आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानितो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करितो.
सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. (१ इतिहास २९: १३-१४)
देवा-द्वारे आपल्याला दिलेले उत्तम स्त्रोत हे लोक आहेत. हेसंवेदनशील आणि बहुमुल्य स्त्रोत तुम्ही कसे हाताळता हे तुमच्याविषयी बरेच काही प्रगट करते.
प्रभु येशूने आपसातील संबंधाविषयी बरेच काही म्हटले आहे. एका प्रसंगी त्याने म्हटले, "जेव्हा तुम्ही जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका; कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करितील व तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी दयाल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण करा; म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करावयास त्यांच्याजवळ काही नाही; तरी नीतिमानाच्या पुनरुत्थानासमयी तुमची फेड होईल." (लूक १४: १२-१४)
जेव्हा श्रीमंत आणि प्रसिद्ध लोक आपल्याभोवती आहेत आपण आपले चांगले आचरण दाखवितो. चरित्र हे त्यात दिसते की तुम्ही लोकांशी कसे वागता; विशेषतः ते जे तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही किंवा तुमची फेड करण्यात काहीही करू शकत नाही-सामान्य लोक. खरे चारित्र्य हे दिसते जेव्हा तुम्ही गरीब व असहाय्य यांशी कसे वागता.
आणखी, चारित्र्याची परीक्षा दिसते जेव्हा तुम्ही प्रतिदिवशी प्रत्येक लोकांबरोबर कसे बोलता-तुमचे जोडीदार, तुमचे आई-वडील. आपल्यापैंकी बरेच हे स्वीकारणार नाही, परंतु आपण आपले आचरण आणि बोलण्यात फार निष्काळजी असतो जेव्हा आपण साधारण लोकांसोबत असतो. हे असे असू शकते काय की अजाणतेपणे आपण त्यांना सहज असे घेत आहोत केवळ त्यांना सखोलपणे गमवावे जेव्हा ते आपल्या जवळ नाहीत?
माझ्या बंधुंनो, गौरवशाली प्रभु म्हणजे आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका.
सोन्याची आंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला, आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला; तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता,"ही जागा चांगली आहे, येथे बसा;" आणि दरिद्र्याला म्हणता,"तूं येथे उभा राहा", किंवा"माझ्या पदासनाजवळ खाली बैस;" तर तुम्ही आपणांमध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही? (याकोब २: १-४)
कदाचित तुम्ही व्यवसायात आहात, कार्यकारीव्यक्ति आहात किंवा चर्च पुढारी आहात. तुम्ही जे कोणी आहात, याची खबरदारी घ्या की लोकांबरोबर योग्य वागा. ते तुमच्या चांगल्या कार्याला उत्तर देतील किंवा देणार नाहीत; याची पर्वा नाही.
तुम्ही बदलत आहात आणि ते महत्वाचे आहे.
प्रार्थना
पित्यापरमेश्वरा, इतरांसाठी मला प्रीति, आशा आणि प्रामाणीकपणाचे उदाहरण कर. मला तुझे मार्ग शिकीव.
तुझ्या आत्म्याने मला समर्थ करकी इतरांप्रती दयाळू, सौम्य आणि आदरणीय असावे. मला योग्य व्यक्ति द्वारे घेरून ठेव. येशूच्या नांवात. आमेन.
तुझ्या आत्म्याने मला समर्थ करकी इतरांप्रती दयाळू, सौम्य आणि आदरणीय असावे. मला योग्य व्यक्ति द्वारे घेरून ठेव. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● उत्कृष्टतेसाठी प्रयत्न कसा करावा● छाटण्याचा समय-३
● संबंधामध्ये राहण्याद्वारे अभिषेक
● दुर्मिळ गोष्ट जी आज मिळते
● देवाचे ७ आत्मे: समज चा आत्मा
● तीन महत्वाच्या परीक्षा
● वराला भेटण्यास तयार राहा
टिप्पण्या