डेली मन्ना
आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नूतनीकरण कसे करावे -१
Monday, 26th of August 2024
30
27
497
Categories :
आध्यात्मिक शक्ती
या महामारीचा एक परिणाम असा आहे की बरेच लोक थकले व क्षीण झाले आहेत. बाहेरुन सर्व काही ठीक दिसत आहे, परंतु आतून ते तुटले आहेत आणि निराश झाले आहेत. त्यांच्या वैयक्तिक जीवनात किंवा त्यांच्या भोवताली घडणाऱ्या घटनांद्वारे त्यांच्या विश्वासाची परीक्षा कधी झाली नाही अशी होत आहे.
"आम्हाला यापुढे प्रार्थना करावीसी वाटत नाही, आम्हाला वचन वाचावेसे वाटत नाही, आम्ही फक्त झोपतो किंवा टीव्हीवर सतत काहीतरी पाहत राहतो" असे सांगत लोकांनी मला असे लिहिले आहे.”
काही लोकांनी तर एकाच वेळी तीन ते चार झोपेच्या गोळ्या घेतल्याची कबुली दिली आहे. आणखी एका मुलीने मला लिहीले व ती म्हणाली “पास्टर, मी मद्यपान करत आहे व असे करत असताना मला माझी घृणा वाटत आहे, पण मला खरच कळत नाही की मी हे का करत आहे. मला माहीत आहे असे करणे चांगले नाही, कृपया मला मदत करा.”
मी पुढे जाण्यापूर्वी, मला हे पुन्हा सांगायचे आहे की ज्या लोकांचा मी नुकताच उल्लेख केला आहे ते लोक वाईट लोक नाहीत, परंतु कुठे तरी त्यांच्यात असलेली आध्यात्मिक शक्ती हरवली आहे; त्यांचे आतील बळ ते गमावले आहेत; त्यांचा आत्मिक मनुष्य खूप अशक्त झाला आहे, आणि म्हणूनच त्यांना माहीत असुनही की या गोष्टी योग्य नाहीत तरी ते त्या गोष्टी करीत आहेत.
चांगली बातमी अशी आहे की आपण आपले आध्यात्मिक सामर्थ्य प्रस्थापित करु शकता, जेणेकरून देवाने आपल्याला या पृथ्वीवर जे करण्यासाठी बोलविले आहे ते करु शकतो मग, विरोध असो, छळ असो, किंवा गोष्टी तुमच्या विरुध्द उभ्या असोत.
आध्यात्मिक सामर्थ्य प्रस्थापित करण्याची काय आवश्यकता आहे?
मी आधी म्हटल्याप्रमाणे, आध्यात्मिक सामर्थ्य निर्माण करण्याची गरज अशी आहे की आपण कोणत्याही गोष्टीच्या समोर देवाची इच्छा पूर्ण करू शकता.
मनुष्याचे चित्त आपली व्याधी सहन करते; पण व्याकूळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवेल? (नीतिसूत्रे १८:१४ विस्तारित)
मी अलीकडेच एक अहवाल वाचला ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “ एक सुपरमॉडलने तिच्या नवव्या मजल्यावरील बाल्कनीतून स्वत: ला खाली फेकून दिले.” लोक भाष्य करताना दिसले, ही धाडसी, सुंदर, यशस्वी स्त्री, तिला असे करण्याची काय गरज होती. तिला इतके कठोर पाऊल उचलण्याची काय गरज होती?
एक निरोगी आत्मा संकटावर विजय मिळवितो,
पण आत्मा दुर्बल होतो तेव्हा तुम्ही काय करु शकता? (नीति १८:१४ MSG)
नीतिसूत्रे १८:१४ मधील आपण संदेशाचे भाषांतर आता वाचू, त्यात म्हटले आहे की निरोगी आत्म्याने संकटांवर विजय मिळविला आहे, परंतु आत्मा दुर्बल होतो, जेव्हा आत्मा अशक्त होतो तेव्हा आपण काय करू शकता. तुम्ही काय करू शकता?
आज मला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे: “आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नूतनीकरण करण्यासाठी आपण काय करू शकता?
दृढ आत्मा म्हणजे काय?
एक मजबूत आत्मा ,दृढ, स्थिर, अटळ असोत व कोणत्याही गोष्टीसाठी तयार असतो. पुर्ण हर्षाने व शांतीने तो संकटाच्या समयामध्य़े स्थितीस्थापक असतो-आणि तो कधीच हार मानत नाही. एक दृढ आत्मा आपल्याला कोणत्याही गोष्टींमधून घेऊन जातो - शारीरिक हल्ले, आर्थिक अडचणी, नातेसंबंधातील अडचणी, कारकिर्दीमधील अडथळे आणि आणखी काही गोष्टी ज्या शत्रू आपल्यावर आणतो.
एक दृढ आत्मा आत्म्याचे फळ प्रदर्शित करतो. दृढ आत्म्याचे चिन्ह म्हणजे प्रेम, आनंद, शांती. (गलती ५: २२-२३) दृढ आत्मा कधीही हार मानत नाही.
बायबलमध्ये ईयोब नावाचा एक मनुष्य होता. आर्थिक, आरोग्य, नातेसंबंध इत्यादी अनेक अडचणींना त्याला सामोरे जावे लागले. कोणत्या गोष्टीने त्याला शेवटपर्यंत सहन करावयास लावले व दृढ ठेवले? तो म्हणजे दृढ आत्मा. ती आतील एक मजबूत शक्ती होती.
ईयोब ३२:८, मध्ये तो नमूद करतो, “परंतु मनुष्यात आत्मा आहे आणि सर्वशक्तिमान परमेश्वराचा श्वास त्याला समज देतो.” आत्मिक मनुष्याची हीच ती समज होती; हीच ती आतील आध्यात्मिक सामर्थ्याची समज होती जीने ईयोबाला प्रतिकूल परिस्थितीत उभे केले.
चांगली बातमी अशी आहे की आपण अशा ठिकाणी आत्मा प्रस्थापित करु शकता जेथे आजारपण त्याला निराश करू शकत नाही, निराशेने तो वाकून जाऊ शकत नाही, भीती त्याला थांबवू शकत नाही, वाईट बातमी त्यास डगमगू शकत नाही आणि संकटाचा त्याच्यावर परिणाम होऊ शकत नाही. आपण या पातळीवर आपला आत्मा प्रस्थापित करू शकता.
अंगीकार
1. हे पित्या, आज मी पृथ्वीवर विश्वासाचे वचन मोकळे करत आहे, आध्यात्मिक बी जे माझ्या आध्यात्मिक आणि स्वाभाविक जीवनात फळ देईल. येशूच्या नावात आमेन
2. मी माझा आत्मा खचून जाऊ देणार नाही कारण स्वर्ग आणि पृथ्वीचा परमेश्वर देव याच्यावर माझी आशा व भाव आहे. मी फक्त वर आणि खाली नाही मी शेपूट नाही, तर मस्तक आहे. मी येईन तेव्हा आशिर्वादीत होईल व जाईल तेव्हा आशिर्वादित होईल. येशूच्या नावात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुम्ही अजूनही का वाट पाहत आहात?● असामान्य आत्मे
● परमेश्वराला पाहिजे की तुमचाउपयोग करावा
● गुप्त गोष्टी समजून घेणे
● अंतिम रहस्य
● देवाने-दिलेले स्वप्न
● गमाविलेले रहस्य
टिप्पण्या