बहाणा करण्यात आपण कुशल आहोत, नाही काय? जबाबदाऱ्या किंवा आव्हानात्मक कार्ये टाळण्याचा उशीर वैध कारणे समोर आणून त्यापासून दूर जाण्याची सामान्य मानवी प्रवृत्ती आहे. मग कोणत्याही प्रकल्पाला उशीर करणे किंवा तो पुढे ढकलणे, कठीण संवाद टाळणे किंवा आध्यात्मिक शिस्तीकडे दुर्लक्ष करणे असे काहीही असो, बहाणा करणे हे आपल्याला सुरक्षित करणे आहे.
सामान्य बहाण्यांमध्ये, “मला वेळ नाही”, “मी खूप थकलो आहे,” “हे खूप कठीण आहे,” किंवा “ मी ते उद्या करील” अशा शब्दांचा समावेश असतो. असे बहाणे कदाचित तात्पुरते समाधान देऊ शकते, परंतु ते नेहमी आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहचण्यापासून आपल्याला रोखतात. सत्यता ही आपण आपल्या स्वतःला गैरसोय, अपयश किंवा अनोळख्या व्यक्तीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अशा बहाण्यांचा वापर करतो, आणि आपल्या ह्या टाळण्याच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार करत नाही.
बहाण्यांची मूर्खता : यिर्मया संदेष्ट्याकडून शिकवण
असे म्हटले गेले आहे की बहाणे हे अक्षम्यताचे साधन आहे, ते जे त्याच्यात पारंगत आहेत ते क्वचितच मोठे पल्ले गाठू शकतात.” बेंजामिन फ्रँकलिनने एकदा लिहिले, “तो जो बहाणे करण्यात फारच चांगला आहे, तो इतर कशासाठीही क्वचितच चांगला असतो. हे शहाणपण यिर्मया संदेष्ट्याच्या कथेशी समरूप होते. जेव्हा देवाने यिर्मयाला राष्ट्रांसाठी संदेष्टा होण्यास बोलावले, तेव्हा तो बहाणे करण्यास तत्पर होता.
यिर्मया १: ४-६ मध्ये आपण वाचतो,
“परमेश्वराचे वचन मला आले ते असे : “मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.” तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ते ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.”
यिर्मया संदेष्ट्याचा पहिला बहाणा हा त्याचे वय होते. एवढे मोठे काम करण्यासाठी त्याला खूपच तरुण आणि अननुभवी असे वाटले. परंतु देवाने या बहाण्याला स्वीकारले नाही. त्याऐवजी, त्याने यिर्मयाला हे म्हणत शास्वती दिली,
“मग परमेश्वर मला म्हणाला, “मी बाळ आहे असे म्हणू नकोस; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा व तुला आज्ञापीन त बोल. त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.” (यिर्मया १:७-८)
देवाचा यिर्मयाच्या बहाण्याला प्रतिसाद एका महत्वपूर्ण सत्यावर जोर देतो : जेव्हा देव आपल्याला काहीतरी करण्यासाठी बोलावतो, तेव्हा तो आपल्या कथित मर्यादांची पर्वा न करता आपल्याला तयार करतो. यिर्मयाची कथा अनेकदा आपल्याला आठवण करून देते की, बहाणे हे अनेकदा भीती आणि असुरक्षीततेमध्ये रुजलेले आहेत, परंतु देवाचे बोलावणे हे त्याची उपस्थिती आणि शक्तीच्या निश्चितीसह येते.
बहाणे आपल्याला आज सहज करते आणि उद्या कठीण करते.
बहाणे तात्पुरती सुटका पुरवू शकतात, जे आज सहज करते, परंतु ते अनेकदा उद्या अधिक कठीण करतात. जेव्हा आपण आज कठीण कार्याला टाळतो, तेव्हा ते केवळ जमा होत जातात, आणि भविष्यासाठी जास्त तणाव आणि चिंता निर्माण करतात. नीतिसूत्रे ६:९-११मध्ये हे तत्व प्रतिध्वनित होते :
“अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे, आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील.”
हे वचन आपल्याला विषयाबाबत उशीर करणे आणि पुढे ढकलणे किंवा बहाणे करण्याच्या धोक्याविषयी ताकीद देते. “थोडीशी झोप” “थोडीशी डुलकी” हे जबादारी टाळण्यासाठी केले जाणारे लहान आणि हानिकारक न वाटणाऱ्या बहाण्यांचे प्रतिक आहेत. परंतु कालांतराने, हे लहान बहाणे मोठे परिणाम आणू शकतात, जसे गरिबी चोराप्रमाणे शिरकाव करते.
शिस्त आज कठीण करते परंतु उद्या सहज करते
याउलट, शिस्त आज कठीण करते परंतु उद्या सहज करत. शिस्तीमध्ये, प्रयत्न, स्वयं-नियंत्रण, आणि कधीकधी गैरसोय सामील असतात. परंतु शिस्तीचा पुरस्कार हा खूप मोठा आणि टिकावू असतो. बायबल अनेक उताऱ्यांमध्ये शिस्तीच्या महत्वावर जोर देते. असेच एक वचन हे इब्री. १२:११ आहे,
“कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते.”
बहाण्याच्या विरोधात शिस्त : एक निवड जी आपण केली पाहिजे
दररोज आपण निवडीला सामोरे जातो : बहाणे करावे किंवा शिस्त पाळावी. निवड ही आपल्या जीवनाच्या मार्गाला निश्चित करेल. बहाणे हे जबाबदारीपासून त्वरित सुटका पुरवू शकतात, परंतु ते आपल्याला सामान्यतेच्या आणि अपूर्ण क्षमतेच्या चक्रात अडकवतात. याउलट, शिस्तीमध्ये प्रयत्न आणि त्याग सामील आहेत, परंतु ते यश, आध्यात्मिक वाढ आणि आपल्या जीवनात देवाचे उद्देश पूर्ण करण्याकडे नेते.
विश्वासणारे, म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही, परंतु सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे (२ तीमथ्य १:७). आपल्याजवळ कोणत्याही आव्हानांवर मात करण्यासाठी ख्रिस्ताकडून शक्ती आणि क्षमता आहे. फिलिप्पै. ४:१३पासून चला आपण प्रेरणा घेऊ या, जे म्हणते, “मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.” हे वचन आपल्याला आठवण करून देते की जेव्हा आपण देवाच्या शक्तीवर अवलंबून असतो तेव्हा कोणतेही बहाणे वैध नाहीत.
जेव्हा तुम्ही या निवडीवर मनन करता, लक्षात ठेवा देवाची कृपा तुम्हाला पुरेशी आहे. त्याची शक्ती तुमच्या अशक्तपणात तुम्हाला परिपूर्ण करते (२ करिंथ. १२:९). म्हणून, बहाणे करणे सोडून द्या, शिस्तीला आत्मसात करा, आणि देवाने जे जीवन जगण्यास तुम्हाला बोलावले आहे त्यामध्ये आत्मविश्वासाने पाउल टाका.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, बहाण्यांवर मात करण्यासाठी आणि शिस्तीला आत्मसात करण्यासाठी मला शक्ती प्रदान कर. माझ्या आयुष्यासाठी तुझे उद्देश पूर्ण करावे, आणि दररोज तुझ्या कृपेवर अवलंबून राहण्यासाठी मला तुझे धाडस आणि शहाणपणाने भरून टाक. येशूच्या नावाने. आमेन
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वासाद्वारे कृपा प्राप्त करणे● महान पुरुष आणि स्त्रिया का पतन पावतात - ६ (आपल्या विचारांना बंदी बनवने)
● देवाचे वचन वाचण्याचे 5 लाभ
● २१ दिवस उपवासः दिवस १६
● दिवस ३९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आपल्यामध्येच खजिना
● लहान बियापासून ते उंच झाडांपर्यंत
टिप्पण्या