करुणा सदन सेवाकार्यात आम्हांला अक्षरशः हजारो आणि हजारो प्रार्थना विनंत्या दररोज येत असतात. यापैंकी अनेक प्रार्थना विनंत्या ह्या आर्थिकतेच्या विषयी संबंधी असतात. हा कठीण काळ आहे परंतु परमेश्वर हा आपला आश्रय व सामर्थ्य आहे, संकटकाळी साहाय्य करण्यास सदा सिद्ध. (स्तोत्र ४६:१)
जेव्हाकेव्हा मी लोकांबरोबर बोलतो, मी नेहमी हे ऐकत असतो की लोक त्यांच्या आर्थिकतेमध्ये नवीन वाटचाल साठी वाट पाहत आहेत. आता हे अगदी पवित्र शास्त्रानुसार आहे हा विश्वास ठेवणे की परमेश्वराने तुमच्या आर्थिकते मध्ये मध्यस्थी करावी- यात काहीही चूक नाही. तथापि, अनेक लोक त्यांची नवीन आर्थिक वाटचाल चुकतात कारण त्यांना ठाऊक नाही की त्यास कसे प्राप्त करावे. कृपा करून मला ते स्पष्ट करू दया.
#१ नेहमी देवाकडे पाहा
जेव्हाकेव्हा तुम्ही आर्थिकतेमध्ये नवीन वाटचाल साठी प्रार्थना करीत आहात, तुम्ही आर्थिकते मध्ये नवीन वाटचाली साठी केवळ परमेश्वराकडे आणि त्याकडेच पाहिले पाहिजे.
प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. (याकोब १:१७)
#२ आर्थिकते मध्ये नवीन वाटचाली चा अर्थ सुद्धा दैवी निर्देश आहे
स्तोत्र ३२:८ मध्ये, परमेश्वर म्हणतो, "मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण दुला देईन." मग ती कारकीर्द असो किंवा एक निवेश संधी किंवा इतर कोणताही निर्णय असो, परमेश्वराकडून एक शब्द तुमची कथा बदलू शकतो.
उत्पत्ति २६ मध्ये, त्या देशात दुष्काळ होता आणि इसहाक ला तो देश सोडावयास पाहिजे होते. हे त्याच क्षणी परमेश्वर त्यास प्रगट झाला व त्यास सांगितले: "ह्याच देशात राहा आणि मी तुझ्याबरोबर असेन व तुला आशीर्वादित करेन" (उत्पत्ति २६:३).
उत्पत्ति २६:१२-१३ आपल्याला सांगते की, "इसहाकाने त्या देशांत धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी शंभरपट पीक मिळाले, आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले; तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला."
परमेश्वराकडून निर्देश हा स्वप्नात, दृष्टांतात, देवाच्या माणसाच्या भविष्यवाणीतून किंवा देवाचे वचन वाचत असताना सुद्धा येऊ शकतो.
#३ आर्थिकतेमध्ये नवीन वाटचाल म्हणजे तुमच्या आर्थिकते वरील शत्रूचे बालेकिल्ले काढून टाकणे सुद्धा आहे.
जर तुम्ही ईयोबाचे पुस्तक वाचता, आपण पाहतो की सैतानाने कसे ईयोबावर आक्रमण केले व त्यास दरिद्री केले (ईयोब १ वाचा). येथे अनेक लोक आहेत जे दुष्ट शक्तीमुळे अत्यंत नुकसान व दारिद्र्याचा अनुभव करतात. याची पर्वा नाही की ते किती कठीण परिश्रम करतात, तरीही काहीही बदल होताना दिसत नाही.
जर ते तुम्ही आहात, तर तुम्हाला उपास व प्रार्थने द्वारे सैतानाचे सामर्थ्य मोडून काढण्याची गरज आहे.
परमेश्वराचे सामर्थ्य नेहमीच तीव्र होते जेव्हा आपण एकत्र येतो व प्रार्थना करतो. (लेवीय २६:८)
तुम्ही ००.०० तासापासून ते दुपार १४.०० तासापर्यंत उपास करू शकता. जर तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही तुमचा उपास १५.०० तासापर्यंत करू शकता.
आम्ही युट्युब वर प्रत्येक मंगळवारी/गुरुवारी/शनिवारी आत्म्याने भरलेल्या वेळेसाठी ६.३० तासाच्या पुढे सुद्धा भेटणार आहोत.
प्रार्थना
पित्या, तुझा हात माझ्यावर आर्थिकतेवर ठेव. तुझे वचन सांगते की तूं आम्हांला सामर्थ्य दिले आहे की संपत्ति वाढवावी. त्यामुळे, परमेश्वरा मला संपन्न करण्याच्या तुझ्या योग्यतेमध्ये मी भरवंसा ठेवतो. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वास, आशा आणि प्रीति● स्वैराचाराच्या सामर्थ्यास मोडणे-२
● पवित्रआत्म्याच्या सर्व वरदानांची मी इच्छा करू शकतो काय?
● तुम्ही कशा साठी वाट पाहत आहात?
● तुम्हांला एकासदुपदेशकाची का गरज लागते
● यशाची परीक्षा
● संकटाच्या काळाकडे पाहणे
टिप्पण्या