डेली मन्ना
दिवस ३७:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Tuesday, 16th of January 2024
32
16
1236
Categories :
उपास व प्रार्थना
नापीकपणाच्या शक्तीला मोडणे
“शौलाची कन्या मीखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही.” (२ शमुवेल ६:२३)
चिंतन करण्यासाठी मीखल हे चांगले उदाहरण आहे आणि ते प्रकट करते की लोक मुलबाळ झाल्यावाचून मरू शकतात. हे एका व्यक्तीसाठी दुर्दैवपूर्ण आहे की या पृथ्वीवर यावे आणि मुलबाळ न होताच मरून जावे. त्याच्या लेकरांसाठी देवाची ही इच्छा नाही. देवाने मनुष्याला निर्माण केल्यानंतर पहिला आशीर्वाद जो देवाने मोकळा केला तो फलदायी होणे होता. तो म्हणाला, “फलवंत व्हा”, म्हणून आपण पाहू शकतो की फलवंत होणे हे देवासाठी महत्वाचे आहे. ही अशी गोष्ट आहे ज्याची देवाला खरोखर काळजी आहे, आणि हा पहिला आशीर्वाद होता जो देवाने मनुष्याला दिला. जे काही तुमच्या फलवंत होण्यावर हल्ला करत आहे ते सैतानी आहे आणि प्रार्थनेद्वारे त्यावर उपाय केला पाहिजे.
फलवंत होणे हे केवळ पैसे किंवा मुलबाळ होण्यापुरतेच मर्यादित नाही. ही अशी गोष्ट आहे जी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिसून येते. फलवंत होणे हे उत्पादनशिलतेशी संबंधित असू शकते. म्हणून जेव्हा आपण नापीकपणाबद्दल बोलतो, तेव्हा हे केवळ तुम्ही केव्हा जन्म द्याल त्याबद्दल नाही, तर त्याचा अर्थ काहीही असू शकतो. त्याचा अर्थ उत्पादनशीलता, परिणामाचा अभाव किंवा अपयश.
उत्पत्ती ४९:२२ मध्ये, ते म्हणते, “योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्झराजवळ लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डाहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत.”
योसेफाला या वचनात फलवंत शाखा असे चित्रित केले आहे, याचा अर्थ काही लोक आशीर्वादित आणि फलवंत आहेत. ज्याकाही परिस्थितीत योसेफ स्वतःला पाहतो, तो नेहमीच उत्पादनशील आणि यशस्वी आहे कारण आध्यात्मिक क्षेत्रात तो एक फलवंत शाखा आहे.
येथे काही लोक आहेत जे ज्या कशाला स्पर्श करतात ते निकामी होते. जर त्यांनी व्यवसाय सुरु केला, तर तो अपयशी होतो. जे काही ते करतात त्यात अयशस्वी होत राहतात. देवाची त्यांच्यासाठी ही इच्छा नाही आणि त्यांनी त्या नापीकपणाच्या आत्म्याला थांबवले पाहिजे जो त्यांच्या जीवनात अपयश निर्माण करत आहे. त्यामुळेच आपण आज प्रार्थना करणार आहोत की त्या शापाला थांबवावे.
“मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो.”
आपण फलवंत व्हावे अशी देव अपेक्षा ठेवतो. आपण झाडासारखे आहोत; आणि आपण जीवनाच्या सर्व क्षेत्रात फलवंत व्हावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणूनच शब्दे, “फळ” “शाखा” आणि “द्राक्षारस” यांचा वापर केला आहे कारण ख्रिस्त आपल्याला उत्तम समज देत होता की फलवंत होणे हे मुलबाळ होण्यापुरतेच मर्यादित नाही. फलवंत होण्याचा संबंध, प्रभाव, परिणाम, उत्पादनशीलता आणि यशाबरोबर आहे. म्हणून, तुम्ही यशस्वी व्हावे अशी देवाची इच्छा आहे, आणि तो म्हणतो त्याच्यामधील प्रत्येक शाखा जी फळ देत नाही तिला काढून टाकण्यात येईल.
तुम्ही फलवंत होण्यासाठी कोणती क्षेत्रे आवश्यक आहेत?
- तुमच्या वैवाहिक जीवनात, कुटुंबात तुम्हांला फलवंत होण्याची आवश्यकता आहे.
- चर्चमध्ये तुम्हांला फलवंत होण्याची आवश्यकता आहे. चर्चमध्ये तुम्ही कोणता प्रभाव पाडत आहात? तुम्ही आत्मे जिंकत आहात आणि सुवार्ता प्रसार करत आहात का? तुम्ही पृथ्वीवर देवाचे राज्य वाढवत आहात का किंवा देवाच्या राज्याविषयी तुम्ही निष्क्रिय आहात.
- तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या व्यवसायात तुम्हांला फलवंत होण्याची आवश्यकता आहे. तुम्ही व्यवसायात केवळ यासाठी नाही की तुम्ही काय खाल, तर तुम्ही व्यवसायात आहात की समाजाच्या समस्या सोडवाव्यात. हे तीन मुख्य मार्ग आहेत ज्यामध्ये आपण फलवंत व्हावे अशी देवाची इच्छा आहे
जेव्हा माणूस नापीकपणाचा अनुभव करत आहे, तेव्हा त्याचा प्रभाव अनुभवला जाणार नाही. जेव्हा ते निघून जातात, तेव्हा कोणालाही माहित नसते की ते निघून गेले आहेत. त्यांच्या प्रभावाचा अनुभव केलेला नाही; त्यांना गमावले आहे असे कोणालाही वाटत नाही. कोणालाही त्यांच्याबद्दल माहित नसते, आणि ते कोणाच्याही जीवनावर प्रभाव करत नाहीत.
नापीकपणा नशिबाला अचल करतो. नशीब अचल राहते जेव्हा नापीकपणाची ही शक्ती सक्रीय असते. नापीकपणा लज्जा आणतो, म्हणून तुम्ही जेव्हा कोणाला पाहता जो उत्पादनशील नाही, त्याला लाज वाटते. त्याचे डोके झुकलेले असते; कारण मुलभूतरित्या त्याला कमी स्वाभिमान आहे, परंतु जेव्हा आपल्याला निर्माण केले, तेव्हा देवाने आपल्याला प्रगतीशील असे निर्माण केलेले आहे.
म्हणून, जो कोणीही पुढे जात नाही तो मागे चालला आहे कारण नापीकपणा माणसाला एकाच ठिकाणी ठेवतो, आणि जीवन अचलतेला प्रतिबंध करते.
देवाचे वचन सांगते की परमेश्वर तुम्हांला अधिक आणि अधिक वाढवो (स्तोत्र. ११५:१४), म्हणजे तुम्ही सतत वाढत राहावे. नापीकपणा हा शाप आहे; देवाच्या मुलासाठी तो नाही. पण देवाचे मुल जर त्या नापीकपणाच्या शक्तीला मोडण्यासाठी प्रयत्न करत नाही, तर ते त्याच्या जीवनात परवानगीने कार्य करू शकते.
आज, मी तुमच्या जीवनावर आदेश देत आहे की येशूच्या नावाने तुमच्या जीवनावरील नापीकपणाची प्रत्येक शक्ती मोडली जावी.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. माझ्या जीवनाच्या विरोधात कार्य करणाऱ्या नापीकपणाच्या प्रत्येक शक्तीला येशूच्या नावाने मी मोडतो. (गलती. ३:१३)
२. प्रगती करण्यापासून अडथळा आणि प्रतिबंध करणारी प्रत्येक शक्ती, येशूच्या नावाने विस्कळीत आणि नष्ट केली जावी. (यशया ५४:१७)
३. माझी वाढ, उभारणी आणि प्रगतीला मर्यादित करण्यासाठी दिलेला प्रत्येक सैतानी स्थायी आदेश येशूच्या नावाने आणि येशूच्या रक्ताद्वारे, मी त्या स्थायी आदेशाला येशूच्या नावाने संपुष्टात आणतो. (२ करिंथ. १०:४)
४. येशूच्या रक्ताद्वारे आणि कृपेच्या आत्म्याद्वारे, मी येशूच्या नावाने या पातळीवरून अधिक वाढतो. (इब्री. ४:१६)
५. हे परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या नावाने मला प्रगती करण्यासाठी समर्थ कर. (निर्गम १४:१५)
६. पित्या, ज्या प्रत्येक ठिकाणी मी अडकलो आहे, येशूच्या नावाने त्या प्रत्येक खळग्यातून मला बाहेर काढ, आणि येशूच्या नावाने मला समृद्धीच्या ठिकाणी घेऊन जा. (स्तोत्र. ४०:२)
७. पित्या, माझ्याकडे मदत पाठव, माझ्याकडे माणसे पाठव, येशूच्या नावाने जे लोक मला उन्नत करतील. (स्तोत्र. १२१:१-२)
८. हे परमेश्वरा, माझ्या मार्गात नवीन संधी याव्यात म्हणून मी प्रार्थना करत आहे. मी प्रार्थना करतो की स्वर्गातून माझ्यासाठी आशीर्वाद यावेत आणि येशूच्या नावाने मजवर पाऊसासारखे वर्षाव करावे. (मलाखी ३:१०)
९. अचलता आणि मर्यादेचा प्रत्येक आत्मा, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हांला माझ्या जीवनातून मोडून काढतो. (फिलिप्पै. ४:१३)
१०. माझ्या हाताच्या कामांना नष्ट करणारी आणि त्यावर हल्ला करणारी प्रत्येक शक्ती, येशूच्या नावाने, आज संपुष्टात यावी आणि येशूच्या नावाने नष्ट होवो. आमेन. (अनुवाद २८:१२)
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचे संबंध गमावू नका● अभिषेक आल्या नंतर काय होते
● देवाच्या सिद्ध इच्छेसाठी प्रार्थना करा
● वराला भेटण्यास तयार राहा
● तुम्ही अजूनही का वाट पाहत आहात?
● आत्म्याची नावे आणि शीर्षक: देवाचा आत्मा
● विश्वासाद्वारे प्राप्त करणे
टिप्पण्या