डेली मन्ना
लोकांचे पाच गट येशूला भेटले # 1
Tuesday, 30th of August 2022
0
0
348
Categories :
शिष्यत्व
जेव्हा येशू येथे पृथ्वीवर होता आणि त्याच्या 31/2 वर्षाच्या सेवाकार्यात तो भिन्न भिन्न प्रकारच्या लोकांना भेटला.
अनेकांना त्यांना त्याने स्पर्श केला, ह्यापैंकी अनेकांना त्याने प्रभावित केले, काहींची त्याने कानउघडणी सुद्धा केली. काय मनोरंजक आहे ते हे की हे सर्व लोक ज्यांशी प्रभू भेटला त्यांस 5 गटात विभागता येईल.
इब्री 13:8 मध्ये बायबल सांगते, "येशू ख्रिस्त हा काल, आज व सर्वकाळ सारखाच आहे.'
मलाखी 3:6 आपल्याला सांगते, "कारण मी परमेश्वर बदलणारा नव्हे .......". याचा अर्थ तेव्हा प्रभू येशू पाच प्रकारच्या किंवा वर्गाच्या लोकांना भेटला, याचा अर्थ आज सुद्धा तो त्याच प्रकारच्या लोकांना भेटेल.
अनेक वेळेला ही रीत आहे की इतरांची चौकशी करावी. आपण आपले सर्व लक्ष इतरांवर लावतो. मंडळी त्यांचे सर्व बारकाईने लक्ष पास्टर काय बोलत आहे यावर लावतात, "फक्त जर आपले पास्टर हे त्याप्रमाणे असते आणि तसेच काहीतरी." कामगार बॉस काय बोलत आहे त्यावर बारकाईने लक्ष ठेवून असतात, "जर माझा बॉस त्याप्रमाणे असता तर मग गोष्टी माझ्यासाठी वेगळ्या असत्या." मी विश्वास ठेवतो आता ही वेळ आहे की देवाच्या वचनाच्याप्रकाशात आपल्या स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. ह्या शिकवणीचे हे उद्धीष्ट्य आहे.
तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? आठवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे, ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. (मत्तय 7:3-5)
मी विश्वास ठेवतो की ही शिकवण तुम्हाला तीन गोष्टी करावयास सांगेल:
तुमच्या स्वतःच्या डोळ्यातून मुसळ काढा
ते तुम्हाला स्पष्टपणे पाहण्यास साहाय्य करेल, ते तुम्हाला स्पष्ट आध्यात्मिक दृष्टांत देईल. ते तुम्हाला तुमच्या भावाच्या कुसळ काढण्यास साहाय्य करेल. लक्षात घ्या, मी म्हटले साहाय्य, तुमच्या भावाला किंवा बहिणीला धिक्कारु नये.
1. कुटुंब
पहिला गट ज्यांना प्रभू येशू भेटला ते 'कुटुंब' होते. प्रभू येशूला कुटुंब होते. त्यास एक पालनपोषण करणारा पिता होता-पृथ्वी वरील पिता; त्यास आई होती; त्यास भाऊ आणि बहिणी होत्या.
पवित्र शास्त्र सांगते, "मग ज्या नासरेथात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे ऑ आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहीला." (लूक 4:16)
नासरेथ हे प्रभू येशूचे स्वतःचे शहर होते. ह्या ठिकाणी एक मुलगा येशू परमेश्वर येशूचा मनुष्य झाला. पवित्र आत्म्याने भरल्या नंतर आणि सैतानाबरोबरच्या रानात त्याच्यासंघर्षानंतरपहिले ठिकाण जेथे येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात गेला ते त्याचे स्वतःचे शहर नासरेथ होते. तो त्याच्या कुटुंबाला भेटण्यास गेला.
तुम्ही तुमचा आनंद तुमच्या कुटुंबाला सांगता. जर काहीतरी वाईट किंवा विलक्षण असे घडते, तर तुम्हाला ते प्रथमतुमच्या कुटुंबाला सांगावयास वाटते कारण हे जवळच्यागटाचे लोक आहेत जे तुम्हाला ह्या पृथ्वीवर आहेत.
तसेच प्रभू येशू सामर्थ्याने भरल्या नंतर, त्याच्या स्वतःच्या शहरी गेला आणि देवाच्या घरा पेक्षा कोणते उत्तम ठिकाण असू शकते जेथे त्याने एक मुलगा असताना नियमितपणे देवाची उपासना केली होती.
जसेत्याने सभास्थानात प्रवेश केला, त्याकडे भविष्यवक्ता यशया चे पुस्तक देण्यात आले. आणि जेव्हा त्याने ते पुस्तक उघडले, त्याने ते स्थान पाहिले जेथे हे लिहिले होते:
"परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेककेला; त्याने माल पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे; परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षांची घोषणा करावी." (लूक 4:18-19)
येथे आपण पाहतो कीप्रभू येशू यशय भविष्यवक्त्याच्या ग्रंथातून वाचण्यास उभा आहे. वचने जी पुढे आली, त्याने त्याच्या मिशन ची व्याख्या केली-ज्यासाठी त्यास येथे पृथ्वी वर पाठविण्यात आले होते. खात्रीने त्या स्थानिक सभास्थानात त्याचे कुटुंब सुद्धा असेन. खात्रीने जे त्याने म्हटले होते ते त्यांनी ऐकले असेन.
आता आपण जर तेथे असतो आणि प्रभू येशूला अशा प्रकारे म्हणताना ऐकले असते, आपण कदाचित शिट्ट्या मारल्या, ओरडलो, टाळ्या वाजविल्या असत्या वगैरे. परंतु तुम्हीं पाहा ज्या लोकांना येशू भेटला ते कुटुंब होते.
लूक 4:22 त्यांची प्रतिक्रियेची नोंद करते, "तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले; ते म्हणू लागले, हा योसेफाचा पुत्र ना?"
पाहा कोणत्या पद्धतीने ते त्याच्याविषयी बोलले. "हा योसेफाचा पुत्र ना?""हा सुताराचा पुत्र ना?" त्यांनी त्यास स्विकारीले नाही.
त्यांनी त्याचा धिक्कार केला.
हाच प्रकार आज सुद्धा आहे.
कदाचित तुम्ही ते व्यक्ति आहात जो तुमच्या संपूर्ण हृदयापासून प्रभूला प्रेम करता आणि त्याची सेवा करीत आहात. तुम्ही देवासाठी काहीही करण्यास तयार आहात. तथापि, तुमच्या कुटुंबातच, तेथे कोणी व्यक्ति असू शकतो जो तुमचा छळ करीत असेन, तुमची निंदा करीत असेन, कोणीतरी जो सतत तुमच्या विश्वासाची खिल्ली उडवत असेन.
यात काही विशेष नाही की तुम्ही त्यांना कितीही सामर्थ्यशाली आध्यात्मिक सत्य सांगाल, ते तुमचे ऐकत नाही. तुम्ही आश्चर्य करिता, हे लोक का समजत नाही. दु:खद बाब ही, तुम्हीगटाकडे दुर्लक्ष करू शकत नाही कारण ते तुमचे कुटुंब आहे.
दोन गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत:
1.जर येशू ख्रिस्ताचा तेव्हा छळ झाला तर मग त्याच्या शिष्यांचा सुद्धा छळ होणार.
येशूचे वचन स्मरण करा, "दास धन्यापेक्षा मोठा नाही हे जे वचन मी तुम्हांला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील, त्यांनी माझे वचन पाळिले तर ते तुमचेही पाळतील" (योहान 15:20).
2. जर तेव्हा प्रभूचा छळ झाला तर मग त्यास पूर्णपणे ठाऊक आहे की तुम्ही काय सहन करीत आहात.
नासारेथ येथील लोकांना किती अद्भुत संधी होती की येशू कडून शिकावे परंतु त्यांनी ती मोठी वेळ गमाविली.
त्याचप्रमाणे, मी अनेक वेळेला हे पाहिले आहे की देवाच्या मनुष्याच्या जवळचे लोक हेकधीही अधिक प्राप्त करीत नाहीत. कारण ते देवाच्या मनुष्यास सहज असे समजत असतात.
जेव्हा कोणी परदेशातून काही "थोडे" मोठे असे घेऊन येतो, तेव्हा हेच लोक जे काही त्यांच्यासमोर वाढले जाते त्यावर झडप मारतात-ते याची पर्वा करीत नाहीत मग ते पवित्र शास्रानुसारआहे किंवा नाही.
यहूदाच्या जीवनाकडे पाहा, तो येशूच्या इतक्या जवळ होता, तरी तो किती दूर होता. आणिशेवटी जे सर्व काही त्याने प्राप्त केले ते 30 चांदीचे शिक्के आणि आत्महत्या.
गेहेजी च्या जीवनाकडे पाहा, अलीशा, या देवाच्या संदेष्ट्याचा प्रमुख व्यक्ति-इतक्या जवळ तरी किती तरी दूर. अलीशा ने एलीयाकडून दुप्पट अभिषेक प्राप्त केला होता. जर गेहेजी परिश्रमिक राहिलाअसता, त्याने जे अलीशा कडे होते त्याच्या चौपट प्राप्त केले असते परंतु तुम्हाला ठाऊक आहे त्याने काय प्राप्त केले? कोढ.
जर तुमच्या जीवनात कोणी व्यक्ति आहे जो तुमच्यावतीने प्रभूकडेप्रार्थना आणि विनंती करीत आहे, तर देवाच्या प्रिय लेकरांनो त्या व्यक्तीकडून प्राप्त करण्यास शिका जेव्हा ते तुमच्याभोवती आहे. ते कदाचित सिद्ध असणार नाही परंतु देवाने त्यांना तुमच्या जीवनात ठेवले आहे.
ज्यांचा छळ होत आहे त्याच्यासाठी वचन. तुमच्या कुटुंबांच्या सदस्यांसाठी कळकळीने प्रार्थना करा. तुमच्या कुटुंबाचा द्वेष करू नका. देवाला ठाऊक आहे तो तुम्हाला कोठे ठेवत आहे. तुम्ही देवाचे साधन आहात की त्यांना देवाकडे वळवावे.
देवाच्या पुरुष आणि स्त्री साठी वचन ज्यांनी विश्वासयोग्य सेवा केली तरी लोक त्यांना सहज असे समजत आहेत. तुमचा पुरस्कार हा देवाकडून आहे.
प्रार्थना
आज, दानीएलाच्या उपासाचा ३ रा दिवस आहे,
[जर तुम्हीं अजूनही त्यामध्ये भाग घेतला नसेल किंवा त्यावर आणखी माहिती हवी असेन तर कृपाकरून दररोजचा मान्ना २६ व २७ ऑगस्टचा संदर्भ घ्या.]
पवित्रशास्त्र वाचन
इब्री लोकांस पत्र ११:७
यहोशवा २:१२-१४
प्रार्थना अस्त्र
१. आंधळेपणा व बहिरेपणाचा प्रत्येक आत्मा जो माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना जखडून ठेवीत आहे तो येशूच्या नावात उपटून टाकला जावो.
२. प्रत्येक चुकीचे सिद्धांत व चुकीचे विश्वास हे माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनातून आत्ताच उपटून टाकिले जावोत.
३. त्यांचे डोळे उघड की त्यांनी पिता तुला जो एकच सत्य जिवंत परमेश्वर आहे म्हणून ओळखावे.
४. त्यांचे डोळे उघड की त्यांनी प्रभु येशू तुला त्यांचा प्रभु व तारणारा म्हणून ओळखावे.
५. पवित्र आत्म्या त्यांना आता स्पर्श कर. त्यांच्या पापा द्वारे त्यांना दोषी ठरीव. त्यांना येशूकडे वळीव.
६. असे होवो की माझ्या कुटुंबाच्या सदस्यांनी अंधाऱ्या राज्यातून प्रकाशाच्या राज्यात येशूच्या नावात प्रवेश करावा.
७. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.
[जर तुम्हीं अजूनही त्यामध्ये भाग घेतला नसेल किंवा त्यावर आणखी माहिती हवी असेन तर कृपाकरून दररोजचा मान्ना २६ व २७ ऑगस्टचा संदर्भ घ्या.]
पवित्रशास्त्र वाचन
इब्री लोकांस पत्र ११:७
यहोशवा २:१२-१४
प्रार्थना अस्त्र
१. आंधळेपणा व बहिरेपणाचा प्रत्येक आत्मा जो माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना जखडून ठेवीत आहे तो येशूच्या नावात उपटून टाकला जावो.
२. प्रत्येक चुकीचे सिद्धांत व चुकीचे विश्वास हे माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनातून आत्ताच उपटून टाकिले जावोत.
३. त्यांचे डोळे उघड की त्यांनी पिता तुला जो एकच सत्य जिवंत परमेश्वर आहे म्हणून ओळखावे.
४. त्यांचे डोळे उघड की त्यांनी प्रभु येशू तुला त्यांचा प्रभु व तारणारा म्हणून ओळखावे.
५. पवित्र आत्म्या त्यांना आता स्पर्श कर. त्यांच्या पापा द्वारे त्यांना दोषी ठरीव. त्यांना येशूकडे वळीव.
६. असे होवो की माझ्या कुटुंबाच्या सदस्यांनी अंधाऱ्या राज्यातून प्रकाशाच्या राज्यात येशूच्या नावात प्रवेश करावा.
७. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ३३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● मत्सराच्या आत्म्यावर प्रभुत्व मिळविणे
● निंदा संबंधाला नष्ट करते
● लहान बियापासून ते उंच झाडांपर्यंत
● प्रार्थनेचा सुगंध
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे
● दिवस ०४: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या