खिन्नता, वेदना आणि अपमानाने भरलेल्या जगात, मानसिक, भावनिक आणि शारीरिक-आरोग्य देण्यासाठी बोलावणे- हे नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात आहे. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून, आपल्याला आरोग्य देणारे पात्र म्हणून बोलावण्यात आले आहे, तीच करुणा, समज आणि प्रीती द्यावी जी आपल्यावर उदारपणे ओतली गेली आहे. तरीही, आपण इतरांची सेवा प्रभावीपणे कशी करू शकतो जेव्हा आपण स्वतःच क्षमाहिनतेच्या शृंखलेमध्ये अडकलेले आहोत? प्रेषित पौल, इफिसकरांस त्याच्या पत्रात, क्षमेच्या महत्वावर जोर देतो, “आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा [लवकर आणि मुक्तपणे] करा” (इफिस. ४:३२). हे वचन आपल्याला केवळ क्षमा करण्यास सांगत नाही परंतु आपले प्रमाण म्हणून क्षमा करण्याच्या दैवी नमुन्यावर जोर देतो.
क्षमा करण्याचा दैवी नमुना
सर्व क्षमाशीलतेचा पाया हा आपल्या प्रती देवाच्या कृपेच्या गहन सत्यतेमध्ये मुळावलेला आहे, जे वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या बलीदानात्मक कृत्याचे प्रतिक आहे. ही प्रीतीची अतुलनीय कृती आहे जी क्षमा करण्याच्या आपल्या क्षमतेस मजबूत बनवते. वधस्तंभ स्वयं क्षमेचे दोन आयामांचे प्रतिक आहे- वरील आणि समानांतर- प्रत्येक हे क्षमेच्या प्रवासाचे महत्वपूर्ण पैलू प्रतिनिधित करते.
वरील क्षमा
वधस्तंभाचा उभा खांब ख्रिस्त येशूद्वारे देवासोबतच्या आपल्या समेटाकडे आपले लक्ष वेधते. हे आपल्याला देवाकडून मिळालेल्या क्षमेचे स्पष्ट प्रतिनिधित्व आहे, एक कृत्य जे ख्रिस्ताच्या पूर्ण केलेल्या कामाद्वारे त्याच्याकडून सुरु केलेले आणि पूर्ण केलेले आहे. “त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे” (इफिस. १:७). ही वरील क्षमा ही मुक्ती आणि आरोग्यासाठी मार्ग आहे, जी आपल्या निर्माणकर्त्याबरोबर आपल्याला स्वच्छ आणि नवीन नाते प्रदान करते.
समानांतर
वधस्तंभाचा आडवा खांब क्षमेचे प्रतिक आहे जी आपण एकमेकांना दिली पाहिजे आणि क्षमा जी आपण आपल्या स्वतःला लागू केली पाहिजे. हा दुहेरी मार्ग-इतरांना क्षमा करणे आणि स्वतःला क्षमा करणे –हे पूर्ण आरोग्य आणि पुन:स्थापित होण्यासाठी महत्वाचे आहे. प्रभूच्या प्रार्थनेत येशूची शिकवण या कल्पनेवर पुन्हा भर देते, “आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले, तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड” (मत्तय. ६:१२). ही आठवण आहे की देवाकडून आपली क्षमा ही इतरांना क्षमा करण्यात गुंतलेली आहे.
दोन शिष्यांची कथा
पेत्र आणि यहूदाच्या स्पर्श करणाऱ्या कथांसह सुवार्ता आपल्याला सादर करते, प्रभूचे हे दोन शिष्य ज्यांनी विश्वासघाताच्या संकटाचा सामना केला आणि तरीही भिन्न मार्गाचे अनुसरण केले. पेत्र, ज्याने येशूच्या चौकशीच्या दरम्यान येशूचा नकार केला होता, तो क्षमा प्राप्त करण्याच्या परिवर्तनीय सामर्थ्याला प्रतिनिधित करतो. जरी तो पतन पावला होता, तरीही येशूच्या क्षमा आणि कृपेने पुन:स्थापित केला गेला, नंतर प्रारंभीच्या चर्चचा स्तंभ झाला. त्याची कथा आशा आणि नुतनीकरणाची साक्ष आहे जी देवाची दया स्वीकारण्याद्वारे येते. (योहान. २१:१५-१९)
या उलट, यहूदा इस्कर्योत, ज्याने येशूचा विश्वासघात केला, तो क्षमा स्वीकारण्याचा नकार करण्याचे दुर्दैवी परिणाम दर्शवतो. दोष आणि निराशेने भारावून गेलेला, दया मागण्याऐवजी त्याने आत्महत्त्या करण्याचा निर्णय घेतला. त्याचा शेवट एक गहन सत्याला अधोरेखित करतो: हे आपले पाप नाही जे आपल्या नशिबाची व्याख्या करते परंतु देवाच्या क्षमेला आपला प्रतिसाद. (मत्तय. २७:३-५)
क्षमा स्वीकारणे
क्षमा ही केवळ भावनात्मक भाव नाही; ती जाणूनबुजून एक निवड आहे जे आध्यात्मिक आणि भावनिक स्वतंत्रतेकडे नेते. संदेष्टा यिर्मया घोषणा देतो, “मी त्यांच्या अपराधांची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही” (यिर्मया ३१:३४). आपल्या अपराधांना विसरण्याच्या देवाच्या निर्णयाला, दैवी स्मृतिभ्रंश म्हणून ओळखले जाते, जे आपल्याला त्याच्या क्षमेच्या विस्तृतपणाची झलक देते, आणि अनुसरण करण्यासाठी आदर्श म्हणून कार्य करते.
इतरांना क्षमा प्रदान करणे
इतरांना क्षमा करणे हे करण्यापेक्षा बोलणे सोपे असते, विशेषेकरून जेव्हा जखमा ह्या खोल असतात. तरीही, आरोग्यासाठी ही महत्वाची पायरी आहे. क्षमा करण्याचे कृत्य कटुपणा आणि संतापाच्या बंधनातून आपल्याला मुक्त करते, जे आपल्या खिन्नतेला सुधारण्यासाठी देवाच्या आरोग्य देणाऱ्या प्रकाशाला मार्ग मोकळा करते.
सर्वात कठीण क्षमा
कदाचित क्षमा करण्याच्या सर्वात आव्हानात्मक पैलू हा स्वतःला क्षमा करणे आहे. त्यासाठी आपला अपूर्णपणा मानण्याची आणि देवाची कृपा स्वीकारण्याची आवश्यकता लागते. पेत्रासारखे, आपण आपल्या स्वतःला येशूची प्रीती आणि क्षमेद्वारे पुन:स्थापित होऊ द्यावे, त्याच्यामध्ये एक नवीन सृष्टी म्हणून आपल्या नवीन ओळखीला स्वीकारावे. (२ करिंथ. ५:१७)
जेव्हा आपण देवाच्या क्षमेच्या प्रकाशात चालतो, तेव्हा चला आपण इतरांना आणि आपल्या स्वतःला तीच कृपा प्रदान करावी, हे लक्षात ठेवून की ख्रिस्तामध्ये, आपण भूतकाळातील साखळ्यांपासून मुक्त केलेलो आहोत. असे होवो की वधस्तंभ हा आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या क्षमेच्या रुंदी आणि खोलीचे निरंतर स्मरण असावे, जे आपल्याला त्याच्या स्वतंत्रतेत जगण्यासाठी बोलावत आहे.
प्रार्थना
प्रेमळ पित्या, मी समजतो की मी तुझी प्रीती कधीही कमवू शकत नाही. तुझ्या अतुलनीय प्रीतीबद्दल मी तुझे आभार मानतो. मी तुझ्या क्षमेचा स्वीकार करतो. येशूच्या रक्ताने माझे सर्व दोष आणि लज्जा ही धुतली गेली आहेत. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● उपासनेचा सुगंध● तो पाहत आहे
● कोणीही आवडता नाही परंतु घनिष्ठ
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
● शेवटच्या समयाची 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे #1
● कुटुंबात चांगला वेळ घालवा
● जबाबदारीसह परिपक्वता सुरु होते
टिप्पण्या