पुढील वचन फार काळजीपूर्वक वाचा:
आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडावयास कोण योग्य आहे, असे मोठयाने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता.
ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नांवात टेकला जावा. (फिलिप्पै २: १०)
वरील वचन आपल्याला तीन स्तर प्रकट करते.
स्वर्ग
पृथ्वी
पृथ्वीखालचा भाग
स्वर्गातील गोष्टी-हे आध्यात्मिक स्तर चा संदर्भ देते जेथे देवाचे सिंहासन आहे, त्यास'तिसरा स्वर्ग' सुद्धा म्हणतात (२ करिंथ १२: २). देव, दूत आणि संतांचे हे निवासस्थान आहे.
पृथ्वीवरील गोष्टी-ज्यामध्ये मानव आणि प्राणी हे आहेत
पृथ्वीच्या खालील गोष्टी (पृथ्वीच्या पोटातील किंवा नरक)-ज्यामध्ये काही खोली आहेत जेथे पतित दूतांना अंधाराच्या साखळदंडानी बांधलेले आहे जेथे ते न्यायाच्या दिवसाची वाट पाहत आहेत (२ पेत्र २: ४ वाचा).
नवीन करारा नुसार, येथेमरण पावलेल्या पुरुष आणि स्त्री यांचे अनीतिमान आत्मे, आणि जीव हे येथे आहेत.
प्रभु येशू मृतामधून उठविला गेल्यानंतर देवाने त्यास त्याच्या उजव्या हाताकडे श्रेष्ठ स्थानाकडे अत्युच्च केले आणि ते नाव दिले जे सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे (इफिस १: २०; फिलिप्पै २: ९-११ वाचा).
परमेश्वराने[पिता]केवळ येशूला नाव दिले नाही जे सर्व नावांहून श्रेष्ठ आहे परंतु येशूच्या नावात, प्रत्येक जण सर्व स्तरातील-स्वर्ग, पृथ्वी आणि पृथ्वीखालील (नरक)-यांनी येशूची प्रभूता आणि वर्चस्व कबूल केले पाहिजे.
परमेश्वराने येशूला विश्वात सर्वात अत्युच्च स्थानात सुद्धाबसविले आहे, त्याच्या उजव्या हाताकडे आणि त्यास सर्वांचा प्रमुख असे केले आहे. (इफिस १: १९-२२ वाचा)
याचा अर्थ येशूच्या नांवात प्रार्थना करणे हे अत्यंत सामर्थ्यशाली आहे. जेव्हा आपण येशूच्या नांवात प्रार्थना करतो, आपण ह्या तिन्ही स्तरातील त्याच्या अधिकाराने प्रार्थना करतो. तुम्हांला आणि मला इतर कोणत्याही नावाची गरज नाही-केवळ येशूचे नाव.
प्रार्थना
पित्या, मी तुला येशूच्या नावा साठी धन्यवाद देतो.
येशूच्या नांवात, ख्रिस्त येशू मध्ये मी परमेश्वराची धार्मिकता आहे.
येशूच्या नांवात, जेथेकोठे मी जातो देवाची कृपा मला एका ढाली प्रमाणे घेरून राहते. माझे जीवन हे मग कधीही तसेच राहणार नाही.
येशूच्या नांवात, ख्रिस्त येशू मध्ये मी परमेश्वराची धार्मिकता आहे.
येशूच्या नांवात, जेथेकोठे मी जातो देवाची कृपा मला एका ढाली प्रमाणे घेरून राहते. माझे जीवन हे मग कधीही तसेच राहणार नाही.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आत्म्याची नांवे आणि शीर्षक: पवित्र आत्मा● तो तुमच्या जखमांना बरे करू शकतो
● जीवनाचे पुस्तक
● मान्ना, पाट्या आणि काठी
● स्वर्गाचे आश्वासन
● तुम्ही अजूनही का वाट पाहत आहात?
● प्रार्थना कशी करावी जेव्हा तुम्हाला देवापासून दूर आहोत असे वाटते
टिप्पण्या