डेली मन्ना
दिवस २८:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
Sunday, 7th of January 2024
27
17
850
Categories :
उपास व प्रार्थना
मी कृपेचा आनंद घेईन.
“शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केलीं आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.” (योहान. १:१४)
कृपा आणि सत्य येशूमध्ये जुडलेले आहे. योहान १, वचन १६मध्ये वचन म्हणते, “त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.’ देवाने मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले.
येशू ख्रिस्ताने कृपा आपल्याला आणली. येशू येण्यापूर्वी, मनुष्याला काय उपलब्ध होते तर नियमशास्त्र. कृपा, विश्वास आणि सत्य- हे सर्वकाही येशू ख्रिस्ताद्वारे आले.
कृपा काय आहे?
१. कृपा ही अपात्र पसंती आहे –काहीतरी ज्यास तुम्ही पात्र नाहीत.
२. हे आशीर्वादाचा आनंद घेणे आहे ज्यासाठी तुम्ही पात्र नाहीत किंवा त्यासाठी तुमची योग्यता नाही.
३. हे तेव्हा होते जेव्हा देवाचा आत्मा कार्यरत असतो, आपल्या मानवी शक्तीच्याही पलीकडे सर्वकाही करतो. देवाची कृपा आपल्याला अशक्य गोष्टी करण्यास मदत करते. ते आपल्याला मर्यादा आणि आव्हानांवर मात करण्यास मदत करते. देवाची कृपा ही जीवनाचा संघर्ष आणि धडपडीसाठी मानवासाठी उत्तर आहे.
कृपेचे परिणाम काय आहेत?
१. कृपा शिष्टाचाराला मोडते
पवित्र शास्त्रात, एस्तेर, योसेफ, दावीद आणि पौलाच्या जीवनात आपण कृपेचे काम पाहू शकतो. बायबलमधील इतर पुष्कळ चरित्रे देखील कृपेचा परिणाम आणि कार्याला प्रतिबिंबित करतात.
एस्तेर एका अनोळखी देशात गुलाम मुलगी होती; तरीही कृपेने, तिने इतर पुरुषांच्या आणि राजाच्या समोर देखील पसंती मिळवली. कृपा तुम्हांला अनोळखी देशात देखील पसंतीचा आनंद आणि तसेच त्या पदाचा देखील आनंद घेऊ देण्यास कारणीभूत होते ज्यासाठी तुम्ही योग्य नाही. (एस्तेर २:१७)
योसेफ हे आणखी एक चांगले उदाहरण आहे. तो गुलाम म्हणून एका अनोळखी देशात होता; आणि रातोरात, गुलामगिरीत अनेक वर्षे राहिल्यावर, देवाने कथेला बदलले. (उत्पत्ति ४१:३७-४४)
तो तुरुंगातून केवळ बाहेरच आला नाही; तर त्याला देशात दुसऱ्या मोठ्या अधिकाराचे पद दिले गेले. हे कृपेचे कार्य आहे. ते तुम्हांला पुढे नेते, तुम्हांला उन्नत करते, आणि तुमच्यासाठी शिष्टाचार मोडते. मला खात्री आहे की मिसर देशात तेथे उच्च पदावर नियुक्ती करण्यासाठी काही योग्य नियम असतील, परंतु देवाची कृपा सक्रीय असल्यामुळे, त्या सर्व नियमांना बाजूला करण्यात आले, आणि कृपेने योसेफाला उन्नत केले.
दाविदाने देखील कृपा आणि पसंतीचा आनंद अनुभवला. कृपेने त्याला जीवनाच्या मागच्या स्तरावरून पुढे आणले, जेथे तो मेंढरे राखत होता, तेथून पुढील स्थानावर आणले गेले, जेथे तो एक राजा झाला (२ शमुवेल ५;३-४). तोच परमेश्वर ज्याने ह्या लोकांच्या जीवनात कार्ये केली ते तुमच्यासाठी येशूच्या नावाने करील.
पौल, जो पूर्वी आतंकवादी होता, तो सुवार्तेंचा प्रमुख सेवक झाला. प्रेषित पौल इतर प्रेषितांपेक्षा कृपेबद्दल अधिक बोलतो कारण तो कृपेपासून उत्पन्न झाला होता (१ करिंथ. १५:१०)
या वर्षात, माझी इच्छा आहे की तुम्ही कृपेच्या कार्याकडे लक्ष द्यावे, कारण ते खरे आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनात ते कार्य करते.
२. कृपा तुमच्यासाठी असामान्य परिणाम निर्माण करते.
पेत्राने रात्रभर परिश्रम केले, पण त्याला काहीही मिळाले नाही. परंतु जेव्हा प्रभू येशू आला (लक्षात ठेवा की येशू हा अनुग्रह आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण आहे, आणि कृपा येशू द्वारे आली), तेव्हा जाळी फाटू पर्यंत पेत्र मासे धरू शकला (लूक. ५:१-९). तुमच्या व्यवसायात तुम्ही किती वर्षांपासून संघर्ष करत आहात याची पर्वा नाही, मी देवाच्या अधिकाराने तुमच्या जीवनात बोलतो की देवाची कृपा तुमची कथा बदलून टाकेल.
तुमच्या जीवनात किंवा वैवाहिक जीवनात कोणत्याही वादळाचा तुम्ही सामना करत असाल याची पर्वा नाही, देवाची कृपा ते सर्वकाही चांगल्यासाठी येशूच्या नावाने बदलून टाकेल.
३. जे तुम्ही स्वतःहून करू शकत नाही ते करण्यासाठी कृपा तुम्हांला समर्थ करते.
पौल म्हणतो, “मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.” (फिलिप्पै. ४:१३)
जेव्हा दाविदाने गल्याथचा सामना केला, तेव्हा तो ते काम हाती घेण्यास तयार होता कारण देवाची कृपा त्याच्यावर होती. देवाचा आत्मा ही देवाची कृपा आहे, अशक्य गोष्टी करण्यास मला समर्थ करते. इस्राएलाचे संपूर्ण सैन्य गल्याथचा सामना करू शकत नव्हते कारण तेथे कृपा नव्हती (१ शमुवेल १७). येथे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकत नाही, परंतु त्या परिस्थितींवर तुमच्या जीवनात जेव्हा देवाची कृपा मोकळी केले जाते, तेव्हा जे पुष्कळ वर्षे ते करत आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही उत्तम असे कराल. तुम्हांला देवाच्या कृपेची आवश्यकता आहे.
४. कृपेने तुमचे तारण झाले आहे, तुमच्या कामांनी नव्हे (इफिस. २:८-९).
तारण देखील कृपेचा परिणाम आहे. आपण आपल्या स्वतःचे तारण केलेले नाही आणि आपण आपल्या स्वतःचे तारण करू शकत नाही. ते देवाकडून देणगी आहे जे आपण कृपेने प्राप्त करतो.
कृपेचा आनंद घेण्यासाठी कोणत्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता?
१. देवाची कृपा काय करू शकते त्याबद्दल जागरूक असा
देवाची कृपा काय करू शकते त्याबद्दल मी तुम्हांला काही गोष्टी सांगितल्या आहेत म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल जागरूक असू शकता. तुमच्या स्वतःच्या जीवनात त्याची इच्छा बाळगा म्हणजे तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकाल.
२. इतरांप्रती कृपाळू राहा
देवाने तुमच्यासाठी काय करावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही इतरांसाठी करावे. कृपाळू राहा, इतरांवर प्रीती करा, दया दाखवा, करुणामय असा. जेव्हा ते चुकीचे आहेत आणि न्याय आणि शिक्षेस पात्र आहेत, तेव्हा त्यांना देवाची प्रीती दाखवा म्हणजे त्यांनी तुमच्या द्वारे देवाच्या कृपेचा आनंद घ्यावा. योग्य गोष्ट योग्य वेळी करण्यासाठी देवाचा आत्मा तुम्हांला मार्गदर्शन करो.
३. देवाच्या कृपेने तुमच्यासाठी कार्य करावे याची अपेक्षा बाळगा.
देवाच्या वचनात येथे एक आध्यात्मिक नियम आहे जे म्हणते की तुमच्या अपेक्षांचा भंग होणार नाही (नीतिसूत्रे २३:१८). तुम्ही जी अपेक्षा करता तेच तुम्ही पाहता आणि त्याचा आनंद घेता. जर तुम्ही देवाच्या कृपेने तुमच्यासाठी कार्य करण्याची अपेक्षा करत नाही, तर ते कार्य करणार नाही.
४. कृपा ज्ञानाद्वारे प्रवाहित होते. (२ पेत्र. १:२)
देवाच्या ज्ञानात वाढा, आणि तुम्ही कृपेत वाढाल. कृपा ज्ञानाने प्रवाहित होते, आणि ज्ञानावाचून, कृपा त्याच्या प्रवाहात मर्यादित आहे.
५. कृपा ही मानवी पात्राद्वारे दिली जाते.
काही लोकांना देवाच्या कृपेच्या ज्ञानाची गहन विपुलता असते आणि त्यांच्याजवळ त्याच्या जीवनात कृपेच्या आत्म्याच्या मोठे प्रमाण असते. प्रत्येकाला एका किंवा इतर भागामध्ये कृपा असते परंतु येथे इतर भाग आहेत जेथे आपल्याला कृपेचा अभाव असतो. मानवी पात्रांद्वारे कृपा देण्याची येथे दोन उदाहरणे आहेत: अलीशाने एलीयाकडून कृपेचा दुप्पट वाटा प्राप्त केला (२ राजे २:४-१८), आणि मोशेने ज्ञानाचा आत्मा यहोशवाच्या जीवनात मोकळा केला (अनुवाद ३४:९).
जेव्हा तुम्ही कृपा घेऊन जाणाऱ्याबरोबर जुळता, तेव्हा त्यांची कृपा तुम्हांला स्पर्श करेल. जर ते सेवाकार्य आहे, तर सेवाकार्यात विश्वासुपणे सेवा करणे ही एका विशेष भागात कृपा आहे जी तुमच्या स्वतःच्या जीवनात देखील प्रवाहित होण्यास कारणीभूत होईल.
६. स्वतःला नम्र करा.
याकोब ४:६ म्हणते, देव लीनांवर कृपा करतो”, म्हणून जेव्हा तुम्ही नम्र आहात, तेव्हा तुम्ही अधिक कृपेचा आनंद घ्याल.
या वर्षी देवाची कृपा तुम्हांला पुरेशी आहे. देवाची कृपा तुम्हांला मदत करेल, तुम्हांला सशक्त करेल, आणि तुम्ही तुमच्या शक्तीने जे प्राप्त करू शकत नाही ते सर्वकाही तुम्हांला प्रदान करेल. मोठा आवाज काढा आणि म्हणा, “येशूच्या नावाने यावर्षी, “मी कृपेचा आनंद घेईन.”
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. पित्या, माझी वित्तीयता आणि कुटुंबात येशूच्या नावाने तुझ्या कृपेचा आनंद घेण्यास मला कारणीभूत कर. (फिलिप्पै. ४:१९)
२. माझे जीवन आणि वित्तीयतेमध्ये कोणत्याही प्रकारच्या कठीण परिश्रमाला येशूच्या नावाने मी नष्ट करतो. (स्तोत्र. ३४:१९)
३. हे परमेश्वरा, अशक्य ते करण्यासाठी येशूच्या नावाने मला कृपा प्रदान कर. (लूक. १:३७)
४. पित्या, उच्च स्थानावर जाण्यासाठी येशूच्या नावाने मला कृपा प्रदान कर. (अनुवाद २८:१३)
५. देवाची कृपा, येशूच्या नावाने मला मदत पाठव. (इब्री. ४:१६)
६. देवाची कृपा, या वर्षी माझ्यासाठी येशूच्या नावाने नवीन द्वारे उघड. (प्रकटीकरण ३:८)
७. पित्या, तुझ्या कृपेने, माझी पदोन्नती आणि आशीर्वादाच्या आड येणारी प्रत्येक बलाढ्य आव्हाने आणि अडथळ्यांवर येशूच्या नावाने मी मात करतो. (रोम. ८:३७)
८. पित्या, तुझ्या कृपेचे गहन प्रकटीकरण येशूच्या नावाने मला प्रदान कर. (इफिस. १:१७)
९. तुटवडा आणि दारिद्र्याच्या चक्राला येशूच्या नावाने मी मोडून काढतो. (२ करिंथ. ९:८)
१०. या वर्षी, पित्या, तुझी पसंती आणि कृपेने मला येशूच्या नावाने समाधानी कर. (स्तोत्र. ९०:१७)
Join our WhatsApp Channel
Most Read
● गहनता शोधणे, केवळ प्रदर्शन नाही● वाईटपद्धतींनानष्ट करणे
● आत्मे जिंकणे-ते किती महत्वाचे आहे?
● तुमच्या नवीन वाटचालीस प्राप्त करा
● आश्वासित देशामध्ये बालेकिल्ल्यांना हाताळणे
● त्याला सर्व सांगा
● स्वयं-गौरवाचा सापळा
टिप्पण्या