तथापि विश्वासाने दुर्बळ न होता, आपले निर्जीव झालेले शरीर (तो सुमारे शंभर वर्षाचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली; परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वसामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. (रोम ४: १९-२०)
विश्वासाच्या अगदी परीक्षेचे महत्त्व हे विश्वासाला वाढविणे आहे. परमेश्वर मनुष्यांची परीक्षा घेतो, म्हणजे तो त्यांना विश्वासात बळकट करू शकतो, त्यांना स्थिर असे उभे करतो आणि परिस्थितींद्वारे सहज डगमगू नये. तुम्ही जीवनाची आवाहने व वादळांमुळे तुमच्या स्वतःला गडबडीत आहात असे पाहता काय? परमेश्वर अपेक्षा करतो की तुम्ही संकटे व आवाहनांमधून पार जावे, तेव्हा त्याच्यामधील तुमचा विश्वास हा बळकट होईल.
आपले मुख्य वचन अब्राहाम बद्दल बोलते जो ज्या आवाहनांना तोंड देत होता व जग जी निराशा त्याच्यापुढे आणत होते असे असूनही तो त्याच्या जीवनावर देवाच्या आश्वासनांमुळे डगमगला नाही. तो देवा प्रती त्याच्या विश्वासात, देवाला स्तुति व गौरव देत स्थिर असा राहिला. ईयोब सुद्धा त्यापासून वेगळा नव्हता. त्याची सर्व मुलेबाळे, मालमत्ता, व संपत्ति गमाविल्यानंतर, तो तरीही देवाची उपासना करीत होता, त्याच्या संकटाच्या शेवटापर्यंत तो विश्वासात स्थिर असा उभा होता. (ईयोब १:२०-२२)
देवाची आश्वासने ही निश्चित आहेत आणि ती निष्फळ होत नाहीत, परंतु आपल्या जीवनात त्या पूर्ण होऊ शकत नाहीत जर आपण आपला विश्वास गमाविला किंवा निराश असे झालो. आज निराश होण्यास नकार करा. तुम्ही दिवसास त्या शेवटाने पूर्ण करणार नाही जे सैतान म्हणत आहे तसे होईल. त्याचा खोटयापणावर विश्वास ठेवण्यास नकार दया व वचनावर लक्ष केंद्रित करा. त्याचा व त्याच्या कुयोजनांचा प्रतिकार करा. शंके साठी काही जागा ठेवू नका. (याकोब ४:७)
प्रभु येशूने त्याच्या शिष्यांना त्यांच्या अविश्वासाबद्दल नेहमीच सौम्यपणे खडसावले होते. अविश्वासाच्या पापा सारखे कशानेही देवाच्या क्रोधाला डिवचत नाही. शंका घेण्याचा परमेश्वर द्वेष करतो. तो इच्छा करतो की सर्व मनुष्यांनी त्यांच्या दररोजच्या उपजीविका व पुरवठ्यासाठी त्याच्यावर भरंवसा ठेवावा.
विश्वासात स्थिर उभे राहण्यासाठी, त्याच्या वचनामधील देवाच्या आश्वासनांवर तुमच्या स्वतःला सतत आठवण दयायची आहे. वचनाद्वारे तुमच्या विश्वासाला बळकट करा आणि पाहा गोष्टींमध्ये नवीन पालट होत आहे. तुमचा विश्वास हा देवाच्या वचनाद्वारे बळकट होतो जेव्हा ते तुमच्या अंत:करणात आनंदाने स्वीकारले जाते. परमेश्वर व त्याच्या वचना साठी भूक निर्माण करा. तुम्ही, तुमचे कुटुंब, तुमचे आरोग्य, तुमची वित्तीयता, तुमची मुलेबाळे, तुमचा व्यवसाय, तुमच्या परिस्थिती विषयी देवाच्या वचनात काय लिहिले आहे त्याचा शोध घ्या, आणि त्यावर विश्वास ठेवा. येथे असा काही सुरुक्षित स्वीच किंवा जीवनरक्षा कोट नाही जे देवाच्या वचनापेक्षा अधिक खातरी देते. त्याचे वचन होय व आमेन असे आहे. (२ करिंथ १:२०)
देवाच्या लेकरा, त्याने जे केले आहे त्यासाठी त्याची स्तुति करण्याद्वारे देवाच्या आश्वासनांसाठी वाट पाहण्याचे निवडा. याची खातरी करा की तुमची उपासना ही तुमच्या परिस्थिती द्वारे व्यत्ययात येऊ नये. मी तुम्हाला विश्वासात स्थिर उभे असे पाहत आहे व तुम्ही बलाढय झाला आहात.
प्रार्थना
पित्या, तुझ्या वचनासाठी मी तुझे आभार मानतो जे माझ्या विश्वासाला नेहमीच बळकट करते. तुझ्या सर्व आश्वासनांसाठी वाट पाहत राहावे व तडजोड करू नये म्हणून मी तुला कृपे साठी मागत आहे. हे परमेश्वरा, स्थिर असे उभे राहण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● उपासना: शांतीसाठी किल्ली● येशूने गाढवावर स्वारी का केली?
● अनुकरण करा
● सुटकेचा दिवस (दिवस १०)
● कृतज्ञतेसाठी एक धडा
● आध्यात्मिक साहस
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
टिप्पण्या