डेली मन्ना
देवाच्या सिद्ध इच्छेसाठी प्रार्थना करा
Saturday, 6th of April 2024
28
18
845
Categories :
परमेश्वराची योजना
शलमोन, पृथ्वीवर होऊन गेलेल्या राजांपैकी एक सर्वात ज्ञानी राजा होता, ज्याने जिभेच्या शक्तीबद्दल इतक्या गहन पद्धतीने लिहिले.
“जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात” (नीतिसूत्रे १८:२१).
हे वचन प्रकट करते की मृत्यू हा आजार, वृद्धापकाळ, अपघात आणि बरेच काही द्वारे निर्माण होत नाही परंतु जीभेकडून देखील निर्माण होते. त्याचप्रमाणे, जीवन हे केवळ मानवी कृत्यांपासून निर्माण होत नाही तर जीभेकडून देखील निर्माण होते.
वचन पुढे स्पष्ट करते की “तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात”, हे सुचविते की ते जे त्यांच्या जिभेची काळजी घेतात ते त्याच्या लाभाचा आनंद घेतील तर ते जे असे करत नाहीत ते त्याचे परिणाम भोगतील. त्यामुळे, कोणी त्यांच्या जिभेचा वापर एकतर जीवन किंवा मृत्यू आणण्यासाठी करू शकतात. जसे प्रेषित याकोब लिहतो, “तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधुंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत.” (याकोब ३:९-१०)
प्रार्थनेत जिभेचे सामर्थ्य
प्रार्थनेच्या संदर्भात, जीभ एक महत्वाची भूमिका पार पाडते. बऱ्याच वेळा, आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करण्याचे संकेत किंवा प्रेरणा मिळू शकते, परंतु त्या विषयाकडे कसे जायचे याबाबत आपण निश्चित नसतो. हे मग येथेच पवित्र आत्मा, अन्य भाषेत बोलण्याच्या वरदानाने, देवाच्या इच्छेनुसार आपल्या प्रार्थना करण्यास आपल्याला मदत करतो.
प्रेषित पौल लिहितो, “तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो. आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो.” (रोम. ८:२६-२७)
जेव्हा आपण अन्य भाषेत प्रार्थना करतो, तेव्हा आपण देवाच्या परिपूर्ण इच्छेसाठी प्रार्थना करत असतो जेव्हा पवित्र आत्मा स्वतः आपल्या वतीने मध्यस्थी करत असतो. हे एक शक्तिशाली साधन आहे जे देवाने आपल्याला दिले आहे की त्याच्याबरोबर संवाद करावा आणि त्याच्या इच्छेनुसार आपल्या प्रार्थना एकरूप कराव्यात. १ करिंथ. १४:२ मध्ये जसे पौल लिहित आहे, “कारण अन्य भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे, तर देवाबरोबर बोलतो; कारण ते माणसाला समजत नाही; तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो.”
आत्म्यात प्रार्थना करण्याचे लाभ
आत्म्यात प्रार्थना करण्याचे पुष्कळ लाभ आहेत. पहिले, ते आपला विश्वास बळकट करते. यहूदा लिहितो, “प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा” (यहूदा २०). जेव्हा आपण अन्य भाषेत प्रार्थना करतो, तेव्हा आपण देवासोबत आपला विश्वास आणि आपले नातेसंबंध प्रबळ करत असतो.
दुसरे, आत्म्यात प्रार्थना करणे, देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करण्यास आपल्याला मदत करते. जेव्हा आपण स्वतः पवित्र आत्म्याला शरण जातो आणि त्याला आपल्या द्वारे प्रार्थना करू देतो, तेव्हा आपल्या प्रार्थना ह्या देवाच्या परिपूर्ण योजनेनुसार होऊ शकतात असा आत्मविश्वास आपण बाळगू शकतो. हे खासकरून महत्वाचे आहे जेव्हा आपण कठीण परिस्थितीचा सामना करत असतो किंवा जेव्हा आपल्याला प्रार्थना कशी करावी हे माहित नसते.
तिसरे, अन्य भाषेत प्रार्थना करणे हे शत्रूच्या विरोधात एक शक्तिशाली शस्त्र आहे. इफिस. ६:१८ मध्ये पौल लिहितो, “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा.” जेव्हा आपण आत्म्यात प्रार्थना करतो, तेव्हा आपण आध्यात्मिक लढ्यात सामील होत असतो आणि अंधाराच्या शक्तींना मागे ढकलत असतो.
व्यवहारिक लागुकरण
या शक्तिशाली वरदानाचा महत्वपूर्ण वापर करण्यासाठी, आत्म्यात प्रार्थना करण्यासाठी एक विशेष वेळ वेगळा करणे हे महत्वाचे आहे. तुमच्या दैनंदिन भक्तीच्या वेळी, तसेच कार चालवत असताना, किंवा घरातील किरकोळ कामे करत असताना देखील हे केले जाऊ शकते. तुमच्या प्रार्थनेच्या जीवनात ह्यास एक नियमित भाग करणे हे प्रमुख आहे.
जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, तेव्हा भरवसा ठेवा की पवित्र आत्मा तुमच्या वतीने प्रार्थना करत आहे आणि तुम्ही जे शब्द बोलत आहात ते जरी तुम्ही समजत नसला तरी, तुमच्या प्रार्थना फरक आणत आहेत. लक्षात ठेवा, “नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.” (याकोब ५:१६)
तर मग, जीभ हे शक्तिशाली साधन आहे, त्याचा वापर एकतर चांगल्यासाठी किवा वाइटासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा आपण आपल्या जिभेला पवित्र आत्म्याच्या अधीन करतो आणि आत्म्यात प्रार्थना करतो, तेव्हा आपण आशीर्वाद आणि मध्यस्थीच्या शक्तिशाली स्त्रोताला चालना देत असतो. जेव्हा आपल्या प्रार्थनेच्या जीवनासाठी आपण ह्यास नियमित करतो, तेव्हा आपण गंभीर परिणाम पाहू आणि आपल्या जीवनात देवाच्या परिपूर्ण इच्छेचा अनुभव करू.
अंगीकार
जेव्हा मी अन्य भाषे मध्ये बोलतो, मी येशूच्या नांवात आदेश व घोषणा देतो की मी देवाच्या सिद्ध इच्छे साठी प्रार्थना करीत आहे. मी महान परिणाम पाहीन जे माझ्या शत्रूला सुद्धा आश्चर्यात टाकेल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ०७ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● शाश्वतसाठी आसुसलेले असा, तात्पुरत्यासाठी नाही
● एका उद्देशाने जन्म घेणे
● येशू स्वर्गात काय करीत आहे
● शांति- देवाचे गुप्त शस्त्र
● इतरांवर कृपा करा
● तुम्ही कशा साठी वाट पाहत आहात?
टिप्पण्या