डेली मन्ना
दिवस ३९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Thursday, 18th of January 2024
38
26
944
Categories :
उपास व प्रार्थना
मला चमत्काराची आवश्यकता आहे
“त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्या द्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हां सर्वांसमक्ष ही शरीरसंपत्ती प्राप्त झाली आहे.” (प्रेषित. ३:१६)
चमत्कार हे देवाचे अलौकिक कृत्ये आहेत ज्यांना नैसर्गिक क्षेत्रात प्रदर्शित केले जाते जे मानवी स्पष्टीकरणाच्याही पलीकडील आहे. चमत्कारांना स्पष्ट करता येऊ शकत नाही; ते काहीतरी आहेत ज्यांचा देवाच्या सामर्थ्याने माणसांना आनंद घेता येतो. आपल्या जीवनात एका किंवा इतर क्षणी, आपण चमत्काराचा आनंद घेतला आहे.
येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान, त्याच्या जीवनात चमत्कार घडत आहेत हे आपण पाहतो. त्याच्यासाठी चमत्कार हे सामान्य गोष्टी होत्या. प्रेषितांनी देखील चमत्कार केलेले आहेत. जेव्हा एका विषारी सापाने पौलाच्या हातावर उडी मारली, लोकांना वाटले की तो मरेल, पण तो मेला नाही (प्रेषित. २८:४-६). त्याने चमत्कार अनुभवला. देवाने येशू आणि प्रेषितांच्या हाताने चमत्कार होऊ दिले.
जुन्या करारात देखील, आपण विविध प्रकारचे चमत्कार पाहतो. आज, आपल्या प्रार्थनेचे ध्येय हे आपल्या जीवनात देवाच्या सामर्थ्याच्या चमत्काराला होण्यासाठी प्रार्थना करण्यावर केंद्रित असेल. तुम्हांला कोठे चमत्काराची गरज आहे हे मला माहित नाही, परंतु मी प्रार्थना करतो आणि विश्वास ठेवतो की या हंगामात येशूच्या नावाने तुम्ही चमत्काराला प्राप्त कराल.
आपल्याला चमत्काराची आवश्यकता का आहे?
१. त्यांना चमत्काराची आवश्यकता असते जेव्हा त्यांची मानवी शक्ती त्यांना अपयशी करत असते.
२. त्यांना चमत्काराची आवश्यकता असते जेव्हा युद्धे ही त्यांच्या विरोधात कठीण असतात.
३. त्यांना चमत्काराची आवश्यकता असते जेव्हा तेथे काहीही आशा राहत नाही, सर्व आशा संपुष्टात आलेली असते.
४. त्यांना चमत्काराची आवश्यकता असते जेव्हा त्यांना दिलेले काम योग्यवेळेत पूर्ण करायचे असते.
५. त्यांना चमत्काराची आवश्यकता असते जेव्हा गोष्टी त्यांच्या विरोधात काम करत असतात, आणि त्या गोष्टी त्यांच्या विरोधात का काम करत आहेत या रहस्याला ते स्पष्ट करू शकत नाहीत.
६. लोकांना चमत्काराची आवश्यकता असते जेव्हा ते लज्जास्पस्द आणि उपहासाच्या टप्प्यावर असतात.
७. लोकांना चमत्काराची आवश्यकता असते जेव्हा त्यांना प्राणघातक धोक्याच्या रोगांना सामोरे जावे लागते.
८. लोकांना चमत्काराची आवश्यकता असते जेव्हा पुरवठा करण्याची आवश्यकता असते.
९. लोकांना चमत्काराची आवश्यकता असते जेव्हा मदत करण्यासाठी कोणीही नसतो. मी अशा प्रकरणांना ऐकले आहे जेव्हा लोकांचे अपहरण केले आहे, आणि तेथे त्यांना काहीही मदत नव्हती, परंतु चमत्कार झाला आणि त्यांना काहीही हानी न होता ते त्यांच्या
प्रियजनाकडे. परत आले.
जेव्हा तुम्हांला चमत्काराची आवश्यकता असते तेव्हा कोणत्या गोष्टी कराव्यात?
१. तुमचा विश्वास बळकट करा. आपल्या अटळ वचनावरून तुम्ही पाहू शकता की शिष्यांना येशूच्या नावावर विश्वास होता. येशूचे नाव स्वाभाविकपणे चमत्कारिक आहे कारण पवित्र शास्त्र म्हणते की त्याच्या नावाला अद्भुत म्हणतील, याचा अर्थ चमत्कार. (यशया ९:६)
म्हणून, देव आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुमचा विश्वास मजबूत करा कारण तेच क्षणासाठी चमत्कार उत्पन्न करेल.
२. चमत्काराची अपेक्षा बाळगा. तुम्ही चमत्काराची अपेक्षा केली पाहिजे. समस्याची अपेक्षा करू नका. लज्जेची अपेक्षा करू नका. मृत्यूची अपेक्षा करू नका. भौतिक क्षेत्रात काय घडत आहे याची पर्वा केल्याविना, देवाच्या मध्यस्थीची अपेक्षा करा.
३. तुम्ही चमत्काराची अपेक्षा केलीच पाहिजे. पवित्र शास्त्र म्हणते तुमच्या अपेक्षेला कमी केले जाणार नाही (नीतिसूत्रे २३:१८). म्हणून, जर तुम्ही चमत्काराची अपेक्षा करत नसाल, तर एखाद्या चमत्काराचा आनंद घेणे हे तुमच्यासाठी कठीण होऊन जाईल.
४. चमत्कारासाठी प्रार्थना करा. प्रार्थनेने तुम्हांला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होतील. प्रार्थना ही प्रमुख किल्ली आहे जी दरवाजे उघडण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही चमत्कारासाठी प्रार्थना केली पाहिजे.
५. धन्यवाद दया आणि उपासना करा. जेव्हा येशू भाकर आणि मासे बहुगुणीत करणार होता, तेव्हा त्याने धन्यवाद दिला (योहान. ६:११). धन्यवाद देणे चमत्कारांना चालना देऊ शकते.
उपासना, स्तुती आणि धन्यवाद देणे हे चमत्कारांसाठी चालना देऊ शकतात. जेव्हा पौल आणि सीला तुरुंगात होते, त्यांनी प्रार्थना केली आणि देवाच्या स्तुतीसाठी गीते गाईली, आणि तेथे भूमिकंप झाला.
तो भूमिकंप चमत्कार होता (प्रेषित. १६:२५-२६). तुम्ही तो आवाज मोकळा करण्यास शिकले पाहिजे जे देवाच्या उपस्थितीला आकर्षित करेल. जेव्हा तुम्ही गरजेमध्ये आणि त्रासाच्या समयात आहात, जितके अधिक तुम्ही तक्रार कराल, तितके अधिक चमत्कार तुमच्यापासून दूर असेल.
ते कसे केले जाईल हे जाणण्याची तुम्हांला आवश्यकता नाही. देवाने त्यात पाऊल टाकण्याचे आणि तुम्हांला मदत करण्याची केवळ अपेक्षा बाळगा.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. हे परमेश्वरा, माझ्या जीवनाच्या ह्या समयी मला चमत्काराची आवश्यकता आहे. येशूच्या नावाने. (यिर्मया ३२:२७)
२. पित्या, या महिन्यात, या हंगामात तरतुदीच्या चमत्कारासाठी मी प्रार्थना करत आहे, येशूच्या नावाने जे माझ्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करेल. (फिलिप्पै. ४:१९)
३. पित्या, या हंगामात माझ्या जीवनात बहुगुणीत होण्याच्या आणि वाढ होण्याच्या चमत्कारासाठी येशूच्या नावाने मी प्रार्थना करत आहे. (२ करिंथ. ९:८)
४. पित्या, येशूच्या नावाने माझ्या जीवनात मदतीच्या चमत्कारासाठी मी प्रार्थना करत आहे. (स्तोत्र. १२१:१-२)
५. या संपूर्ण वर्षभरात, माझ्या जीवनाच्या सर्व भागात आणि माझ्या वित्तीयतेमध्ये येशूच्या नावाने मी चमत्काराचा आनंद घेईन. (अनुवाद २८:१२)
६. पित्या, जेथे मार्ग नाही तेथे माझ्यासाठी येशूच्या नावाने मार्ग तयार कर. (यशया ४३:१९)
७. येशूच्या नावाने, मी चमत्कारात चालत आहे, मी विजयात चालत आहे, मी विपुलतेत चालत आहे, येशूच्या नावाने. (३ योहान. २)
८. माझ्या जीवनात कोणतेही बंद झालेले दार आत्ताच येशू ख्रिस्ताच्या नावाने उघडे व्हावेत. (प्रकटीकरण ३:८)
९. पित्या, येशूच्या नावाने माझ्यासाठी नवीन दारे उघड, आशीर्वादांची दारे, उन्नतीची दारे, प्रगतीची दारे. (स्तोत्र. ८४:११)
१०. कोणतेही गमावलेले आशीर्वाद आणि नियुक्ती मी पुन्हा प्राप्त करतो. ते कसे घडेल हे मला माहित नाही. परंतु या हंगामात येशूच्या नावाने ते नक्कीच घडेल. (योएल २:२५)
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रभू येशू : शांतीचा स्त्रोत● अविश्वास
● दार बंद करा
● देवाच्या सिद्ध इच्छेसाठी प्रार्थना करा
● ख्रिस्ती लोक देवदूतांना आज्ञा देऊ शकतात का?
● छाटण्याचा समय
● कटूपणाची पीडा
टिप्पण्या