धार्मिकाचे फळ जीवनाचा वृक्ष होय,
आणि जो ज्ञानी असतो तो जिवांस वश करितो. (नीतिसूत्रे 11:30).
एकदा एक तरुण मुलगा रस्त्यावरून चालत जाताना आत्महत्या करण्याची योजना करीत होता. अचानक, कोठून तरी आणखी एक तरुण व्यक्ति आला आणि त्याच्याबरोबर चालू लागला. तो त्याची साक्ष देऊ लागला की तो जेव्हा येशूच्या मागे चालू लागला त्यानंतर त्याचे जीवन कसे बदलू लागले. याद्वारे गोंधळून जाऊन, हा तरुण व्यक्ति त्या व्यक्तीच्या आमंत्रणावरून उपासनेला गेला.
उपासना ही एका अत्यंत लहान खोली मध्ये होत होती आणि तेथे काही थोडे लोक होते परंतु त्याने पवित्र आत्म्यास ह्या तरुण व्यक्तीला स्पर्श करण्यापासून थांबविले नाही. त्या रात्री प्रभूने या तरुण व्यक्तीला स्पर्श केला आणि आत्महत्या करण्याचे सर्व विचार हे निघून गेले. तुम्हाला हे जाणायचे आहे का हा तरुण व्यक्ति कोण होता-तो मी होतो.
मी नेहमीच ही कल्पना करतो कधी, "काय जर ह्या तरुण मुलाने मला येशू बद्दल सांगितले नसते?तरमी आता कोठे असतो?
हे खूप सोपे आहे की आपल्या स्वतःच्या विचारात मग्न होऊन जावे की आम्ही सार्वकालिकतेचा दृष्टीकोण आणि आपल्या सभोवतालच्या नष्ट होणाऱ्या आत्म्याना गमावून बसतो.
आत्मे जिंकण्याचा एक मार्ग हा की तुमच्या सभोवतालच्या लोकांना तुमची साक्ष दयावी. प्रतिदिवशी देवाकडे संधी मागा की जे देवाने तुमच्या जीवनात केले आहे ते इतरांना सांगावे. याची पर्वा नाही की तुमची साक्ष किती लहान आहे त्यामध्ये देवाचे सामर्थ्य आहे की लोकांना त्याच्या राज्यात आणावे.
आत्मे जिंकण्याचा आणखी एक मार्ग हा आहे कीतुमची वेळ, वरदाने, संपत्ति दयावीकी शुभवर्तमान पसरावे.
जर तुम्ही कोणाला प्रभूकडे आणले आहे तर त्यांना त्यांच्या स्वतःवरच सोडू नका कीवाढण्यासाठी योग्य मार्ग शोधावा. त्यांचे बायबल वाचण्यास त्यांना प्रोत्साहन दया. त्यांना चांगल्या चर्च ला आमंत्रित करा किंवा तेथे पाठवा जे त्यांच्याजवळ आहे जेणेकरून बायबल आणखी काय शिकविते ते ऐकावे. (वाचामत्तय 28:19-20)
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरिता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्यानांवात, मला आत्मे जिंकणारा केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझ्या आत्म्याने मला सामर्थ्यशाली कर की तुझ्या राज्यासाठी आत्मे जिंकावे. तारणाच्या शुभवर्तमानाची जबाबदारी मला दिल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आमेन.
कुटुंबाचे तारण
पित्या, तुझे वचन म्हणते, "पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे [येशूकडे] येऊ शकत नाही" (योहान ६:४४). मी विनंती करतो की माझ्या सर्व सदस्यांना तुझा पुत्र येशूकडे तू आकर्षित कर, म्हणजे त्यांनी तुला वैयक्तिकरित्या ओळखावे आणि तुझ्याबरोबर अनंतकाळ घालवावा.
आर्थिक प्रगती
हे परमेश्वरा, येशूच्या नावाने मला लाभहीन आणि निष्फळ श्रमापासून सोडव. कृपा करून माझ्या हाताच्या कार्यास आशीर्वादित कर.
आतापासून माझे सर्व निवेश व परिश्रम माझी कारकीर्द आणि सेवाकार्याच्या प्रारंभापासून हे येशूच्या नावाने त्यांचे पूर्ण लाभ प्राप्त करू लागेल.
केएसएम चर्च:
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की पास्टर मायकल आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आणि त्यांचे सर्व संघ सदस्य हे चांगल्या आरोग्यात राहावेत. असे होवो की तुझी शांती त्यांस व त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांभोवती असो.
राष्ट्र:
पित्या, येशूच्या नावाने, पुढारी, आणि राष्ट्राचे व्यवस्थापन करण्यासाठी शहाणपण आणि समंजस पुरुष व स्त्रिया निर्माण कर
Join our WhatsApp Channel
Most Read
● भविष्यात्मक मध्यस्थी● छाटण्याचा समय
● त्याच्या सामर्थ्याचा उद्देश
● दिवस ०२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दिवस २४:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● लोक बहाणे करण्याची कारणे- भाग १
● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
टिप्पण्या