डेली मन्ना
आध्यात्मिक दरवाजे बंद करणे
Monday, 21st of October 2024
19
15
262
Categories :
मानसिक आरोग्य
“आणि सैतानाला वाव देऊ नका.” (इफिस. 4:27)
आपले मन आणि भावनांमध्ये ज्या अनेक संघर्षांना आपण सामोरे जातो -मग ते निराशा, चिंता किंवा राग असोत -ते शारीरिक किंवा मानसिक नाहीत. नेहमी, ते आध्यात्मिक दरवाजातून उत्पन्न होतात ज्यांना आपण नकळत उघडे ठेवलेले असते. हे दरवाजे शत्रूंना आपल्या जीवनाच्या क्षेत्रात प्रवेश देऊ शकतात जेथे तो भीती, शंका आणि गोंधळाचे बीज पेरू शकतो. परंतु सुवार्ता ही आहे की पश्चातापाचे सामर्थ्य आणि देवाच्या कृपे द्वारे हे दरवाजे बंद करता येऊ शकतात, आणि शांती पुनःस्थापित करता येऊ शकते.
कधीकधी हे पाप असते ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा त्यास कमी लेखतो जे मोठ्या विषयाकडे नेते. यामध्ये विषारी नातेसंबंधात गुंतणे, मादक पदार्थांचा गैरवापर करणे, क्षमाहीनता बाळगणे किंवा राग आणि कटुता यात गुंतणे या गोष्टींचा समावेश असू शकतो. ह्या गोष्टी सुरुवातीला कमी महत्वाच्या वाटत असल्या तरी, कालांतराने, ते उघडी दारे होतात जे मोठ्या समस्यांकडे नेते जसे निराशा, चिंता आणि आशाहीनतेची भावना.
इफिस. 4:27मध्ये, पौल आपल्याला ताकीद देतो, “सैतानाला वाव देऊ नका.” याचा अर्थ आपण स्वतःला पाप करण्यास अनुमती देण्यापासून स्वतःचे संरक्षण करावे -मग ते किती लहान दिसते याची पर्वा नाही-की आपल्या जीवनावर पकड धरावी. पाप हे दरवाजामध्ये असलेल्या तड्यासारखे आहे; एकदा की हे उघडले, तर शत्रूला केवळ एक लहान मार्गाची आवश्यकता लागते की प्रवेश करावा आणि विध्वंस करावा.
जे एक लहान असे सुरु होते, न हाताळले गेलेले समस्या हे मोठ्या संकटात बदलू शकते.
राग ज्यावर उपाय केलेला नाही, तो कटुत्वामध्ये वाढू शकतो. क्षमाहीनता आपल्या अंत:करणाला कठीण करू शकते आणि आपली शांती हिरावून घेऊ शकते. आपल्या जीवनाच्या लहान भागांमध्ये तडजोड करणे, जसे अधार्मिक आचरणामध्ये व्यस्त होणे किंवा नकारात्मक विचारांना रुजू द्यावे जे शत्रूसाठी दरवाजे उघडे करण्याकडे नेऊ शकते की आपल्या मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यावर आक्रमण करावे.
बायबल स्पष्ट आहे : पाप आपल्याला देवापासून वेगळे करते आणि त्या विभक्तपणात, आपल्याला थकवा, गोंधळ आणि यातना मिळतात. तथापि, आपल्याला आशेवाचून सोडलेले नाही. 1 योहान 1:9 आपल्याला वचन देते, “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.” ह्या आध्यात्मिक दरवाजांना बंद करण्यासाठी पश्चाताप ही किल्ली आहे. हे नम्रतेचे कृत्य आहे जेथे आपण आपल्या चुका देवासमोर स्वीकारतो, त्याची क्षमा मागतो, आणि जे काहीही त्याच्या इच्छेनुसार नसते त्यापासून दूर होतो.
परंतु पश्चाताप हे “मला खेद झाला आहे” असे म्हणण्यापेक्षा अधिक आहे; हे प्रामाणिकपणे पापापासून वळणे आहे आणि देवाच्या सत्याच्या प्रकाशात चालण्याची निवड करणे आहे. जेव्हा आपण पश्चाताप करतो, तेव्हा आपण शत्रूला जे दरवाजे उघडले आहेत ते केवळ बंद करत नाहीत, तर आपण देवाची उपस्थिती, त्याची शांती, आणि आपल्या जीवनात त्याच्या आरोग्याला आमंत्रित करतो.
जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला दोषी ठरवतो, तेव्हा हे नेहमीच दोषी ठरवण्यासाठी नाही तर पुनःस्थापित करण्याच्या उद्देशाने असते. शत्रू आपल्याला अयोग्य वाटावे अशी भावना होऊ देण्याचा प्रयत्न करेल, आपल्याला हे सांगून की आपण ह्यात खूप पुढे गेलो आहोत, परंतु देवाची कृपा पुरेशी आहे की आपल्याला स्वच्छ करावे आणि आपल्या मनाला नवीन करावे. पश्चातापाच्या सामर्थ्याने, शत्रूचे बालेकिल्ले हे मोडले जातात, आणि आपण देवाबरोबर घनिष्ठता आणि शांतीच्या ठिकाणी पुनःस्थापित केले जातो.
तुमच्या जीवनावर मनन करण्यासाठी काही क्षण काढा. तेथे कोणतेही क्षेत्र आहेत काय जेथे तुम्ही आध्यात्मिक दरवाजे उघडे ठेवलेले आहेत? कदाचित क्षमाहीनता बाळगणे, कटुत्व वाढू देणे, किंवा त्या कृत्यांमध्ये व्यस्त राहणे जे देवाच्या इच्छेशी समरूप नाहीत. जे दरवाजे बंद करण्याची गरज आहे त्यासाठी पवित्र आत्म्याला विनंती करा.
जर तुम्ही ओळखले की तुम्ही पापाने आध्यात्मिक दार उघडले आहे, तर पश्चातापी अंत:करणाने देवाजवळ येण्यास घाबरू नका. तुमची पापे कबूल करा, त्याची क्षमा मागा, आणि ते दरवाजे बंद करण्यासाठी आणि तुमच्या अंत:करणात आणि मनात शांती स्थापित करण्यासाठी त्याच्याकडे विनंती करा. देव उघड्या हाताने आपले पुनः स्वागत करण्यासाठी आणि आपल्या आत्म्याला नवीन करण्यासाठी नेहमीच तयार आहे.
पुढील संपूर्ण आठवड्यात, वैयक्तिक मनन आणि प्रार्थनेसाठी वेळ काढा. तुमच्या जीवनातील कोणत्याही क्षेत्राला प्रकट करण्यासाठी देवाजवळ विनंती करा जेथे तुम्ही शत्रूला स्थिरावण्यास जागा दिली होती. ते लिहून काढा आणि प्रत्येक दिवशी, त्या विशेष भागांसाठी प्रार्थना करा आणि देवासोबत चालण्यासाठी देवाकडून क्षमा आणि शक्ती मागा. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा भरवसा ठेवा की देव ते आध्यात्मिक दरवाजे बंद करत आहे आणि तुम्हाला त्याच्या शांतीने भरून काढत आहे.
प्रार्थना
पित्या, मी तुझ्यासमोर पश्चातापी अंत:करणाने येतो. मी माझी कृत्ये आणि आचरणाने ते दरवाजे उघडले आहेत याचा मी स्वीकार करतो ज्यामुळे माझ्या जीवनात प्रवेश करण्यासाठी मी शत्रूला अनुमती दिली आहे. प्रभू, मी तुझी क्षमा मागतो. जे प्रत्येक दरवाजे मी उघडले आहे ते बंद कर आणि जे तुझ्या इच्छेशी समरूप होत नाही अशा कोणत्याही गोष्टीपासून मला शुद्ध कर. मला तुझ्या शांतीने भरून काढ आणि तुझ्या मार्गात चालण्यासाठी मला मदत कर. येशूच्या नावाने, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वराला तुमचा बदला घेऊ दया● ख्रिस्ती लोक डॉक्टर कडे जाऊ शकतात काय?
● जीवनाच्या चेतावणीचे पालन करणे
● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे
● विश्वासात स्थिर उभे राहावे
● दिवस १४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● अद्भुततेस जोपासणे
टिप्पण्या