डेली मन्ना
तुमच्या भूतकाळाला तुमच्या भविष्यास नाव ठेवू देऊ नका
Tuesday, 13th of February 2024
27
24
1211
याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता; परंतुत्याच्या आईने त्याचे नांव याबेस [क्लेश आणणारा]असे ठेवून म्हटले की त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले. (१ इतिहास ३:९ ऐम्पलीफाईड)
वचन जे आपण आत्ताच वाचले आहे, आपण पाहतो कीत्याची आई त्याचे नांव याबेस ठेवत आहे, त्याचा अर्थ 'क्लेश' किंवा'शोक आणणारा'. तिने कदाचित परिस्थितीमुळे असे केले असेन ज्यामध्ये तो जन्मला ते अत्यंत क्लेशमय होते.
मगत्याची पत्नी [इफ्राइम ची पत्नी]गर्भवती झाली व तिने पुत्राला जन्म दिला आणि त्याने त्याचे नांव बरीया (भाग्यहीन) असे ठेवले; कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.(१ इतिहास७:२३ ऐम्पलीफाईड)
याबेस च्या आई प्रमाणे, एफ्राइम ने त्याच्या मुलाचे नांव बरीया ठेवले"दुष्टतेत" किंवा'भाग्यहीन', कारण तो जन्मला तेव्हा त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.
मागील अनेक वर्षांमध्ये, मी अनेक आईवडिलांना भेटलो आहे, ज्यांनी मला अति गर्वाने म्हटले आहे, "पास्टर, हे माझे मुल माझ्यासाठी फारच भाग्यशाली असे आहे, परंतु माझा दुसरा मुलगा हा माझ्यासाठी भाग्यशाली नाही आहे. जेव्हा तो किंवा ती जन्मली तेव्हा आम्हांला खूपच समस्या होत्या. कृपा करून अशा प्रकारे बोलण्याचे सोडून दया. जे वचन बोलते ते तुम्हाला बोलण्याची गरज आहे. लेकरे ही देवापासून देणगी आहेत, ते त्याच्याकडून पुरस्कार असे आहेत. (स्तोत्र १२७:३)
केवळ याची कल्पना करा, जेव्हा प्रत्येकवेळी हे आईवडील त्यांच्या मुलांना बोलवितात तेत्यांना त्याच्या भूतकाळातील क्लेश किंवा शोक ची आठवण देतात. ते त्यांना पुन्हा भूतकाळात नेते.
भूतकाळ किंवा वर्तमान परिस्थितीला तुमच्या भविष्यावर प्रभाव करू देऊ नका. तुमच्या भूतकाळाला तुमच्यावर आज नियंत्रण किंवा प्रभाव करू देऊ नका. पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा.
प्रेषित पौलाने फिलिप्पै येथील लोकांना लिहिले: प्रियबंधुंनो, मी अजून तेथे नाही जेथे मी असले पाहिजे होते, परंतु मी माझी सर्व शक्ति केवळएकाच गोष्टीवर केंद्रित करीत आहे: मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावीत आहे. (फिलिप्पै ३:१३)
असे आहे की काही वेळ येते जेव्हा आपल्याला भूतकाळातील अनुभवाची पडताळणी व त्याच्या वाढी वर विचार करण्याची गरज असते की आपण त्याकडून काय शिकू शकतो. तथापि, अनेक वेळेला, लोक भूतकाळातील आठवणी वर विचार करीत राहतात, जे'घडले' आहे ते सोडून देऊन जे ' भविष्यात घडू शकते' त्याच्या आशेने त्यांच्याजीवनाला वळण दयावे.
भूतकाळातील कार्ये ही भविष्यातील परिणामाचे दर्शक नाही, हे केवळ निवेश करणे की परत मिळावे यासही लागूआहे; जीवनाशीत्याची समर्पकता.
जेव्हा याबेस मोठा होत होता, कदाचित सर्वांनी त्यास क्लेश व शोक असे म्हटले असेन. कोणीही कधी विचार केला नसेन कीयाबेसत्याच्या जीवनात त्याच्या सभोवताली असणाऱ्या परिस्थितीमुळे काहीतरी करेन. परंतु मी देवाची स्तुति करतो कारण तुमची वर्तमान परिस्थिती तुमच्या नियतीला निश्चित करीत नाही.
जर येथे कोणी आहे जो सध्या जेथे तुम्ही राहत आहात, तुमची वाढ कशी झाली, त्यावर आधारित तुमच्या न्याय करीत आहे, तर हा व्यक्ति मोठी चूक करीत आहे. परमेश्वर जिवंत आहे,
तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचाहोईल.
(ईयोब ८:७)
आणि जरी तुम्ही थोडक्याने सुरु केले, तुमच्याकडे शेवटी अधिक असेल. तुमच्या नंतरच्या दिवसाचे गौरव हे तुमच्या पूर्वीच्या गौरवापेक्षा अधिक असेल.
तुम्ही कोठून आला त्यापेक्षा तुम्ही कोठे जात आहात ते उत्तम आहे. कोणीतरी ते प्राप्त करा.
अंगीकार
(दिवसभर हे बोलत राहा)
जरी माझी सुरुवात ही लहान होती, तरी माझा शेवट हा विपुल असा होईल. जरी मी थोडक्याने सुरुवात केली, विपुलते मध्ये मी शेवट करीन. येशूच्यानांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस १८ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● कालेबचा आत्मा
● मृतामधून प्रथम जन्मलेला
● विश्वासाचे बरे करणारे सामर्थ्य
● चमत्कार करणारा परमेश्वर जो आवश्यकतेपेक्षा अधिक आहे
● दिवस २० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल
टिप्पण्या