ख्रिस्ती म्हणून, आपल्याला सावधानी बाळगली पाहिजे की आपण कसे जगतो. लोक हे आपल्याला पाहत असतात जेथे कोठे आपण जातो. ज्याक्षणी आपण स्वतःला ख्रिस्ताचे अनुयायी असे म्हणतो. तेव्हा मग आपल्या सभोवतालच्या समाजाद्वारे आपली अधिक तपासणी केली जाईल. त्यामुळे, आपण आपल्यापरीने सर्वात उत्तम ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आपला प्रभु आपल्या द्वारे अधिक उत्तमरित्या व्यक्त केला जाईल.
पवित्र शास्त्र आपल्याला जोर देऊन "ख्रिस्ताचे राजदूत" असे वर्णन करते (२ करिंथ ५:२०). एक राजदूत म्हणून, आपण जेथे कोठे जाऊ तेथे तुम्हाला व मला देवाच्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्यास नियुक्त केलेले आहे. एक राजदूत म्हणून, जेव्हा आपण बोलतो, आपण आपल्या राजाच्या वतीने बोलतो. जेव्हा आपण कार्य करतो, आपण आपल्या राजाच्या वतीने कार्य करतो.
ख्रिस्ताच्या खऱ्या राजदूताची काही निश्चित चिन्हे आहेत
१. तो स्वर्गाचा नागरिक असला पाहिजे
आपण ह्या नागरिकत्वामध्ये जन्मा द्वारे येत नाही परंतु कृपे द्वारे येतो. एकदा आपण कृपेच्या करारा विषयी अनोळखी व ह्या जगामध्ये देवा विरहित होतो, "ते आपण आता संतांसह संगतीचे नागरिक झालो आणि देवाच्या घराचे सभासद झालो आहोत" (इफिस २:१९). ख्रिस्ताचा खरा राजदूत हा "ख्रिस्ता मध्ये" व "एक नवीन सृष्टि" असला पाहिजे (२ करिंथ ५:१७).
२. तो एक चांगले चरित्र असलेला व्यक्ति असला पाहिजे
२ करिंथ ५:१७ स्पष्टपणे उल्लेख करते: "जुने ते निघून गेले आहे, पाहा सर्व काही नवीन झाले आहे". आपले चरित्र हे मिशन घडवू किंवा बिघडवू शकते आणि म्हणून ख्रिस्ताचे राजदूत म्हणून हे अत्यंत अपेक्षित आहे की आपण ईश्वरीय चारित्र्य विकसित करावे.
ख्रिस्ताचे चरित्र विकसित करणे व त्यामध्ये चालणे ही काही एक-वेळेची घटना नाही, ती प्रक्रिया आहे ज्यावर दररोज कार्य करण्याची गरज आहे. ईश्वरीय चारित्र्य विकसित करण्यासाठी एक मार्ग हा की सातत्यपूर्ण भक्तीभावाचे जीवन ठेवणे हे आहे.
प्रभु येशूने योहान १५:५ मध्ये म्हटले आहे, "तुम्ही जर माझ्यामध्ये राहिला व मी तुमच्या मध्ये, तर तुम्ही अधिक फळ उत्पन्न कराल". येथे नवीन करारात तीन प्रकारच्या फळांचा उल्लेख केलेला आहे:
१. चांगल्या कृत्यांचे फळ (कलस्सै १:१०)
२. आत्म्याचे फळ जे ख्रिस्ता साठी जिंकिले आहे (योहान ४:३५-३६) आणि
३. आत्म्याचे फळ: "प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन" (गलती ५:२२-२३)
ही सर्व फळे केवळ एक गोष्ट करण्याने प्रगट केली जाऊ शकतात-एक सातत्यपूर्ण भक्तिभावाचे जीवन ठेवणे.
३. त्याने निरंतर राजासनाच्या संपर्कात असले पाहिजे
जसे एक राजदूत ज्या देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे त्यांच्या संपर्कात असतो. त्याप्रमाणेच, ख्रिस्ताच्या एक खऱ्या राजदूत ला देवाच्या राजासनासह निरंतर संपर्कात राहण्याची गरज आहे जेव्हा तो त्याची दैनंदिन कार्ये करण्यास जातो.
प्रार्थना
पित्या, तुझा राजदूत म्हणून मला अधिकार देण्यासाठी तुझे आभार. जेथे कोठे मी जाईल तेथे तुला योग्यरीत्या सादर करण्यासाठी मला साहाय्य कर. येशूच्या नावात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● केव्हा शांत राहावे आणि केव्हा बोलावे?● चिंता करीत वाट पाहणे
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-१
● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
● बंदिस्त शक्ती: न वापरलेल्या वरदानांचा नाश
● पारख उलट न्याय
● स्तुति ही जेथे परमेश्वर वास करतो
टिप्पण्या