आम्ही त्याच्यासह कार्य करिता करिता विनंती करितो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. (२ करिंथ ६:१)
आपल्या जीवनात कधी अशी वेळ येते की आपण प्रत्यक्षात फारच रसातळाला गेलेलो असतो. जेथे असे दिसते की आपल्याकडे काही नाही परंतु प्रश्ने, संभ्रम व निराशाच केवळ राहिलेली असते. अशा वेळी आपल्याला ते कृतीत आणावयाचे असते जे इब्री ४:१६ आपल्याला सांगते, "तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ."
शब्द "जावे व मिळावे" ह्याकडे काळजीपूर्वक पाहा. प्रारंभीची मंडळी प्रेषितांच्या पुस्तकात अशा समयी, बायबल सांगते की, "त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काहीं जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला." (प्रेषित १२:१). हेरोदाने विस्तृत प्रमाणात छळ सुरु केला. याकोबाचा वध केला गेला व पेत्राची चौकशी करण्यासाठी त्यास अटक केली होती. त्यांची निराशा, भीति व संभ्रमाच्या मध्य: बायबल प्रेषित १२ मध्ये सांगते की मंडळी एकत्र झाली व कळकळीने प्रार्थना करू लागली. प्रार्थना ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण देवाच्या कृपेवरून सामर्थ्य मिळवितो.
त्यांनी सामर्थ्य मिळविले व तोपर्यंत प्रार्थना करीत राहिले जोपर्यंत ते अलौकिकतेस प्रवृत्त करीत नाही: देवाकडून देवदूताला पाठविले गेले की पेत्राची सुटका करावी. जेव्हा आपण देवाच्या कृपेवरून सामर्थ्य मिळवितो तेव्हा ते अलौकिकतेस प्रवृत्त करते! त्याच आवेशामध्ये, ख्रिस्ती लोकांना बोलाविले गेले आहे की परमेश्वरा बरोबर मिळून एकत्र कार्य करावे. परमेश्वर हा कधीही अविश्वासू नाही! म्हणून, त्याने आपल्याला कृपा ही पुरविली आहे.
येथे कृपेचा अंश व परिमाण आहे जो त्या सर्वांच्या जीवनात आहे जे प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. ही कृपा काही फलक नाही की ते तसेच निष्क्रिय असे राहू दयावे, परंतु त्यामधून प्राप्त करावयाचे आहे की आपल्याला जे सर्व काही जीवन व सेवाकार्यासाठी आवश्यक आहे ते त्यातून घ्यावे.
संपूर्ण जुन्या करारात, तेथे नियमशास्त्र व धार्मिक विधी होते ज्यांचे पालन करणे आवश्यक होते की देवा बरोबर सुखसमाधानात राहावे. ख्रिस्त सर्वांसाठी एकदाच व कायमचा मरण्यासाठी आला की येथून पुढे आपण आपली जीवने असंख्य धार्मिक नियम व विधींचे समाधान करण्याच्या प्रयत्नात घालवू नये जे सतत करीत राहणे हे अत्यंत कठीण असे आहे परंतु आपण कदाचित परमेश्वराचे जीवन अलौकिक सामर्थ्याद्वारे जगावे.
कृपा ही ख्रिस्ता द्वारे आपल्याला पुरविली गेली आहे की परमेश्वराचे जीवन जगावे. हे जीवन ज्यास बायबल 'आत्म्याचे जीवन' सुद्धा म्हणते. हे पूर्णपणे आध्यात्मिक जीवन आहे जे आपल्यामधील देवाच्या आत्म्याद्वारे नियंत्रित आहे. म्हणून, तुम्हाला एक निश्चित मार्ग असे देवाच्या कृपे कडून सामर्थ्य मिळविण्याची गरज आहे की त्याच्या पुरवठ्या मध्ये नेहमीच कायम राहावे.
बायबल म्हणते, "कोणीही मनुष्य आपल्याच बलाने विजयी होत नाही" (१ शमुवेल २:९) आणि तो "नम्र जणांस कृपा पुरवितो" (याकोब ४:६). देवाची आज्ञा पाळण्यात तुम्ही संघर्ष करीत आहात काय? हे कदाचित त्याकारणामुळे की तुम्ही आध्यात्मिक जीवन मनुष्याच्या ज्ञानाद्वारे जगण्याचा प्रयत्न करीत आहात.
जर तुम्ही पूर्णपणे त्याच्या कृपेवर विसंबून राहता, व त्याच्याकडे धाव घेता, तर तो "विश्वसनीय व न्यायी आहे" (१ योहान १:९) की तुम्हाला साहाय्य करावे. आज, तुम्ही काळजी घेतली पाहिजे की देवाच्या कृपेला प्रेरणा करावे की ज्याद्वारे तुमचा सांभाळ व्हावा. आज तुम्ही कृपेच्या विहिरीतून घेण्यासाठी तयार आहात काय?
प्रार्थना
परमेश्वरा मला साहाय्य कर की माझी शक्ती नेहमीच तुझ्याकडून मिळवावी. जेव्हा मी आज बाहेर जात आहे, मी कृपा प्राप्त करीत आहे की कृपा व साहाय्यासाठी तुझ्याकडे पूर्णपणे पाहत राहावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● राजवाड्याच्या मागील माणूस● दिवस ०१ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● ते खोटेपण उघड करा
● दोनदा मरू नका
● वातावरणावर महत्वाची समज - १
● विसरलेली आज्ञा
● आजच्या वेळेत हे करा
टिप्पण्या