डेली मन्ना
37
13
1469
प्रारंभीच्या अवस्थेत परमेश्वराचीस्तुति करा
Saturday, 5th of November 2022
Categories :
स्तुती
ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरंवसा आहे. (फिलिप्पै १: ६)
एज्रा ३:१०-११ मध्ये बायबल म्हणते, "...बांधकाम करणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला ....तेव्हा त्यांनी परमेश्वराची स्तुति व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालीत आहेत हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जयजयकार केला.
तुम्ही यात आश्चर्य करीत असाल की त्यांनी असे का केले? केवळ पाया च घातला गेला होता. मंदिर हे अजूनही बांधले गेले नव्हते. त्यांनाअजून खूप लांबचा पल्ला गाठावयाचा होता. आणि मंदिर बांधण्या अगोदरच ते परमेश्वराची स्तुति करू लागले होते. येथे काही गहन गोष्टी आहेत जे मला पाहिजे की तुम्ही त्या पाहाव्या.
स्तुति हे विश्वासाचे कृत्य आहे
ते म्हणते, "परमेश्वरा, जे तूं सुरु करतो, मी विश्वास ठेवतो तूं ते पूर्ण करू शकतो आणि ते पूर्ण करेन. तुझी योजना मला देण्यासाठी तुझा धन्यवाद कारण तुझी योजना ही नेहमीच निश्चित होतेच." जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी सुरु करता, शंका ह्या तुमच्या मनावर आघात करू लागतात. "हे यशस्वी होईल काय?" अशा वेळी, परमेश्वराचीस्तुती सुरु करा, लहान सुरुवातीसाठी त्यास धन्यवाद दया. तुम्ही महान गोष्टी पाहाल.
स्तुति तुम्हाला सबळ करते
नहेम्या त्याच्या सेवकांना म्हणाला, "परमेश्वराचा आनंद तुमची शक्ती आहे" (नहेम्या ८: १०). जर तुम्ही तुमचा आनंद गमाविता तर तुम्ही तुमची शक्ती गमाविता. जर तुम्ही तुमची शक्ती गमाविता तर तुम्ही शत्रूवर वर्चस्व करण्याची शक्ती गमाविता.
जर तुम्ही तुमच्या शत्रूवर वर्चस्व करण्याची शक्ती गमाविता, तुम्ही पराभूत होता. बायबल म्हणते, "अब्राहाम देवाच्या अभिवाचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले." ( रोम ४: २०)
स्तुति तुमच्या परिस्थितीला बदलते
कल्पना करा, माती, दगड, सिमेंट आणि अर्धवट बांधलेली काही वास्तू, आणि त्याच्यामध्ये लोक परमेश्वरासाठी मोठयाने स्तुति करीत आहेत. जेव्हा तुम्ही परमेश्वराची स्तुति करता तेव्हा तुमच्या समस्या ह्या बदलत आहे असे कदाचित दिसत नाही परंतु तुमच्या पाहण्याचा दृष्टीकोण नक्कीच बदलतो.
सरळपणेस्पष्टच म्हटले तर, जेव्हा तुम्ही प्रारंभीच्या अवस्थेत परमेश्वराची स्तुति करता, तुम्ही उत्तम काम करता आणि काम जलद आणि लवकर होते. तुमचा विश्वास हा वाढतो आणि तुम्हांला ठाऊक आहे की जे काम तुम्ही करीत आहात त्यामध्ये परमेश्वर तुमच्यासह आहे.
अंगीकार
परमेश्वराच्या दयेचे गीत मी सदैव गात राहीन, माझ्या मुखा द्वारे मी सर्व पिढयांना त्याची विश्वसनीयता दाखवेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● स्तुति वृद्धि करते● दुष्टात्म्यांच्या प्रवेशाची ठिकाणे बंद करणे- १
● सामर्थ्यशाली तीन-पदरी दोरी
● तुम्ही कशा साठी वाट पाहत आहात?
● प्रभु येशू ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे
● एल-शादाय चा परमेश्वर
● महान पुरस्कार देणारा
टिप्पण्या