डेली मन्ना
परमेश्वर पुरवठा कसा करतो # 2
Saturday, 14th of September 2024
20
18
250
Categories :
पुरवठा
परमेश्वराला आपण विचारण्याअगोदरआपल्या गरजा ठाऊक आहेत आणि त्याने आश्वासन दिले आहे की आपल्या गरजांची पूर्तता करेल. परमेश्वर त्याच्या लोकांच्या गरजा विभिन्न मार्गांनी पुरवितो.
येथे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तो पुरवठा करतो
1. मनुष्यांच्या द्वारे
देवाने मला तुमच्यापुढे यासाठी पाठविले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा; मोठया सुटकेसाठी तुम्हांस वाचवावे आणि तुमची वंशवृद्धि होऊ दयावी. (उत्पत्ति 45:7)
योसेफ च्या काळी तेथे संपूर्ण जगात गंभीर दुष्काळ पडला होता. त्याचे स्वतःचेभाऊ ज्यांनी त्यास विकले होते ते भोजनाच्या शोधात मिसर देशात आले होते कीदुष्काळातून निभावून जावे. आता ते त्यांच्या स्वतःच्या भावा समोर पश्चातापीहृदयाने उभे होते की त्यांनी असे लज्जाजनक कृत्य केले होते.
तथापि, योसेफ ने त्यांना खात्री दिली की तो त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेईल. देवाने मनुष्याचा [योसेफ] उपयोग केला की त्याच्या लोकांना आशीर्वादित करावे. हा एक मार्ग आहे ज्याद्वारे परमेश्वर त्याच्या लोकांचा पुरवठा करतो.
दया म्हणजे तुम्हांस दिले जाईल; चांगले माप दाबून, हालवून व शींग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून दयाल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल. (लूक 6:38)
लक्षात घ्या, वचन म्हणते, 'लोक तुमच्या पदरी घालतील'
बॉस, एकसहकारी, एक नातेवाईक कोणाचाही परमेश्वर उपयोग करू शकतो की तुम्हाला आशीर्वादित करावे. आता तुम्ही हे समजले पाहिजे की परमेश्वर जेव्हा मनुष्याचा उपयोग करतो की तुम्हाला आशीर्वादित करावे, परमेश्वर हा सर्वांचा स्त्रोत आहे.
2. देव स्वतः पुरवठा करतो
आता तेथे मिसर मध्ये एक नवीन राजा झाला, ज्यास योसेफ ची ओळख नव्हती. (उत्पत्ति 1:8)
ज्याने इस्राएली लोकांना पुरवठा केला होता तो आता नव्हता-योसेफ मरण पावला होता. इस्राएली लोकांना जे लाभदायक राजकीय वातावरण होते ते सुद्धा आता बदलले होते. आता त्यांना परमेश्वराकडे त्यांचा पुरवठा करणारा म्हणून याचना करावी लागली आणि परमेश्वराने त्यांना निराश केले नाही.
तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तूं त्याच्या आज्ञा पाळीशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे रानातून कोणत्या रीतीने चालविले ह्याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली, आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. ही चाळीस वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत, आणि तुझे पाय सुजले नाहीत. (अनुवाद 8:2-4)
प्रेषित पौलाने परमेश्वराला एक अद्भुतरित्या पुरवठा करणारा असे ओळखले आणि फिलिप्पै 4:19 मध्ये हे म्हणत लिहिले, "माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील."
गुड फ्रायडे उपासनेच्या वेळी, मला प्रेरणा मिळाली ही घोषणा करावी, 'प्रभू येशूने केवळ आपल्या पापांची किमतच भरली नाही परंतु त्याने सर्व काही साठी किंमत भरली आहे." ह्या वाक्यावर सर्व जण ओरडले आणि मोठयाने बोलले. परंतु उत्तम ते अजून यायचे होते. एका आठवडयानंतर, एक स्त्री व्यासपीठावर उभी राहिली आणि तिने पुढील प्रमाणे तिची साक्ष दिली:
मी एका संस्थे कडून 30 लाखाचे कर्ज घेतले होते. जवळजवळ तीन वर्षे मी विश्वासुपणे कर्जाची रक्कम भरली. त्यानंतर, मी माझी नोकरी गमाविली, आणि त्यानंतर वाईट आणि अत्यंत दुर्दशा होत गेली. ते नोटीस नंतर नोटीस पाठवीत गेले हे स्पष्ट करीत कीत्यांना माझे घर घ्यावे लागेल. अशा परिस्थितीत, मी देवाकडे रडून मागणी केली, "परमेश्वरा, मी विश्वास ठेवते की तू ते सर्व भरलेच आहे. मला आणि माझ्या लेकरांना साहाय्य कर, मी एक विधवा आहे." बैंके कडे जाण्याचा मी निर्णय केला आणि मला आणखी वेळ दयावा हे सांगावे. जेव्हा मी तेथे पोहचले, एकव्यक्ति म्हणाला, "हे घ्या तुमच्या घराचे कागद, येथे संस्थे मध्ये काही प्रकरण झाले होते आणि त्यांनी संस्था बंद केली आहे. तुम्ही जाऊ शकता" मला जवळजवळ चक्कर आली आणि मी जोरात ओरडले, "येशू तुझा धन्यवाद होवो."
जेव्हा मी हे ऐकले, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते ही वास्तविकता जाणत की परमेश्वर त्याच्या लोकांची किती काळजी घेतो.
प्रार्थना
(ह्या प्रार्थना मुद्द्यांवर पुढील सात दिवस सतत प्रार्थना करा. तुम्ही अद्भुत परिणाम पाहाल.)
1. परमेश्वरा,येशूच्या नांवात मी पुरवठा तुझ्या मार्गाद्वारे प्राप्त करतो.
2. परमेश्वरा,येशूच्या नांवात मला माझ्या गरजांकडून माझ्या इच्छेकडे ने.
3. परमेश्वरा,येशूच्या नांवात मला योग्य दिशे मध्ये मार्गदर्शन कर.
4. पित्या, येशूच्या नांवात मला दैवी स्त्रोत दे.
5. परमेश्वरा, येशूच्या नांवात मला योग्य व्यक्तींशी संबंधात आण. 6. परमेश्वरा, येशूच्या नांवात संधीचेदैवी द्वार उघड.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवदूताचे साहाय्य कसे सक्रीय करावे● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
● स्वयं-गौरवाचा सापळा
● मध्यस्थीचे महत्वाचे घटक
● तुमच्या परिवर्तनाला काय अडथळा करते ते समजा
● त्यांनातरुणच असे पकडावे
● प्रार्थने मध्ये अडथळ्यांवर कशी मात करावी
टिप्पण्या