english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. नकारावर प्रभुत्व मिळवावे
डेली मन्ना

नकारावर प्रभुत्व मिळवावे

Friday, 13th of October 2023
19 16 1816
नकार हा मानवी अस्तित्वाचा अटळ भाग आहे, अंत:करणाचा त्रास त्याला सीमा नाही. खेळण्याच्या मैदानात शेवटी निवडलेल्या तरुण मुलापासून ते स्वप्नमय संधीपासून अस्वीकार केलेला प्रौढ व्यक्ती, न निवडल्याच्या डंक, जखमांना तसेच ठेवतो. पण जर कोणी ही वेदना समजतो, तर तो येशू आहे.

“माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करील.” (स्तोत्र. २७:१०)

जेव्हा आपण सुवार्तेमधून प्रवास करत राहतो, तेव्हा आपण तारणाऱ्यास पाहतो, जो नकारापासून अनोळखी नव्हता. त्याच्या स्वतःच्या नगरात, नासरेथमध्ये, ते ज्यांनी त्यास मोठे होताना पाहिले होते त्यांनी त्याचा नकार केला. त्याच्या स्वतःच्या भावांनी त्याच्या सेवाकार्यावर शंका केली. ज्या लोकांवर त्याने अत्यंत प्रेमे केले त्या लोकांकडे तो आला, इस्राएलातील निवडलेल्यांकडे आणि त्यांनी त्यास अस्विकारले. वधस्तंभावर देखील, त्याच्या अंधाराच्या समयात,
 असे दिसते की त्याच्या पित्याने त्याचा त्याग केल्यासारखे दिसते. (मत्तय २७:४६)

तरीही, संदेष्टा यशयाने, येशू पृथ्वीवर असण्याच्या शेकडो वर्षांपूर्वी, त्याच्याबद्दल भविष्यवाणी केली होती:

“तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही.” (यशया ५३:३)

तथापि, नकाराच्या परिस्थितीत असताना देखील, येशूला ठाऊक होते तो कोण होता. तो त्याचा उद्देश, त्याचे सेवाकार्य, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देवाचा प्रिय पुत्र म्हणून ओळख जाणून होता.
 त्याच्या अगाध ज्ञानाने त्यास स्थिर ठेवले होते.

“प्रभू येशूमधील तुमच्या ओळखीस जितके अधिक तुम्ही जाणता, तितकी अधिक शांती तुम्हांला मिळेल.”

आपल्या अंत:करणात नकाराचा डंक शिरकाव करू शकतो, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जगाच्या अस्थिर प्रमाणांनी आपली पात्रता निश्चित केली जात नाही. आपली खरी ओळख देवाची लेकरे असण्यात आहे. जेव्हा जग आपल्याला पाठमोरे होते, देवाचे आलिंगन हे स्थिर राहते.

रोम. ८:१६-१७मध्ये प्रेषित पौलाने लिहिले, “तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत; आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दू:ख भोगत असलो तरच.” 

त्याची कल्पना करा! विश्वासणारे म्हणून, आपली ओळख राजांच्या राजाचे वारस होण्यामध्ये मुळावलेली आहे. या प्रकाशात, जगाचा नकार अवास्तव होतो.

म्हणून, मग आपण नकारावर कसे प्रभुत्व मिळवावे? आपल्या स्वतःला देवाच्या वचनात मग्न ठेवण्याने, ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत याची आपल्या स्वतःला सतत आठवण देण्याने, आणि आपल्यासाठी त्याच्या अतुलनीय प्रीतीच्या सत्याला धरून राहण्याने.

येशूच्या जीवनाकडून एक धडा घ्या. जेव्हा नकाराचा सामना केला, तेव्हा तो कडवट झाला नाही. त्याऐवजी, त्याने त्या ठिकाणांचा शोध घेतला जेथे त्याच्या संदेशाचे स्वागत आणि साजरीकरण केले जाईल. त्याने मान्यता प्राप्त करण्यासाठी वेळ वाया घालवला नाही, पण तो एका दैवी सेवाकार्यावर होता.

नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत तुम्हांला पसंत करणे किंवा तुमच्याबद्दल सांगण्याच्या अधिकतेवर किंवा जमावाच्या टाळया यासोबत जोडलेली नाही. या सर्वांपेक्षा, देवाची मान्यता प्राप्त करण्याचा धावा करा. “मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.” (गलती. १:१०)

नकारावर मात करण्यात, तुमच्या हृदयाने त्या एकमात्रमध्ये शांती प्राप्त करावी असे होवो ज्याचा आपल्याखातर नकार करण्यात आला जेणेकरून आपल्याला शाश्वतदृष्ट्या स्वीकारले जावे.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, जेव्हा नकार आम्हांला जखमी करतो, तेव्हा तुझ्यामध्ये आमच्या खऱ्या पात्रतेची आम्हांला आठवण दे. आमच्या हृदयांना मजबूत कर आणि ख्रिस्त, जो तुझा पुत्र यामध्ये आमची ओळख स्थिर कर. तुझ्या प्रीतीने माझ्या अस्तित्वाला संतुष्ट करू दे. येशूच्या नावाने. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● दुसरे अहाब होऊ नका
● देवाच्या योजनेमधील रणनीतीची शक्ती
● पैसा चरित्राला वाढवितो
● दिवस १४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● कोणीही आवडता नाही परंतु घनिष्ठ
● वारा जो डोंगराला देखील सरकवतो
● तुरुंगात स्तुती
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन