डेली मन्ना
18
14
117
जर ते तुमच्यासाठी महत्वाचे असेल, तर ते देवासाठीही महत्वाचे आहे
Saturday, 3rd of May 2025
Categories :
परमेश्वराची उपस्थिती
पुष्कळ विश्वासणारे आयुष्यक्रमण करीत असताना हा विचार करतात की देव केवळ “मोठ्या गोष्टींबद्दलच” विचार करतो- जागतिक घटना, नैसर्गिक आपत्ती, युद्ध आणि वैश्विक पुनरुज्जीवन. राष्ट्रे आणि संपूर्ण विश्वावर तो जरी सार्वभौमिक असला तरी तो तुमच्या हृदयाच्या शांत रडण्याकडे देखील प्रेमळपणे लक्ष देतो. जे लहानसे ओझे तुम्हाला आहे? जे इतके लहानसे वाटते की त्यासाठी प्रार्थना करावी की नाही? तरी ते देवासाठी महत्वाचे आहे.
🔹तुमच्या स्वर्गीय पित्यासाठी काहीही अगदी लहान असे नाही
प्रभू येशूने एकदा म्हटले की दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञेवाचून त्यांतून एकही भूमीवर पडणार नाही (मत्तय १०:२९), त्यानंतर तो आणखी काहीतरी व्यक्तिगत म्हणतो, “तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील मोजलेले आहेत. (मत्तय १०:३०). केवळ त्याबद्दल विचार करा- देवाला तुमच्या डोक्यावर ह्याच क्षणी किती केस आहेत हे ठाऊक आहे. देव ज्यास तुमच्या अस्तित्वाबद्दल इतके लहान देखील ठाऊक असतानाही तो तुमच्या विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो का?
आपल्याला समस्यांचे वर्गीकरण करण्याची वृत्ती असते : “ह्याविषयी प्रार्थना करणे योग्य आहे”, ह्याविषयी नाही.” परंतु देव त्याप्रकारे पाहत नाही. जर त्यामुळे तुमचे हृदय भावूक होते, तर त्यामुळे त्याचे हृदय देखील भाऊक होते. मग एक लहान लेकरू शाळेविषयी चिंता करील असेल, किंवा तुटलेले भांडे दुरुस्त करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील, किंवा एखाद्या मित्राने अचानकपणे मौन धरले असेन, काहीही असो – तो पाहतो, ते त्याला ठाऊक आहे आणि तो त्याविषयी विचार करतो.
🔹मोजे आणि प्रेमळ पित्याची गोष्ट
एका संध्याकाळी, जेव्हा आम्ही चर्चला जाण्यासाठी तयार होत होतो, माझी मुलगी अबीगईल (जी तेव्हा चार वर्षांची होती), हिला त्याच्या आवडत्या मोज्यांची जोडी सापडू शकत नव्हती. एखाद्या प्रौढ व्यक्तीसाठी ते क्षुल्लक असे वाटू शकते, पण तिच्यासाठी, ते सर्वकाही होते. ती एका कोपऱ्यात उभी राहून, रडत होती. त्याक्षणी मी थांबलो आणि म्हणालो, “चल आपण प्रार्थना करू आणि मोजे शोधण्यासाठी येशूला विनंती करू या.” एकच मिनिटात, आम्हाला ते कुशनमध्ये अडकलेले दिसले. ती हसू लागली -केवळ यासाठी नाही की तिला मोजे सापडले होते, परंतु तिने ओळखले होते की प्रभू येशूला तिच्या मोज्याची काळजी होती.
त्या संध्याकाळी, तिने चर्चमध्ये सर्वांना सांगितले, “येशूने माझे मोजे शोधण्यासाठी मदत केली!” तुम्हाला समजले का, हा असाच आपला स्वर्गीय पिता आहे. तो तुमचे प्रश्न एखाद्या निश्चित गंभीरपणात पोहोचण्यापर्यंत थांबत नाही, तर तो त्यावर उपाय करतो. तो अगदी जवळ असलेला पिता आहे, तुमच्या जीवनाच्या सविस्तर गोष्टींविषयी त्याला काळजी आहे.
🔹तुम्ही नेहमी त्याच्या मनात आहात
स्तोत्र १३९:१७ म्हणते, “हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे!” तुमच्याविषयी देवाचे विचार स्थायी आहेत. जेव्हा तुम्ही आनंदी आहात, तेव्हा तो तुमच्यासोबत उत्सव करतो. जेव्हा तुम्ही चिंतेत आहात, तेव्हा तुमच्यावर करुणा करण्यासाठी तो तुमच्याजवळ येतो. जेव्हा तुम्हाला क्षुल्लक असे वाटते, तेव्हा तो तुम्हाला आठवण करून देतो की तुम्हाला भयप्रद आणि अद्भुत रितीने घडवलेले आहे.
यिर्मया २९:११ हे वचन केवळ चांगले वाटण्यासाठी नाही. ते एक आश्वासन आहे. “परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.” या योजनेत तुमच्या दिवसाचे मुख्य आणि लहानसे असे दोन्हीही क्षण समाविष्ट आहेत.
🔹त्याला प्रत्येक क्षेत्रात आमंत्रित करा
कधी कधी आपण अनावश्यकरित्या संघर्ष करत राहतो कारण आपल्या सविस्तर गोष्टींमधून आपण देवाला बाजूला ठेवलेले असते. त्याला आपल्या अंत:करणात येऊ द्या. त्याला तुमच्या दैनंदिन योजनांमध्ये आमंत्रित करा, तुमचे भावपूर्ण संघर्ष, तुमचे व्यवसायिक निर्णय आणि कोणते वस्त्र घालावे हा निर्णय करण्यास तुम्हाला त्रास होत असेल काहीही असो. त्याच्यासाठी काहीही मर्यादेबाहेर नाही. जसे एखादे लेकरू प्रेमळ आई-वडिलांवर अवलंबून असते तसे तुम्ही देखील त्यावर अवलंबून राहावे अशी त्याची इच्छा आहे.
Bible Reading 2 Kings: 1-3
प्रार्थना
स्वर्गीय पित्या,
मला पाहणारा देव असण्यासाठी तुझे आभार, केवळ वादळातच नाही, तर शांत समयात देखील. प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो. मी अनेक वेळा माझे ओझे स्वतःच घेत होतो त्यासाठी मला क्षमा कर. आज, मी ते सर्व तुझ्याकडे समर्पित करतो. येशूच्या नावांत. आमेन !!
Join our WhatsApp Channel

Most Read
● केव्हा शांत राहावे आणि केव्हा बोलावे?● यातना-मार्ग बदलणारा
● येशू कडे पाहत
● शांति- देवाचे गुप्त शस्त्र
● शेवटच्या समयाच्या चिन्हांची पारख करावी?
● तुमच्या भूतकाळाला तुमच्या भविष्यास नाव ठेवू देऊ नका
● परमेश्वराला विचारणे (चौकशी करणे)
टिप्पण्या