डेली मन्ना
पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #3
Thursday, 1st of September 2022
0
0
279
Categories :
शिष्यत्व
जर कोणी पवित्र शास्त्र स्पष्टपणे वाचले तर त्यास हे समजेल की जे केवळ येशूच्या मागे येत आहेत आणि शिष्य यांच्यामध्ये बायबल स्पष्ट फरक दाखवीत आहे. तो प्रत्येक जण जो उपासनेला येतो तो शिष्य नाही.
पवित्र शास्त्राची खालील वचने ह्यामधील फरक स्पष्टपणे दाखवितात:
आता येशूने त्याच्या शिष्यांना स्वतःकडे बोलाविले आणि म्हटले, "मला ह्या मोठया लोकसमुदायाला पाहून कळवळा येत आहे." (मत्तय 15:32).
मग येशू लोकसमुदायास आणि त्याच्या शिष्यांना म्हणाला. (मत्तय 23:1)
इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांस तुडवू लागले; तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला (लूक 12:1)
हा गट आणि शिष्य असणे म्हणजेकाय याविषयीबरेच काही म्हटले जाऊ शकते. तथापि, येथे काही गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत:
1.शिष्यांचाहा गट इतर गटांपेक्षा येशू बरोबरच्या संबंधात वेगळ्या संगतीत होता. त्यांना प्रभूबरोबर सरळ संपर्क होता.
2. त्यांना शिकवण आणि इतर माहिती विषयी सर्व ठाऊक होते जे इतरांना नव्हते.
एक प्रश्न जो मला नेहमी विचारण्यात येतो, "मी नियमितपणे उपासनेला येतो, एक समूहा पासून एक शिष्य होण्यापर्यंत मी कसे पोहोचावे?
माझ्याबरोबर लूक 8:19 कडे या, "त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, परंतु दाटीमुळे त्यांस त्याच्याजवळ येता येईना.
लक्षात घ्या, ते सर्व लोकसमुदायाचा हिस्सा होते. आता त्यांना लोकसमुदायापासून वेगळे आहोत असे दाखवायचे होते. त्यांना येशूला समोरासमोर भेटावयाचे होते.
तेव्हा त्याला सांगण्यात आले की, तुझी आई व तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेनेबाहेर उभे आहेत." (लूक 8:20)
प्रभू येशूच्या उत्तराला ऐका. ही मुख्य गोष्ट आहे की इतर सर्व गटांपेक्षा वेगळे होऊन येशूचे जवळचे शिष्य व्हावे. प्रभू येशू ख्रिस्ता बरोबरच्या संबंधामध्ये प्रवेश करणे आणि त्यामध्ये वाढण्यास हामुख्य मुद्दा आहे.
परंतु त्याने त्यांस उत्तर दिले, "हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहेत." (लूक 8:21)
देवाचे वचन सतत ऐकणे आणि त्यासआपल्या जीवनाला लागू करण्याद्वारे त्यानुसार आचरण करणे हे आपल्याला प्रभू बरोबर प्रत्यक्ष आणि घनिष्ठ संबंधात आणेल. हेच ते जे तुम्हाला शिष्य असे करते.
प्रार्थना
आज, दानीएलाच्या उपासाचा ५ वा दिवस आहे,
[जर तुम्हीं अजूनही त्यामध्ये भाग घेतला नसेल किंवा त्यावर आणखी माहिती हवी असेन तर कृपाकरून दररोजचा मान्ना २६ व २७ ऑगस्टचा संदर्भ घ्या.]
पवित्रशास्त्र वाचन
स्तोत्रसंहिता ३०:१-२
स्तोत्रसंहिता १०७: २०-२१
याकोब ५:१४-१५
कबुली
मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि हयापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आतां देहामध्ये जें माझे जीवित आहे तें देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरिता दिले" (गलती. २:२०). मुलांनो, तुम्ही देवाचे आहां आणि त्यांच्यावर तुम्हीं जय मिळविला आहे; कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हांत जो आहे तो मोठा आहे." (१ योहान ४:४)
प्रार्थना अस्त्र
१. पित्या, मी तुझे आभार मानितो कारण तूं यहोवा राफा, माझा आरोग्यदाता आहेस.
२. माझे व माझ्या कुटुंबाच्या जीवनावरील आजार आणि रोगांवरील वर्चस्वास, येशूच्या नावात व येशूच्या रक्ताद्वारे मी नष्ट करीत आहे.
३. हे आजार (त्याचे नाव किंवा नावे यांचा उल्लेख करा) मी तुला आज्ञा देत आहे, येशूच्या नावाखाली नतमस्तक हो आणि येशूच्या नावात माझ्या शरीरातून कायमचे निघून जावो.
४. माझ्या आरोग्याच्या विरोधात जो प्रत्येक आजार कार्य करीत आहे, तो येशूच्या नावात अदृश्य होवो.
५. असे होवो की माझे रक्त येशूच्या रक्ताद्वारे भरून जावो की येशूच्या नावात माझ्या सिद्ध आरोग्याचे कारण व्हावे.
६. प्रभू, तुझ्या वचनाच्या सामर्थ्यात मी विश्वास ठेवितो की बरे करावे व उद्धार करावा. प्रभू, तुझे जिवंत वचन पाठिव की आता मला बरे करावे. येशूच्या नावात, आतां, माझे शरीर व आत्म्यामध्ये मी आरोग्य देणारे वचन प्राप्त करीत आहे.
७. प्रभू, तुझे वचन घोषित करते की तू माझे दोष आपणांवर घेतले व माझे रोग वाहिले. म्हणून, प्रभू, मी घोषित करितो की मुक्ति जी आतां येशू ख्रिस्तामध्ये आहे त्याद्वारे मी प्रत्येक आजार व रोगांपासून मुक्त आहे.
८. प्रभू, मी घोषित करितो की ख्रिस्ताच्या जखमांद्वारे, येशूच्या नावात सर्व आजार व रोगांपासून मी बरा झालो/ मला आरोग्य मिळाले आहे. आजार/रोग, येशूच्या नावात, माझ्या शरीरातून तुमचे वर्चस्व काढून घ्या.
९. प्रभू, मी घोषित करीत आहे की तुझे वचन हे माझ्यासाठी जीवन झाले आहे; येशूच्या नावात, माझ्या शरीराला बरे होणे आणि आरोग्य मिळाले (माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला व अवयवांना) आहे.
१०. प्रभू, मी घोषित करीत आहे की तुझ्या वचनानुसार आजाराची शस्त्रे माझ्या शरीरात वाढणार नाहीत, येशू ख्रिस्ताच्या नावात.
११. माझे शरीर हे देवाचे मंदिर आहे; त्यामुळे आजार व दोष येशूच्या नावात निघून जावोत.
१२. आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे मोठयाने व स्पष्टपणे मी घोषित करीत आहे की, येशूच्या नावात मी बरा झालो आहे.
१३. हे परमेश्वरा, ऊठ व असे होवो की माझ्या आरोग्याचा शत्रू येशूच्या नावात विखरून जावो.
१४. काही समय परमेश्वराची उपासना करीत घालवा.

Join our WhatsApp Channel
Most Read
● सात-पदरी आशीर्वाद● ते व्यवस्थित करा
● देवाच्या समर्थ हाताच्या पकडीत
● येशूने गाढवावर स्वारी का केली?
● कर्जामधून बाहेर या: किल्ली#२
● पवित्रआत्म्याच्या सर्व वरदानांची मी इच्छा करू शकतो काय?
● उपासने साठी इंधन
टिप्पण्या