डेली मन्ना
दिवस ३२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Monday, 23rd of December 2024
27
22
228
Categories :
उपास व प्रार्थना
राष्ट्र, नेते आणि चर्चसाठी प्रार्थना करा
तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी; राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे.” (१ तीमथ्य. २:१-३)
प्रार्थना ही ख्रिस्ती लोकांच्या हातात सर्वात शक्तिशाली शक्ती आहे. त्याच्या द्वारे, पृथ्वीवरील क्षेत्रात देवाची इच्छा पूर्ण केली जाऊ शकते. देवाची इच्छा आहे की आपण कळकळीने प्रार्थना करावी आणि त्याची ही देखील इच्छा आहे की आपण निरंतर प्रार्थना करावी. आपल्या प्रार्थनेवाचून, पुष्कळ गोष्टी ज्या देवाला पृथ्वीवरील क्षेत्रात करायच्या आहेत त्याला अडथळा होऊ शकतो कारण प्रार्थना हा मार्ग आहे जो देवाला कायदेशीर मार्ग देतो की मनुष्यांच्या व्यवहारात कार्य करावे. देव सार्वभौम आहे आणि कोणत्याही वेळी आणि सर्व वेळेला चालू शकतो, पण त्याने स्वतःला प्रार्थनेला समर्पित केले आहे. जर आपण प्रार्थना केली, तर तो ऐकेल, आणि आपण जी सर्व इच्छा बाळगतो तिला पूर्ण करेल.
आपल्या नेत्यांसाठी आपल्याला प्रार्थना करण्याची का आवश्यकता आहे?
१. आपल्या प्रार्थना आपल्या नेत्याला देवाच्या मनासारख्या गोष्टी करण्यास मदत करतील.
प्रार्थना आपल्या नेत्यांच्या हृदयाला स्पर्श करते म्हणजे ते देवाची आज्ञा पाळतील आणि देवाचे भय धरतील. जेव्हा आपल्या नेत्यांसाठी प्रार्थना केली जात नाही, तेव्हा राष्ट्र, चर्च, आणि पुष्कळ गोष्टी देवाच्या इच्छेच्या विरुद्ध होतील. देवाचे भय धरणारे नेते देवाच्या इच्छेनुसार आपल्याला मार्गदर्शन करण्यास असण्यासाठी, आपण नियमितपणे त्यांच्या हृदयाला देवाने स्पर्श करावा म्हणून प्रार्थना केली पाहिजे.
२. आपण आपल्या नेत्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे म्हणजे ते ज्ञानाने मार्गदर्शन करतील.
ज्ञान ही प्रमुख गोष्ट आहे, आणि यशस्वीपणे मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक नेत्याला ज्ञानाची आवश्यकता आहे.
जेव्हा शलमोनाने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा त्याने ताबडतोब ज्ञानाची त्याची गरज ओळखली. त्याला कळले की त्याची प्रमुख गरज हे ज्ञान होते.
जेव्हा देवाने त्याला कोरा चेक दिला आणि काहीही मागण्यास सांगितले, तेव्हा तो म्हणाला:
“आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला माझा बाप दावीद ह्याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मुल आहे; चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे; त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत. ह्यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे म्हणजे मला बऱ्यावाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे?” (१ राजे ३:७-९)
देव त्याच्या विनंतीने प्रसन्न झाला कारण त्याने दीर्घायुष्य आणि संपत्ती मागितली नाही. देवाने त्याला ज्ञान, संपत्ती आणि सर्वकाही दिले जे त्याने मागितले नव्हते. आपल्या नेत्यांना ज्ञानाची आवश्यकता आहे जेव्हा ते अनेक लोकांशी व्यवहार करतात आणि समाजातील समस्यांना हाताळतात. ज्ञानावाचून, ते चुकीचे आणि अधार्मिक निर्णय घेऊ शकतात जे अनेक पिढ्यांच्या भविष्यावर परिणाम करू शकते.
चर्चसाठी आपल्याला प्रार्थना करण्याची का आवश्यकता आहे?
चर्च हे पृथ्वीवर देवाचा प्रतिनिधी आहे आणि चर्चसाठी देवाजवळ प्रार्थना देखील केली पाहिजे.
१. चर्चला देवाच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे म्हणजे पृथ्वीवर देवाच्या कार्याकरता ते प्रगती करू शकेल.
२. चर्चला प्रार्थनेची आवश्यकता आहे म्हणजे समाजात, लोकांच्या जीवनात आणि राष्ट्रात शत्रूची पकड नष्ट करता येऊ शकेल.
३. चर्चला आपल्या प्रार्थनेची आवश्यकता आहे म्हणजे ते सुवार्ता पसरवू शकेल.
४. चर्चला आपल्या प्रार्थनेची आवश्यकता आहे म्हणजे अडथळ्यावाचून आणि जगिक गोष्टीकडे आकर्षिल्यावाचून ते योग्य मार्गावर राहू शकेल.
बंधूजनहो, माझी इच्छा आहे की आपण मनापासून चर्चसाठी प्रार्थना करावी कारण चर्चसाठी प्रार्थना करणे हे आपल्या स्वतःसाठी देखील प्रार्थना करणे आहे. माझी इच्छा आहे की आपण आपले नेते आणि राष्ट्रासाठी देखील प्रार्थना करावी. पवित्र शास्त्र म्हणते, “यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांचे कल्याण असो; तुझ्या कोटात शांती वसो; तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो. माझे बंधू व माझे मित्र ह्यांच्यासाठी तुझ्यामध्ये शांती वसो; अशी मी प्रार्थना करीन.” (स्तोत्र. १२२:६-८)
उदाहरणार्थ, युक्रेन मध्ये, जेथे रशियाबरोबर युद्ध चालू आहे, गोष्टी सामान्यपणे होत नाहीत. व्यवसाय आणि इतर अनेक गोष्टींवर परिणाम झाले आहेत. म्हणून, तुम्ही जर तुमच्या राष्ट्राच्या शांतीसाठी प्रार्थना करत नसाल, जर तुम्ही तुमच्या नेत्यांसाठी प्रार्थना करत नसाल, जर तुम्ही चर्चसाठी प्रार्थना करत नसाल, तर जे काही चर्च, राष्ट्र आणि नेत्यांच्या विरोधात होईल त्याचा तुमच्यावर देखील परिणाम होईल. दीर्घ कालावधीसाठी ते तुमचे कुटुंब आणि व्यवसायावर देखील परिणाम करेल. त्यामुळे, आज आपल्याला ह्या प्रार्थनेसाठी आवेशी असण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याजवळ जे काही आहे ते देऊन टाकावे म्हणजे देव आपल्या राष्ट्रावर कार्य करण्यास पाऊल टाकेल आणि चर्चला अग्नीने व कृपेने समर्थ करील की आपल्या राष्ट्रात तिने जे सर्वकाही करावे म्हणून देवाने आज्ञा दिली आहे ते करावे.
Bible Reading Plan : 1 Thessalonians 3 - 1 Timothy 5
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. येशू ख्रिस्ताच्या नावाने, पित्या, येशूच्या नावाने तुझी इच्छा आमच्या राष्ट्रामध्ये पूर्ण होवो. (मत्तय. ६:१०)
२. आमच्या राष्ट्रावरील कोणताही सैतानी कार्यक्रम येशूच्या नावाने कापून काढला जावा. आम्ही आदेश आणि घोषित करतो की येशूच्या नावाने तो प्रकट होणार नाही. (२ करिंथ. १०:४-५)
३. हे परमेश्वरा, तुझ्या चर्चला समर्थ कर म्हणजे ते येशूच्या नावाने शक्ती आणि कृपेने प्रगती करेल. (प्रेषित. १:८)
४. पित्या, चर्च म्हणून आम्हांला तू जी आज्ञा दिली आहे त्याची कापणी आणि कामासाठी येशूच्या नावाने कामकरी पाठव. (मत्तय. ९:३८)
५. पित्या, आम्ही आमच्या नेत्यांसाठी प्रार्थना करतो की राष्ट्रीय संकटे आणि समस्यातून मार्ग काढावा आणि त्या सोडवण्यासाठी तू त्यांना येशूच्या नावाने ज्ञान प्रदान कर. (याकोब १:५)
६. पित्या, आम्ही आमच्या नेत्यांसाठी प्रार्थना करतो की ते येशूच्या नावाने तुझे बोल बोलतील आणि असे की तुझे भय त्यांच्या हृदयात असेल. (नीतिसूत्रे ९:१०)
७. पित्या, आम्ही प्रार्थना करतो की तू आमच्या नेत्यांना सांभाळशील आणि राखून ठेवशील म्हणजे जे या राष्ट्रासाठी धार्मिकतेचा मार्ग धरून राहतील त्यांना येशूच्या नावाने दीर्घायुष्य प्राप्त होवो. (नीतिसूत्रे ३:१-२)
८. पित्या, दानीएलासारखे धार्मिक नेते निर्माण कर, नहेम्यासारखे धार्मिक नेते, शक्तिशाली नेते जे मोशे आणि यहोशवासारखे तुझी इच्छा पूर्ण करतील. येशू ख्रिस्ताच्या नावाने त्यांना आमच्या पिढीमध्ये निर्माण कर. आमेन. (दानीएल १;१७; नहेम्या १:४, इब्री. ११:२३-२९)
Join our WhatsApp Channel
Most Read
● २१ दिवस उपवासः दिवस १५● विश्वास: परमेश्वराला संतोषविण्याचा एक निश्चित मार्ग
● ख्रिस्त-केंद्रित घर
● पृथ्वीचे मीठ किंवा मिठाचा स्तंभ
● स्वतःवरच घात करू नका
● ख्रिस्ती लोक देवदूताला आदेश देऊ शकतात काय?
● तुरुंगात स्तुती
टिप्पण्या