english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. पापी रागाचे स्तर उघडणे
डेली मन्ना

पापी रागाचे स्तर उघडणे

Saturday, 25th of November 2023
18 12 1008
Categories : Anger Character Emotions Self Control
जर नीतिमान राग सकारात्मक परिणामाकडे नेतो, तर याउलट पापी रागामुळे नुकसान होते

पापी रागाचे तीन प्रकार आहेत: 

१. स्फोटक राग
“मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध व्यक्त करतो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवतो.” (नीतिसूत्रे २९:११)

स्पोटक राग अचानक आणि तीव्रतेने घडणाऱ्या अस्थिर विस्फोटासारखाच आहे. हे अनेकदा धमक्यांची चाहूल किंवा निराशेची प्रतिक्रिया असते आणि त्यामुळे ओरडणे, वस्तू फेकणे किंवा अगदी शारीरिक संघर्ष यासारखे आक्रमक वर्तन होऊ शकते. अशा प्रकारचा राग नातेसंबंधाला मोठे नुकसान करू शकतो आणि अनेकदा त्यानंतर खेद व्यक्त केला जातो.

हे चित्र स्मरणात घ्या! कल्पना करा की पालक जे दिवसभराच्या दीर्घ आणि तणावपूर्ण कामानंतर, घरी परत येतात आणि हे पाहतात की त्यांच्या लहान मुलांनी घरात सर्वत्र पसारा केला आहे. त्या परिस्थितीला शांतपणे हाताळण्याऐवजी, पालक अत्यंत क्रोधात प्रतिक्रिया व्यक्त करतात. ते मोठ्याने ओरडतात, आणि मुलाला कठोरपणे धमकावतात, आणि कदाचित दाराला जोराने धडक मारतात किंवा वस्तू फेकून देतात. लेकराला भीती वाटते आणि गोंधळून जातात आणि नंतर पालकांना त्यांच्या उद्रेकाबद्दल पश्चाताप होतो. ही स्फोटक प्रतिक्रिया लेकराला केवळ घाबरवत नाही तर घरामध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण करून कुटुंबाचे भावनिक संतुलन बिघडवते.

२. पोषित राग
जुन्या करारात राजा अहाब हे त्याचे उदाहरण आहे. नाबोथाने त्याच्या द्राक्षाचा मळा विकण्यास नकार दिल्यानंतर, अहाबाचे वर्णन असे केले आहे: “म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछान्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना” (१ राजे २१:४).

धुमसणारा संताप जो काही समयापासून जमा होतो, तो सतत न सोडवले गेलेल्या तक्रारींचा परिणाम असतो, हाच तर माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे जेव्हा आपण पोषित रागाबद्दल बोलतो. राग जो स्फोटक नाही तो स्वयं बाह्य कृतीत प्रदर्शित होत नाही; त्याऐवजी, ते चिडचिड, कटुता आणि बदला घेण्याच्या इच्छेने दर्शविला जातो. अशा प्रकारच्या रागाचे विषारी स्वरूप या वस्तुस्थितीत आहे की यामुळे सतत असंतोष निर्माण होऊ शकतो आणि एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
पोषित राग, जरी स्फोटक रागापेक्षा कमी स्पष्ट असला तरी, समानपणे पापमय आणि हानिकारक आहे.

एखाद्या व्यक्तीची कल्पना करा ज्याच्याकडे पदोन्नतीसाठी दुर्लक्ष केले गेले आहे. विषयाला हाताळण्याऐवजी, ज्यांना पदोन्नती मिळाली आहे त्यांच्याबद्दल ते संताप बाळगून असतात. कालांतराने, हा संताप वाढतो, निष्क्रिय-आक्रमक वर्तनाकडे नेतो, जसे की माहिती रोखणे किंवा सूक्ष्म तोडफोड करणे, व्यवसायिक संबंधांना आणि त्यांच्या स्वतःच्या मानसिक शांतीला हानी पोहचवणे.

३. पुरलेला राग
नीतिसूत्रे २८:१३ चेतावणी देते, “जेथे दुष्ट तेथे तिरस्कार, आणि जेथे अधमता तेथे निंदा.”

पुरलेला राग हा गुप्त आहे आणि जो त्यास बाळगून असतो त्या व्यक्तींमध्ये तो नेहमी दिसून येतो. हा रागाचा नकार आहे, अनेकदा अशा विधानांनी व्यक्त होतो, “मी रागात नाही. मी अस्वस्थ नाही.” अशा प्रकारचा राग धोकादायक आहे कारण तो अनपेक्षितपणे आणि असमानतेने प्रकट होऊ शकतो, अनेकदा दोघांना आणि ते जे त्यांच्या सभोवती आहेत त्यांना बेसावध असताना त्यांचा ताबा घेतो. पुरलेला राग हा टाईमबॉम्ब सक्रीय करण्यासारखा आहे ज्याचा कोणत्याही वेळी स्फोट होऊ शकतो.

पुरलेला, न सोडविला गेलेला राग, नैराश्य, टोमणा किंवा निष्क्रिय-आक्रमक वर्तनात परिणाम दर्शवू शकतो. किंवा तो कदाचित सूक्ष्म स्वरुपात प्रकट होऊ शकतो, जसे जुनाट टोमणा, निंदकपणा किंवा अगदी शारीरिक लक्षणे जसे की डोकेदुखी आणि पोटाच्या समस्या.


प्रार्थना
कृपाळू पित्या, रागाचे रुपांतर समजूतदारपणात आणि संयमात करण्यासाठी आम्हांला मार्गदर्शन कर. आमच्या हृदयास तुझ्या करुणेने आणि प्रीतीने भर म्हणजे आपण भांडणांना प्रीतीने आणि शहाणपणाने सोडवू शकावे, आपल्या स्वतःमध्ये आणि आमच्या नातेसंबंधात शांतता वाढवावी. येशूच्या नावाने. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
● तुमच्या प्रार्थनेच्या जीवनास प्रोत्साहन देण्यासाठी व्यवहारिक पायऱ्या
● परिवर्तनाची किंमत
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-१
● पहारेकरी
● बीज चे सामर्थ्य - ३
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -३
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन