डेली मन्ना
रहस्य स्वीकारणे
Thursday, 25th of January 2024
31
19
753
Categories :
परमेश्वराची उपस्थिती
प्रार्थना
राज आणि प्रिया मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत होते. एका रात्री, जेव्हा त्यांची मुले झोपलेली होती, देवाचे साहाय्य मागण्यासाठी ते त्यांच्या सोफ्यावर बसले. अचानकपणे, त्यांनी हे म्हणताना ही वाणी ऐकली, “जर तुम्हांला मदत हवी असेल, तर ९-१-१” ला फोन करा.
आश्चर्यचकितपणे, त्यांनी एकमेकांकडे पाहिले.
ती वाणी एका कोपऱ्यातून येताना दिसत होती जेथे त्यांच्या मुलाची खेळणी ठेवलेली होती. ते तेथे गेले, त्यांनी बत्ती लावली आणि त्यांच्या मुलाच्या खेळणीची रुग्णवाहिका रस्त्याच्या मध्ये पडलेल्यावाचून सर्वकाही सामान्य आहे असे पाहिले. जेव्हा त्याने त्यावरील बटन दाबले, ते म्हणाले, “जर तुम्हांला मदत हवी असेल, तर ९-१-१” ला फोन करा. ती खेळणी स्वतःहूनच कशी चालू लागली हे पाहून ते आश्चर्यात होते. “जर तुम्हांला मदत हवी असेल, तर ९-१-१-स्तोत्र. ९१:१” ला फोन करा असे पवित्र आत्मा राजला सांगत आहे असे वाटले. त्यांनी बायबलमधील वचन वाचले, “जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.”
राज आणि प्रियाला वाटले की हा देवाचा मार्ग होता जो त्यांना हे दाखवत होता की त्यांनी त्याच्याबरोबरच्या त्यांच्या सहभागीतेवर अधिक लक्ष केंद्रित करावे, “गुप्त स्थान” जेथे ते सर्वशक्तिमानच्या उपस्थितीत राहू शकतात. त्यांनी विश्वास ठेवला की देव त्यांच्या आर्थिक समस्यावर उपाय करण्यास त्यांना मार्गदर्शन करेल जेव्हा त्यांनी त्यांच्या स्वतःला त्याच्याबरोबरच्या घनिष्ठ सहभागितेवर लक्ष केंद्रित केले.
मी खरेच विश्वास ठेवतो की जेव्हा आपण सर्वोच्च परमेश्वराच्या ‘गुप्त स्थानावर’ लक्ष केंद्रित करतो, तेव्हा पृथ्वीवर स्वर्गातून शक्तिशाली गोष्टी घडतात.
नरक आणि त्याची भूते आपल्याला देवाच्या घनिष्ठतेत असण्याच्या आनंदापासून गोंधळात टाकतात आणि अडथळा निर्माण करतात. आजचे जग अशा प्रकारे रचलेले आहे जे ‘गुप्त स्थानापासून’ आपला वेळ आणि शक्ती काढून घेते. नेहमी, चर्च त्याच्या संतांना कार्यक्रमांनी व्यस्त ठेवण्यासाठी बराच प्रयत्न करते. विश्वासणारा ज्याचे ‘गुप्त जीवन’ हे इतके प्रेरणादायक आहे आणि उत्साहवर्धक असे आहे की जे इतरांनाही असे करण्यास प्रोत्साहित करते.
पुष्कळ विश्वासणाऱ्यांना ठाऊक आहे की ‘गुप्त स्थानात” वेळ घालवणे हे ख्रिस्ती जीवनासाठी एक प्रमुख किल्ली आहे, परंतु दररोज तसे करण्यासाठी त्यांना अवघड वाटते. तुम्ही तुमच्या ख्रिस्ती जीवनात तुमच्या सामर्थ्याइतपत चालत नाहीत आणि सतत अडखळलेले दिसता असे वाटणे हे कशाप्रमाणे आहे हे मी समजतो.
कधीकधी, जेव्हा आपण थकलेलो आहोत, तेव्हा आपण त्या गोष्टींकडे वळतो, जसे टेलीव्हिजन लावतो, रात्रीच्या क्लबला किंवा संगीत मैफिलीला जातो की बरे वाटावे. आपल्याला वाटते की अशी कृत्ये आपल्याला ताजेतवाने करतील, परंतु ते आपल्याला आपण पुन्हा रिकामी आहोत असेच सामान्यपणे आभास करवून देते. खोलवर, आपण हे जाणतो की, शांतपणे बसणे, देवाचे वचन ऐकणे आणि देवाच्या उपस्थितीत राहण्यापासून जी शक्ती आपल्याला मिळते ते ही अडथळे आपल्याला देऊ शकत नाहीत. हे येथेच खरी शक्ती आणि पूर्णता आढळते.
“३ त्याने दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून ‘कर्नेल्या, अशी आपणास हाक मारत आहे. ४ तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, ‘काय महाराज?’ त्याने त्याला म्हटले, ‘तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत.” (प्रेषित. १०:३-४)
या भेटीनंतर कर्नेल्याच्या जीवनापासून जो फलदायीपणा उत्पन्न झाला तो आश्चर्यकारक होता. तो केवळ वैयक्तिक आशीर्वाद नव्हता; ती एक दैवी रणनीती होती, एक तरंग उमटण्याचा प्रभाव जो त्याच्या घराण्याव्यतिरिक्त जगभरातील राष्ट्रांपर्यंत पोहचेल. तसेच तुम्हांला देखील घडू शकते. ‘गुप्त स्थळी” वेळ घालवणे हे गुप्तच आहे!
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, मला तुझ्या हृदयाजवळ आकर्षित कर. मला तुझ्या गुप्त स्थळी निवास करू दे आणि येशूच्या नावाने तुझ्या संरक्षणात्मक सावलीखाली मला शांती प्राप्त करू दे. (स्तोत्र. ९१:१)
परमेश्वरा, माझ्या जीवनाच्या प्रत्येक पैलूंमध्ये, येशूच्या नावाने मी तुला माझा कायम आश्रय आणि अटळ किल्ला असे घोषित करतो. (स्तोत्र. ९१:२)
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ०१ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे● धार्मिक सवयी
● कोणीही आवडता नाही परंतु घनिष्ठ
● लहान तडजोडी
● देवाचे मुख होणे
● कृपा दाखविण्याचे व्यवहारिक मार्ग
● लहान बियापासून ते उंच झाडांपर्यंत
टिप्पण्या