लोटाच्या पत्नीची आठवण करा. (लूक १७:३२)
बायबल अशा कथांनी भरलेले आहे जे केवळ ऐतिहासिक अहवाल नाहीत, परंतु मानवी अनुभवांच्या रचनेमध्ये गुंडाळलेले गहन धडे आहेत. एक अशी दू:खद कथा ही लोटाच्या पत्नीची आहे-गमावलेल्या संधीची एक कथा, भूतकाळाची आस धरणारी, आणि जीवन-बदलणारा निर्णय.
सदोम नगराचा त्याच्या दुष्टपणामुळे नाश होणार होता, परंतु, देवाने त्याच्या दयेमध्ये, लोट व त्याच्या कुटुंबाला तेथून सुटण्याचा मार्ग पुरवला. या दैवी बचाव कार्यादरम्यान, एक स्पष्ट आज्ञा दिली गेली, “मागे पाहू नका” (उत्पत्ती १९:१७). तरीही, जेव्हा अग्नीचा वर्षाव खाली पडत होता, तेव्हा लोटाच्या पत्नीने निर्णय घेतला ज्याने तिच्या नशिबावर शिक्कामोर्तब केले होते: तिने मागे वळून पाहिले.
ही नुसती नजर नव्हती; ते, जसे आपण समजतो, पाहण्याची उत्कट इच्छा होती. कदाचित जीवन जे ती जगत होती त्यासाठी तिने शोक केला होता, तिच्या घराचा आरामदायकपणा, किंवा नगराची ओळख. सदोमच्या तात्पुरत्या सुखाविलासासाठी तिच्या आसक्तीमुळे तिला भविष्यातील आशीर्वाद गमवावा लागला.
मत्तय. ५:१३मध्ये प्रभू येशू आपल्याला उपदेश देतो, “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात,.... “ मीठ चव वाढवते, आणि त्याची गुणवत्ता टिकवून ठेवते. ख्रिस्ती लोक, मिठाप्रमाणे, आनंदाची बातमी सांगणे, प्रेम आणि आनंदाने जीवन जगून, चव वाढवून, आणि संकटातही विश्वासाने खंबीर उभे राहून जगाला संरक्षण आणण्यासाठी आहेत.
पण लोटाच्या पत्नीमध्ये स्पष्ट विडंबन आहे. ती मिठासारखी जपून ठेवणारी प्रभावशाली असायला हवी होती, त्याऐवजी ती मिठाचा अचल खांब बनली- आपल्या मागे जे गेले आहे त्याची आस धरण्याच्या धोक्याबद्दल कडक स्मरण आहे.
फिलिप्पै. ३:१३-१४ मध्ये प्रेषित पौल म्हणतो, “बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.” आपल्या आध्यात्मिक प्रवासाची मागणी आहे की आपण आपल्या भूतकाळातील सुखसोयी किंवा मोहात अडकू नये परंतु आपण शाश्वत बक्षीसाकडे डोळे लावून पुढे नेटाने चालावे.
कलस्सै. ३:२ या भावनेस प्रतिध्वनित करते, “वरील गोष्टींकडे मन लावा; पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.” पृथ्वीवरील आपले जीवन क्षणभंगुर आहे., अनंतकाळाच्या तुलनेत केवळ डोळे मिचकावणारे आहे. जेव्हा आपण आपल्या हृदयाला देवाच्या शाश्वत सत्यात स्थिर करतो आणि त्या जीवनासाठी प्रयत्नशील राहतो जे त्याच्या गौरवाला प्रतिबिंबित करते, तेव्हा आपण खरेच मीठ होतो, जगामध्ये फरक आणतो.
लोटाच्या पत्नीची आठवण ठेवणे म्हणजे एक दू:खद शेवट लक्षात ठेवण्यापेक्षा जास्त आहे; हे प्रतिबिंबित करण्यासाठी तातडीची हाक आहे. आपले स्नेह कुठे आहेत? आपण कशाची आस धरतो? या जगातील सुखसोयी आणि आकर्षक जबरदस्त असू शकतात; परंतु ख्रिस्तामध्ये आपल्याला वाटणाऱ्या गौरवाच्या तुलनेत ते निस्तेज आहे.
प्रत्येकवेळी जेव्हा आपण जगाच्या मोहाचा प्रतिकार करतो, संकटाच्या मध्ये विश्वासात ठाम राहतो, किंवा देवाच्या प्रीतीचे किरण म्हणून चमकतो, तेव्हा आपण “पृथ्वीचे खरे मीठ” म्हणून आपल्या भूमिकेला दुजोरा देतो. आपण केवळ शब्दांमध्ये नाही तर कृतीमध्ये साक्षीदार होतो, आणि इतरांना ख्रिस्ताच्या अनंतकालच्या प्रीतीकडे मार्गदर्शन करतो.
आज, आपण कुठे उभे आहोत याचे आकलन करण्यासाठी थोडा वेळ घेऊ या. आपण मागे पाहत आहोत, त्या गोष्टींची आस ठेवत आहोत जे आपल्यासाठी देवाच्या उद्देशाबरोबर जुळत नाही का? आपण ख्रिस्तामध्ये दृढपणे स्थिरावलेले आहोत, बदल घडवून आणण्यास तयार आहोत आणि अनंतकाळची तळमळ आहे का?
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, आमच्या विचारांना सार्वकालिक दिशेने निर्देशित कर. या जगाच्या क्षणभंगुर आकर्षणांनी आपण मोहात पडू नये. अनेकांना तुझ्या उद्धरित कृपेकडे नेण्यास टिकवून ठेवणारे मीठ होण्यासाठी आम्हांला मदत कर. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देण्याने वाढ होते - 1● पावित्रीकरण स्पष्टपणे सांगितले आहे
● दिवस ०८ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● मध्यस्थी करणाऱ्यांसाठी एक भविष्यात्मक संदेश
● भूतकाळाच्या कबरेत पडून राहू नका
● कृपे द्वारे तारण पावलो
● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – २
टिप्पण्या