“त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले; त्यापूर्वी त्यांचे आपसांत वैर होते.” (लूक २३:१२)
मित्रता ही एक शक्तिशाली गोष्ट आहे. ती एकतर आपल्याला अत्युच्य स्थानावर उचलू शकते किंवा आपल्याला खोलवर ओढून नेऊ शकते. हेरोद आणि पिलाताच्या प्रकरणात, त्यांच्या नवीन मैत्रीवर अखंडतेची परस्पर तडजोड आणि त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या सत्याकडे सामायिक दुर्लक्ष यावर शिक्कामोर्तब झाले-येशू ख्रिस्त.
“सुज्ञांची सोबत धार म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खाचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०)
मित्रता ही केवळ सोबतीबद्दल नाही, हे प्रभावाबद्दल आहे. आपले मित्र आपले विचार, वागणूक आणि आपल्या आध्यात्मिक अवस्थेवर देखील प्रभाव करू शकतात. जेव्हा आपण नीतिसूत्रे १३:२० च्या परिणामांचा विचार करतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःला विचारले पाहिजे.
“माझे मित्र मला ज्ञानी करतात किंवा मुर्खतेकडे नेतात का?
“फसू नका, ‘कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथ. १५:३३)
पिलात आणि हेरोद यांनी त्यांची सांसारिक स्थिति आणि अधिकार टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यासमोर येशूच्या दैवी उपस्थितीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी नैतिक सचोटीपेक्षा त्यांच्या सामाजिक स्थितीला प्राधान्य दिले. त्याचप्रमाणे, आपण देखील आपल्या स्वतःला त्या लोकांच्या संगतीत पाहतो जे कदाचित आपल्याला योग्य मार्गाकडे मार्गदर्शन करीत नसतील, हे सर्वकाही “प्रतिष्ठा’ किंवा सामाजिक समाधान जपण्याच्या नावासाठीच असते. परंतु, लक्षात ठेवा, तुमच्या आत्म्याच्या कमकुवतपणा एवढी कोणतीही जगिक प्राप्ती योग्य नाही.
“एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चागले फळ प्राप्त होते. त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते.” (उपदेशक ४:९-१०)
पवित्र शास्त्र हे मित्रतेचे केवळ गौरव करत नाही; ते धार्मिक मित्रतेचे गौरव करते –मित्रता जी वाढवते, जबाबदार ठरवते, जी ज्ञान आणि धार्मिकतेच्या मार्गात चालते.
बायबल आपल्याला इशारा देते, “अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” (याकोब ४:४)
हे असे म्हणणे नाही की जे आपल्या विश्वासाचे नाहीत त्यांच्याबरोबर आपण मित्रता करू नये; वास्तवात, प्रभू येशू हा कर वसूल करणाऱ्या आणि पापी लोकांचा मित्र होता. अविश्वासू लोकांसोबत आपली मित्रता ही मिशन क्षेत्र म्हणून पाहिले पाहिजे जेथे आपण सुवार्ता सांगू शकतो. परंतु जेव्हा प्रभाव उलट्या प्रकारे कार्य करू लागतो-जेव्हा आपण आपली मुल्ये, नैतिकता आणि विश्वास डगमगताना पाहतो-तेव्हा ही वेळ आहे की आपण आपल्या नातेसंबंधांचे पुनर्मुल्यांकन करावे.
आपल्याला या जगात मीठ आणि प्रकाश म्हणून पाचारण करण्यात आले आहे (मत्तय ५:१३-१६). तुमची मैत्री तुम्ही विश्वास ठेवता त्या शुभवर्तमानाचे प्रतिबिंब होऊ द्या. ते मित्र ठेवा “जसे तिखे तिख्याला पाणीदार करते’; तसे असावेत (नीतिसूत्रे २७:१७). परंतु ती मित्रता देखील असावी जी सुवार्तेसाठी मिशन क्षेत्र म्हणून कार्य करते.
तुमच्या मैत्रीचे मुल्यांकन करण्यासाठी आज काही क्षण घ्या. ते तुम्हांला ख्रिस्ताजवळ आकर्षित करतात का किंवा तुम्हांला दूर ओढून नेतात? लक्षात ठेवा, खऱ्या मित्रतेने तुम्हांला भरकटून टाकू नये परंतु तुमच्या हृदयाला सर्वात उत्तम मित्राकडे मार्गदर्शन करावे-प्रभू येशू ख्रिस्त.
प्रार्थना
पित्या, माझ्या मित्रतेमध्ये मला मार्गदर्शन कर. इतरांना तुझ्याजवळ आणण्यासाठी त्यांच्या जीवनात प्रकाश होण्यासाठी मला मदत कर. मला त्या लोकांनी घेऊन ठेव जे तुझ्यासोबतच्या माझ्या चालण्यात वाढ करतील आणि माझ्या मार्गाला सरळ ठेवतील. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● धार्मिकतेचे वस्त्र● स्वैराचारास पूर्ण उपाय
● मार्गहीन प्रवास
● खोटे बोलणे सोडणे आणि सत्य स्वीकारणे
● मानवी हृदय
● अत्यंत वाढणारा विश्वास
● इतरांसाठी मार्ग प्रकाशित करणे
टिप्पण्या