कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. त्याच्या दरवाज्याजवळ फोडांनी भरलेला लाजर नांवाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता; त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे; शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.
पुढे असे झाले की, तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले; श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकांत यातना भोगीत असतांना त्याने आपली दृष्टि वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हांक मारून म्हटले, हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठिव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळांत मी क्लेश भोगीत आहे.
अब्राहाम म्हणाला, मुला, तूं आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दु:ख भरून पावला, ह्याची आठवण कर; आतां ह्याला येथे समाधान मिळत आहे व तूं क्लेश भोगीत आहेस. (लूक १६:१९-२५)
श्रीमंत असणे किंवा संपत्तीने मालामाल असणे हे चुकीचे नाही. वास्तवात, वचन म्हणते, "परमेश्वर आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष करतो" (स्तोत्र ३५:२७). संकट हे जेव्हा लोक त्यांचे जीवन देवापासून दूर होऊन व लोक व त्यांच्या गरजांविषयी बेपर्वा होऊन जगतात. आजच्या वाचलेल्या भागात, श्रीमंत मनुष्याला श्रीमंत असल्यामुळे शिक्षा केली गेली नाही (जसे अनेक विचार करतात व चुकीचे शिकवितात). त्यास अधोलोकांत पाठविण्यात आले जेव्हा त्याच्याकडे साहाय्य करण्यास क्षमता होती तेव्हा गरीब मनुष्य लाजर कडे त्याने लक्ष दिले नाही.
तेथे एक मनुष्य होता जो तात्पुरत्या गोष्टींवर प्रेम करीत होता. तो जे काही हस्तगत व मिळवू शकत होता त्याचा त्याने शोध केला होता. असे घडले की तो मनुष्य मरण पावला व त्याच्या शरीराचे विच्छेदन करण्यात आले. शव-विच्छेदन ने स्पष्ट केले की तेथे त्याच्या शरीरात हृदय नव्हते. त्याचे मित्र, त्याचा स्वभाव विचारात घेऊन, त्याच्या संपत्तीच्या भांडारग्रहाकडे गेले, आणि त्याच्या सर्व मालमत्तेच्या मध्य, त्यांनी ते रक्तप्रवाहित होत असलेले हृदय पाहिले.
नैतिकता: जेथे तुमची संपत्ति आहे, तेथेच तुमचे मन ही असेन. वरील दंतकथेचा उद्देश आपल्याला जगिक संपत्ति विषयी आठवण देण्यासाठी आहे. जगिक संपत्ति ह्या वाक्या द्वारे फारच चांगल्याप्रकारे पाहू शकली जाते, "तुम्ही ते तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही". परमेश्वर व त्याच्या वचनाशिवाय संपत्ति ही सार्वकालिकतेच्या प्रकाशात धोकादायक आहे.
प्रार्थना
पित्या, मला माझी संपन्नता तुझ्या गौरवाकरिता उपयोगात आणण्यास शिकीव. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● लहान तडजोडी● अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नूतनीकरण कसे करावे -१
● लैंगिक परीक्षेवर वर्चस्व कसे मिळवावे
● कृतज्ञतेसाठी एक धडा
● तुम्ही अजूनही का थांबून आहात?
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे
टिप्पण्या