निराशेचा आत्मा हे एक मुख्य कारण आहे की का अनेक जण त्यांच्या जीवनात प्रगती करू शकले नाहीत. निराशा त्याजवर इतक्या वाईटरीतीने आक्रमण करते की अनेक जणांनी शाळा, कॉलेज व त्यांची कारकीर्द संपविली आहे, देवाची सेवा करण्यापासून माघार घेतली आहे, तर त्याचवेळेस काहींनी आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा केला होता.
निराशा ही कोणावरही आक्रमण करू शकते, मग तो व्यक्ति किती प्रतिष्ठित आहे किंवा ते पुरुष व स्त्री आहेत याची पर्वा नाही. एलीया हा संदेष्टा होता ज्याने स्वर्गाहून अग्नि पडावा म्हणून आदेश दिला होता व तसे झाले होते, पण त्याने सुद्धा निराशा अनुभविली व देवाला विनंती केली की त्यास जिवंत मारून टाकावे.
"तो (एलीया) स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडूपाखाली जाऊन बसला; आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर; मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही." (१ राजे १९:४)
सैतान हा खोटारडा आहे व खोट्याचा बाप आहे, परंतु त्याचवेळी तो मूर्ख नाही. जेव्हा सर्व काही तुमच्यासाठी चांगले होत असेन तेव्हा तो तुम्हांवर निराशेने आक्रमण करणार नाही. तुम्ही जेव्हा अधिक प्रगती करीत आहात तेव्हा तो कदाचित तुम्हांवर गर्वाने आक्रमण करू शकतो, परंतु तो तुम्हांवर निराशेने आक्रमण करणार नाही. निराशेच्या आक्रमणास तोंड देण्याकडे जेव्हा तुमचा कल झालेला असतो, जेव्हा गोष्टी तुमच्याभोवती उजाड अशा दिसत असतात.
परंतु कोणी हे कसे समजावे की निराशेचा आत्मा हा त्याच्या किंवा तिच्या विरोधात सरकत आहे. येथे काही लक्षणे आहेत ज्याविषयी आपल्याला दक्ष असले पाहिजे!
१. जास्त चिंता करणे
चिंता करणे हे देवाच्या वचनाच्या विरोधात आहे. तुमचा आत्मविश्वास हा काढून टाकला जातो व आता तुम्हाला खातरी नाही की त्या गोष्टी आता घडतील. आणि आता मग तुम्ही चिंता करू लागता. चिंते विषयी परमेश्वर काही म्हणत आहे ते पाहा:
"ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही?
ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात, तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील." (मत्तय ६:२५, ३१-३४)
चिंते मध्ये सामर्थ्य आहे की तुमची शांति व आनंद हिरावून घ्यावा व तुम्हांला पूर्णपणे निराश करून टाकावे.
२. सर्व गोष्टींविषयी तक्रार करणे
लोक जेव्हा निराशेमधून जात असतात, तेव्हा ते सर्व गोष्टींविषयी तक्रार करीत आहेत असे तुम्ही पाहाल. जर एसी चालू आहे तर ते म्हणतील खूप गार आहे, जर तुम्ही ते बंद केले, तर ते म्हणतील आता गरम होत आहे, जर तुम्ही ते कमी केले, तर ते तुम्हाला विचारतील, "एसी योग्यपणे कार्य करीत नाही काय?" तुम्हाला ही कल्पना आली असेल जे सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे.
जेव्हा निराशेच्या आत्म्या द्वारे तुम्हांवर आक्रमण होते, तुम्ही देवाला सुद्धा तक्रार कराल की गोष्टी योग्यपणे का होत नाहीत. तक्रार करण्यावर उत्तम उपाय हा धन्यवाद देणे होय. त्यासाठी परमेश्वरास धन्यवाद दया
"जे काही कराल ते कुरकुर व वादविवाद न करिता करा; ह्यासाठी की, ह्या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता." (फिलिप्पै २:१४-१५)
तुमचा मार्ग सध्या किती खडतर आहे, किंवा वादळ किती उग्र आहे याची पर्वा नाही, त्याने तुमच्या जीवनात ज्या गोष्टी पूर्ण केल्या आहेत त्यासाठी त्यास धन्यवाद दया. जर आपले मुख हे धन्यवादाने भरलेले राहते, तर तक्रार करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकत नाही.
अंगीकार
मी विजयी आहे, दोषी नाही याकारणासाठी की प्रभु येशूने माझ्यासाठी वधस्तंभावर जे काही केले आहे. ख्रिस्त जो मजमध्ये आहे तो गौरवाची आशा आहे.
पित्या, तूं जे सर्व काही माझ्यासाठी केले आहे त्यासाठी मी तुझा आभारी आहे. जर तूं नसता, तर माझा अगोदरच नाश झाला असता. माझ्या जीवनातील तुझ्या अद्भुत उपस्थितीच्या कारणामुळे मी महान गोष्टी पाहीन. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शेवटच्या समयाच्या चिन्हांची पारख करावी?● कोणाच्या वार्तेवर तुम्ही विश्वास ठेवाल
● भिन्नता ही स्पष्ट आहे
● दिवस ०२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● सुवार्ता पसरवा
● ख्रिस्तासाठी राजदूत
● संबंधामध्ये राहण्याद्वारे अभिषेक
टिप्पण्या