डेली मन्ना
दिवस ३५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Sunday, 14th of January 2024
28
17
909
Categories :
उपास व प्रार्थना
देहाला वधस्तंभावर खिळा
“मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” (मत्तय. १६:२४)
देहाच्या इच्छेशी संघर्ष करण्यासाठी उपास आणि प्रार्थनेत व्यस्त राहण्याची आवश्यकता आहे. आपण देहाला वधस्तंभावर खिळले पाहिजे, कारण त्याचा कल जन्मजात स्वार्थी वृत्तीकडे असतो आणि देवाला गौरव आणत नाही.
देह नेहमीच त्याच्या मार्गाने जाण्याचा विचार करतो आणि जे काही देहाच्या शक्तीने केले जाते ते स्वार्थी आहे. विश्वासणारे म्हणून, आपण आत्म्यात जिवंत आहोत, आणि आपल्या संवेदनांवर अवलंबून राहण्याऐवजी आपण आत्म्यानुसार चालावे अशी देवाची अपेक्षा आहे. विश्वासणारे त्यांच्या कृत्यांना निर्देश देण्यासाठी त्यांच्या संवेदना आणि भावनांवर विसंबून असतात, परंतु विश्वासणारे म्हणून, आपले मार्गदर्शन देवाच्या आत्म्यापासून येते. “कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो, तितक्यांना देवाची मुले म्हणतात” हे या वाक्यामध्ये अनुभवले आहे. आपल्या पुत्रत्वाचा पुरावा हा जेव्हा आपण आत्म्याने मार्गदर्शित असतो.
देह सतत देवाच्या गोष्टींच्या विरुद्ध असतो, आणि देवाच्या गोष्टी ह्या जन्मजात देहाच्या इच्छेच्या विरोधात आहेत (गलती. ५:१७).
विश्वासुपणे ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी आणि देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी, दररोज देहाला वधस्तंभावर खिळण्याचे आचरण ठेवणे महत्वाचे आहे, जसे पौल गलतीकरांस पत्रामध्ये “मी दररोज मरतो” या शब्दांनी अधोरेखित करतो (१ करिंथ. १५:३१). ख्रिस्ती चालणे हे दररोजचे समर्पण आहे, मग कोणी ख्रिस्ताला कधीही स्वीकारलेले असो, देवासोबत चालण्यासाठी सतत प्रयत्नशील असण्याची गरज असते.
वर्षांपूर्वी तुमचे जीवन ख्रिस्ताला दिले आहे हे तुम्हांला दैनंदिन जबाबदारीपासून मुक्त करत नाही. ख्रिस्ती म्हणून चालण्यात प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे, आणि देवासोबत चालण्यासाठी दररोज देहाला मरण्याची आवश्यकता असते. विविध नकारात्मक भावना आणि इच्छा प्रदर्शित करण्याकडे देहाचा कल असतो, ज्यामध्ये मत्सर, निंदा, आणि जगिक सुखविलासासाठी इच्छा यांचा समावेश असतो, हे सर्व देवाचे गौरव करत नाही.
रोम. ६:६ म्हणते, “हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्यासोबत वधस्तंभावर खिळला गेला.”
आपण दररोज पापाला मेले पाहिजे. आपला जुना मनुष्य ख्रिस्तासोबत आधीच मृत आहे, पण आपल्या स्वतःवर ख्रिस्ताचा विजय लागू केला पाहिजे.
रोम. ६:६ मध्ये, देहाला वधस्तंभावर खिळा याचा उल्लेख केला आहे की पापाचे दास होण्यास टाळण्यासाठी ही एक प्रमुख आवश्यकता आहे. जरी देवाने विश्वासणाऱ्यांना पाप आणि देहाच्या कृत्यांपासून सोडवले असले तरी, आपल्या स्वतःला वधस्तंभावर न खिळण्याचे परिणाम एखाद्याला भावना, आकांक्षा आणि भ्रष्ट आचरणाच्या गुलामिगीरीत पुन्ह घेऊन जाण्याकडे होऊ शकते. त्यामुळे, देहाला वधस्तंभावर खिळण्यासाठी कळकळीने प्रार्थना करणे महत्वाचे आहे.
देहाला वधस्तंभावर खिळणे हे पुढील गोष्टींद्वारे पूर्ण केले जाऊ शकते
पापकबुली. जीवन आणि मृत्यूची शक्ती जीभेमध्ये आहे (नीतिसूत्रे १८:२१). “मी ख्रिस्तासोबत खिळलेलो आहे” असे दररोज मानण्याने पापी इच्छेंवर प्रभुत्व करणारी आवश्यक शक्ती मोकळी होते. तुमच्या शब्दाचा अधिकार ओळखणे हे महत्वाचे आहे जेव्हा देहाला वधस्तंभावर खिळण्याचा विषय येतो.
आध्यात्मिक कृत्यांमध्ये व्यस्त राहणे जसे देवाच्या वचनासोबत संगती, प्रार्थना, उपास आणि वचनावर मनन करणे हे देहाला वधस्तंभावर खिळण्यास मदत करते. वचनांचे असे पालन आत्म्यामध्ये चालण्यासाठी आणि आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी योगदान देते.
तुमच्या प्रार्थनामय जीवनात कमकुवतपणा हे दर्शवू शकतो की देह आत्म्यावर प्रभुत्व मिळवत आहे.
आत्म्यात चालण्यासाठी आणि येशूच्या नावाने आत्म्याची फळे देण्यासाठी देवाने तुम्हांला कृपा प्रदान करावी म्हणून मी तुमच्यासाठी आज प्रार्थना करत आहे.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. येशूच्या नावाने, देहाचे प्रत्येक कार्य जे माझ्या आध्यात्मिक वाढीसाठी अडथळा करत आहे त्यास मी नष्ट करत आहे. येशूच्या नावाने. (रोम. ८:१३)
२. येशूच्या नावाने, माझ्या स्वप्नांमध्ये चालाखी आणि हल्ल्यांचा मी अंत करत आहे. येशूच्या नावाने. (२ करिंथ. १०:४-५)
३. येशूच्या नावाने, क्रोध, लैंगिक सुखासाठी वासना, प्रसिद्धीसाठी इच्छा आणि अधार्मिक गोष्टींचा लोभ यांच्या प्रत्येक भावनेला येशूच्या नावाने मी वधस्तंभावर खिळत आहे. (गलती. ५:२४)
४. देवाची शक्ती, माझ्या शरीरातून प्रवाहित होवो. देवाची शक्ती, माझ्या आत्म्यातून प्रवाहित होवो. देवाची शक्ती माझ्या प्राणातून प्रवाहित होवो येशूच्या नावाने. (इफिस. ३:१६)
५. येशूच्या नावाने, माझ्या जीवनातील पापाच्या प्रत्येक कृत्यास येशू ख्रिस्ताच्या नावाने मी वधस्तंभी खिळतो. (रोम. ६:६)
६. मी आदेश देतो आणि घोषित करतो की पापाचे माझ्यावर वर्चस्व राहणार नाही. (रोम. ६:१४)
७. प्रत्येक सवय मोडलेली आहे. प्रत्येक विनाशकारक सवय माझ्या जीवनातून येशू ख्रिस्ताच्या नावाने उपटून टाकली आणि नष्ट केली आहे. (योहान. ८:३६)
८. येशू ख्रिस्ताच्या नावाने, माझ्या जीवनातील उदासीन आणि प्रार्थनाहिनतेच्या प्रत्येक आत्म्यावर येशूच्या नावाने मी प्रभुत्व मिळवतो. (प्रकटीकरण ३:१६)
९. माझ्या आध्यात्मिक वाढीला अडथळा करणारी प्रत्येक वासना, भ्रष्टता आणि कमकुवतपणाला येशूच्या नावाने मी नष्ट करतो. (कलस्सै. ३:५)
१०. हे परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या नावाने मला नियंत्रण ठेवून बोलण्यासाठी आणि माझ्या भावनांना सांभाळण्यासाठी शक्ती प्रदान कर. (याकोब १:२६)
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचा गुरु कोण आहे- II● शुद्धीकरणाचे तेल
● अन्य भाषा जी देवाची भाषा
● अविश्वास
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 1
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला
● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
टिप्पण्या