार्मिकता आणि ज्ञानामध्ये चालण्यास आम्हांला मार्गदर्शन करतो. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रार्थने मध्ये अडथळ्यांवर कशी मात करावी● संदेष्टा अलीशा चे जीवन-आध्यात्मिक-III
● काय तुम्ही एकाकीपणाचा संघर्ष करित आहात?
● येशूला पाहण्याची इच्छा
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 1
● तुमचा हेतू काय आहे?
● नम्रता हे कमकुवतपणा समान नाही
टिप्पण्या